Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ मार्च २००९

व्यापार-उद्योग

एसबीआय लाइफद्वारे ‘एनएव्ही’ची हमी देणारी ‘स्मार्ट युलिप’ योजना
व्यापार प्रतिनिधी:
एसबीआय लाइफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडने नवीन ‘स्मार्ट युलिप’ ही युनिटसंलग्न योजना ठराविक कालावधीसाठी घोषित केली आहे. या योजनेच्या पहिल्या सात वर्षांतील १६८ पाक्षिकांमधील सर्वोच्च एनएव्ही (नक्त मालमत्ता मूल्य) किंवा मुदतपूर्तीच्या समयी असलेले एनएव्ही यापैकी ज्याचे मूल्य जास्त असेल, त्यानुसार परताव्याची हमी या योजनेत दिली गेली आहे.

वित्तीय संस्थांकडून छोटय़ा उद्योजकांना तत्पर सहकार्य मिळावे- अहलुवालिया
व्यापार प्रतिनिधी:
शासकीय व वित्तीय संस्थांनी तत्परतेने सहकार्याचा हात दिल्यास भारतातील लघु व मध्यम उद्योजकांचा नक्कीच विकास होऊ शकेल, असे प्रतिपादन नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोन्टेकसिंग अहलुवालिया यांनी लघू व मध्यम उद्योग विकास चेंबर ऑफ इंडिया आणि इंडिया इंटरनॅशनल ट्रेड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित केलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत केले.

‘व्होडाफोन’तर्फे व्हॉइस पोर्टलवर ‘अमर चित्र कथा’
व्यापार प्रतिनिधी:
आघाडीच्या सेल्युलर सेवा पुरवठादारांपैकी एक असलेल्या ‘व्होडाफोन एस्सार’ कंपनीने ‘एसीके मीडिया’ कंपनीच्या सहकार्याने लोकप्रिय अमर चित्र कथांचा संग्रह आपल्या ग्राहकांसाठी ‘व्होडाफोन लाइव्ह’ या व्हॉइस पोर्टलवर आजपासून उपलब्ध करून दिला आहे.

‘मोशन पिक्चर असोसिएशन’चा भारतही कार्यारंभ
व्यापार प्रतिनिधी:
भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगामध्ये नुकतीच करण्यात आलेली गुंतवणूक आणि स्टुडिओमधील प्रवेशावर लक्ष केंद्रित केल्यानंतर ‘मोशन पिक्चर असोसिएशन’ (हॉलिवूडची उद्योग संघटना)ने आता आपले स्थानिक कार्यालय ‘मोशन पिक्चर डिस्ट्रिक्ट असोसिएशन’ (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली आहे हे कार्यालय मुंबईत स्थित असून ते अमेरिकेतील मोशन पिक्चर, होम व्हिडीओ आणि टेलिव्हिजनचा आवाज उठवण्याचे आणि त्यांची बाजू मांडण्याचे भारतातील काम करणार आहे.

‘उद्योगश्री गौरव सन्माना’साठी शिफारशी पाठविण्याचे आवाहन
व्यापार प्रतिनिधी:
नव्या उद्योजकांना चालना मिळावी व होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे कौतुक करावे, या ध्येयाने गेली १७ वर्षे सुरू असलेल्या ‘उद्योगश्री गौरव सन्माना’साठी नव्याने शिफारशी दाखल करण्याचे आवाहन केले गेले आहे. आतापर्यंत या उपक्रमात १८३ उद्योजकांचा सन्मान करण्यात आलेला असून त्यात ६८ उद्योजिकांचा समावेश आहे. तसेच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ उद्योगपतींना ‘उद्योगश्री जीवनगौरव सन्माना’ने गौरविण्यात येते. कॅमलिनचे मानद अध्यक्ष सुभाष दांडेकर हे सन्मान निवड समितीचे अध्यक्ष आहेत. तर सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर, ‘अन्नपूर्णा’च्या प्रेमाताई पुरव असे मान्यवर निवड समितीचे सदस्य आहेत आणि निमंत्रक म्हणून ‘उद्योगश्री’चे संपादक भीमाशंकर कठारे हे काम पाहतात.
तेव्हा आपल्या परिसरातील परिचित, आप्तेष्ट, मित्र अशा माहीत असलेल्या उद्योजकांची संपूर्ण पत्त्यासहित माहिती २००९ सालाकरिता देण्यात येणाऱ्या उद्योगश्री सन्मानसाठी खालील पत्त्यावर १० एप्रिल पर्यंत पाठवून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पत्ता: संपादक ‘उद्योगश्री’, १४, मंत्री टॉवर, एल. टी. रोड, दहिसर (प), मुंबई-६८. मोबाईल- ९९६७२३३४२९.

सुभाष प्रोजेक्टस्ला दिल्ली जल बोर्डाकडून रु. ७७ कोटींची ऑर्डर
व्यापार प्रतिनिधी:
सुभाष प्रोजेक्टस् अ‍ॅण्ड मार्केटिंग लिमिटेड या भारतातील आघाडीच्या मल्टी-डिसिप्लनरी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला नुकतीच दिल्ली जल बोर्डाची रिठाला येथील एसटीपी (सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट) प्रकल्पाची रु. ७७ कोटींची ऑर्डर मिळाली. या प्रकल्पातून मिळविलेले पाणी कॉमनवेल्थ गेम्ससाठी विद्युतनिर्मिती प्रकल्पामध्ये वापरण्यात येणार आहे. हा प्रकल्प सुभाष प्रोजेक्ट्सला ११ महिन्यांमध्ये पूर्ण करायचा आहे आणि पुढे पाच वर्षे या प्रकल्पाचे कामकाज आणि देखभाल ही कंपनी पाहणार आहे. दिल्ली जल बोर्डकडून कंपनीला दोन आठवडय़ांमध्ये मिळालेली दुसरी ऑर्डर आहे. या आधी आंध्र प्रदेश राज्य सरकारच्या चेवेला इरिगेशन प्रकल्पाचे रु. ५८६ कोटींचे काम मिळाले आहे.

‘बोटोक्स’ अनुभवाची ‘ब्लश’मध्ये दशकपूर्ती
व्यापार प्रतिनिधी:
भारतातील कॉस्मेटिक क्लिनिक्सची आघाडीची साखळी ब्लश आणि जगातील क्रमांक एकचा नॉनृसर्जीकल सौंदर्यप्रसाधन ब्रॅन्ड ‘बोटॉक्स यांच्या दरम्यानच्या सहयोगाची दशकपूर्ती साजरी करत आहे. या निमित्ताने २७ फेब्रुवारी २००९ रोजी आयोजित केलेल्या सोहळ्याला लोकप्रिय बॉलीवूड नायिका मंदिरा बेदी उपस्थित होती. दहा वर्षांच्या या सहयोगपूर्तीनिमित्त ब्लश क्लिनिक्स एक महिनाभर चालणारी विशेष मोहीम हाती घेत असून त्याद्वारे बोटोक्स वापरण्याच्या फायद्यांबाबत आपल्या ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करत त्यांचे प्रशिक्षण करणार आहे. या उपक्रमांतर्गत सल्ला सत्रे, विशेष पॅकेज आणि ग्राहकांसाठीच्या खास ऑफर्सचे आयोजन करण्यात येणार आहे.

आसूसचा ‘जी ५०व्ही’ गेमिंग लॅपटॉप
व्यापार प्रतिनिधी:
आसूस कंपनीने आसूस ‘जी ५० व्ही’ नावाचा एक नवा व अत्यंत वेगवान गेमिंग लॅपटॉप भारतीय बाजारात सादर केला आहे. आसूस जी ५० व्ही ची व्हिज्युअल कॉम्प्युटिंग शक्ती प्रभावी असून त्यात उच्चतम गेमिंग कार्यक्षमता आहे. आसूस कंपनीने या लॅपटॉपमध्ये ५१ एमबीच्या ‘जीडीडीआर ३’ मेमरीसह ‘एनव्हीडिया जीईफोर्स ९७०० एम जीटी’ ग्राफिक प्रोसेसर बसवला आहे. त्यामुळे गेमिंग उत्साहींना परिपूर्ण गेमिंग आस्वाद अनुभवास मिळणार आहे. तसेच ९७०० एम प्रोसेसरमध्ये ३२ डायरेक्ट १० क्लास, कॉम्प्युटर कोअर्स, १२८ बीट मेमरी इंटरफेस यांचा समावेश असून ते जीईफोर्स ९५०० जीटीसारख्या डेस्कटॉप ग्राफिक कार्डना ऊर्जा देणाऱ्या जी ९६ जीपीयूकडून उत्पन्न करण्यात आले आहे. आसूस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आल्बर्ट तुंग याविषयी म्हणाले की, भारतात नोटबुक विभागात आसूसचे अस्तित्व आधीपासूनच खूप मजबूत आहे. जी ५० व्ही बाजारात दाखल करून आम्ही हायएण्ड नोटबुक बाजारपेठेत पदार्पण करीत आहोत. नव्या उत्पादनाविषयी आम्ही उत्साही असून भारतीय ग्राहकांना हे उत्पादन गेमिंग अनुभवाचे पूर्ण मूल्य देईल असा आमचा विश्वास आहे.

सुराना हॉस्पिटलतर्फे वाजवी दरात एंजिओप्लॅस्टी शस्त्रक्रिया
व्यापार प्रतिनिधी :
हृदयविकारासाठी केली जाणारी एंजिओप्लॅस्टी प्रक्रिया म्हणजे सर्वात खर्चिक बाब. त्यामुळे ती अनेक जणांना परवडण्यासारखीही नसते; परंतु सुराना सेठिया हॉस्पिटल अ‍ॅण्ड चॅरिटेबल ट्रस्टने चेंबूरमधील रुग्णालयाच्या परिसरात ही एंजिओप्लॅस्टी प्रक्रिया सवलतीच्या दरात करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी या रुग्णालयाने इटलीमधील तुरियन विद्यापीठाचे संचालक आणि ख्यातनाम हृदयविकारतज्ज्ञ डॉक्टर इमाद शेबियन यांना आमंत्रित केले आहे. डॉ. इमाद शेबियन यांनी इटलीमध्ये प्रत्येक महिन्यात ५० पेक्षा जास्त किचकट अशी अ‍ॅंजिओप्लॅस्टी प्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. सुराना चॅरिटेबल ट्रस्टने या शस्त्रक्रियेसाठी सवलतही देऊ केली आहे. अत्यंत किचकट अशी समजली जाणारी ही प्रक्रिया गरजू रुग्णांसाठी ७५ हजार रुपयात करण्यात येणार आहे. शिवाय सुराना हॉस्पिटल अ‍ॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट गरीब रुग्णांसाठी मार्च महिन्यात बायपास शस्त्रक्रिया १.१० लाख रुपयात करून देणार आहे. सुराना सेठिया हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रिन्स सुराना, यांनी माहिती देताना सांगितले की, ट्रस्टने व्यापक असा विस्तार कार्यक्रम हाती घेतला आहे. मालाड पश्चिम येथे दुसऱ्या
कार्डियाक सेंटरची बांधणी करण्यात येत असून हे सेंटर मे २००९ मध्ये सुरू होईल. हे सेंटर तीन मजली
असून येथे ७५ बेड्स आहेत. संपर्क- २५२९९००४/५/६/७.