Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

आफ्रिकेचा काही नेम नाही..
विजयासाठी २७६ धावांची गरज
जोहान्सबर्ग, १ मार्च / वृत्तसंस्था

जगज्जेते होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ अशक्यप्राय धावांचा पाठलाग करण्यासाठी मागे राहणार

 

नाही हे त्यांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत पराभूत करून दाखवून दिले असून याचाच प्रत्यय उद्या देखील येण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीच्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २७६ धावांची गरज असून त्यांचे दोन फलंदाज तंबूत परतले आहेत. दक्षिण आफ्रिकेची दिवसअखेर २ बाद १७८ अशी अवस्था असून हाशिम अमला (नाबाद ४३ ) आणि जॅक्स कॅलीस (नाबाद २६) खेळत आहेत. दुसऱ्या दिवसअखेर पराभव टाळण्याचे आव्हान उभे ठाकलेल्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावाची सुरुवात दमदार केली. वाँडर्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ४५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने चहापानापर्यंत बिनबाद ५७ धावांची मजल मारली होती.
गेल्या डिसेंबर महिन्यात याच प्रतिस्पध्र्याविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने पर्थ कसोटीत असेच भले मोठे आव्हान यशस्वीरीत्या पार केले होते. दरम्यान, २००२-०३ मध्ये वेस्ट इंडिजने दिलेले ४१८ धावांचे ऑस्ट्रेलियाने यशस्वीपणे पार केले होते. चहापानाला खेळ थांबला तेव्हा नील मॅकेन्झी आणि कर्णधार ग्रॅमीे स्मिथ प्रत्येकी २८ धावांवर नाबाद होते. त्याआधी, ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०७ धावांवर गुंडाळण्यात दक्षिण आफ्रिकेने यश मिळवले होते. नवोदित खेळणाऱ्या फिल ह्य़ुजेसने सर्वाधिक ७५ धावा काढल्या.
धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ४६६.
दक्षिण आफ्रिका पहिला डाव २२०.
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव :- फिल ह्य़ुजेस झे. डीव्हिलियर्स गो. हॅरिस ७५, सायमन कटिच झे. बाऊचर गो. मॉर्केल १०, रिकी पॉन्टिंग झे. अमला गो. कॅलिस २५, मायकेल हसी झे. एनटिनी गो. कॅलिस ०, मायकेल क्लार्क झे. कॅलिस गो. हॅरिस ००, मार्कस नॉर्थ त्रि. गो. कॅलिस ५, ब्रॅड हॅडिन झे. बाऊचर गो. एनटिनी ३७, ए. मॅक् डोनाल्ड झे. बाऊचर गो. एनटिनी ०७, मिशेल जॉन्सन झे. कॅलिस गो. एनटिनी १, पीटर सिडल नाबाद २२, बेन हिल्फेनहाऊस त्रि. गो. स्टेन १६. अवांतर (लेगबाईज ५, वाईड १, नोबॉल ३) ९. एकूण ५३.४ षटकात सर्वबाद २०७. बाद क्रम : १-३८, २-९९, ३-९९, ४-९९, ५-१०४, ६-१३८, ७-१४५, ८-१४७, ९-१७४, १०-२०७ . गोलंदाजी : स्टेन १६.४-५-५१-१, एनटिनी ११-३-५२-३, मॉर्केल १०-१-४१-१, हॅरीस ११-०-३६-२, कॅलिस ५-०-२२-३.
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव :- नील मॅकेन्झी झे. हॅडीन गो. जॉन्सन ३५, ग्रॅमी स्मिथ झे. जॉन्सन गो. हिल्फेनहाऊस ६९. हाशिम अमला नाबाद ४३ ,जॅक्स कॅलीस नाबाद २६, अवांतर ५ . एकूण २० षटकांत बिनबाद ५७. गोलंदाजी : जॉन्सन १३-०-५१-१, हिल्फेनहाऊस १६-४-४७-१, सीडल १२-२-३२-०, मॅक्डोनाल्ड ९-३-१६-०. नॉर्थ ५-०-२३-०