Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ मार्च २००९

‘मॉडेल यू. एन.’
लाल दगडांची इमारत, हिरवेगार बगीचे, थंडगार वाऱ्याची झुळूक.. हे वर्णन वाचून तुम्हाला वाटलं असेल की मी एखाद्या राजवाडय़ाचं वर्णन करत आहे! अगदी चूक.. हे वर्णन आहे एका कॉलेज कॅम्पसचं सेंट-स्टीफन्स, दिल्ली. मॉडेल युनायटेड नेशन्स कन्वेन्शनच्या निमित्ताने दिल्लीला सेंट स्टीफन्स कॉलेजला भेट देण्याचा योग आला. मॉडेल युनायटेड नेशन्स कन्वेन्शनला ‘मन’ असं संबोधलं जातं. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आंतरशालेय, आंतरमहाविद्यालयीन अशा अनेक पातळ्यांवर ‘मन’चं आयोजन करण्यात येतं.

‘रचना’कार
मुंबईतील अप्लाईड आर्टस् कॉलेजेसमधील एक अग्रगण्य नाव म्हणजे रचना संसद, प्रभादेवी येथील विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे वार्षिक प्रदर्शन नुकतेच पार पडले. मुलांमधील कल्पकता आणि सृजनशीलता त्यांच्या प्रोजेक्टसमधून अप्रतिमरित्या साकार झाली होती. तिसऱ्या व चौथ्या वर्षांच्या मुलांनी फोटोग्राफी, एक्झिबिशन डिस्प्ले, टायपोग्राफी, कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि इलस्ट्रेशन्स या पाच इलेक्टिव्ह सब्जेक्टसपैकी त्यांच्या आवडीचा विषय निवडून त्यावर सुंदर प्रोजेक्टस् या प्रदर्शनात मांडले होते.

अ‍ॅण्ड द अ‍ॅवॉर्ड गोज टू..
‘स्लमडॉग मिलयनेर’ला गेल्या आठवडय़ात जेव्हा ऑस्कर जाहीर झाले तेव्हा मुंबईमधील एका महाविद्यालयात अजून एका फिल्मला बेस्ट फिल्म अ‍ॅवॉर्ड मिळाले. फरक इतकाच की ती फिल्म विद्यार्थ्यांनी तयार केलेली होती. बी. एम. एम.च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या फिल्म्सची दरवर्षी के. सी. महाविद्यालयात फेब्रुवारी महिन्यात अशी कॉम्पिटिशन घेण्यात येते. मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी. एम. एम.चे विद्यार्थी कन्टेंपररी इश्युस् (contenporary Issues) या विषयासाठी एक डॉक्युमेंटरी फिल्म तयार करतात, याच फिल्म्सची के. सी. महाविद्यालयात कॉम्पिटिशन घेण्यात येते.

दिल से..
प्रिय सावनी,

जय हो.. जाम भारी झालं यार. आपल्या रेहमानला ऑस्कर मिळालं. तेही एक सोडून दोन. ये तो वैसे ही हुआ ना। देने वाला जब भी देता, देता छप्पर फाडके. रेहमान सॉलिड आहे यार. इतक्या कमी वयात आणि वेळात त्याने संगीत क्षेत्रात जी उंची गाठली आहे, त्यासाठी पुन्हा एकदा रेहमान की जय हो. खरंच एखाद्याने स्वत:ला झोकून देऊन काम करणं म्हणजे काय असतं याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे.

नाटक कर, देश बदल..
मागच्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादीत हल्ल्यानंतर फक्त मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण देशातले तरुण जागे झाले आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने देशासाठी काहीतरी करतोय. मग कलाकारांनी तरी का गप्प बसावं? हीच बाब ध्यानात घेऊन युटीव्ही बिनधास्त चॅनेलतर्फे ‘ऊंगली उठा, वोट कर’ या देशव्यापी मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या अंतर्गत ‘नाटक कर, देश बदल’ ही अ‍ॅक्टिव्हिटी दिल्ली, अहमदाबाद, बँगलोर, लखनौ आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्ये राबविण्यात येत आहे. २३ फेब्रुवारी रोजी मुंबई शहराच्या राऊंडमध्ये बांद्रा येथील एमएमके कॉलेजमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत ‘थडोमल शहानी इंजिनीयरिंग कॉलेज’ने बाजी मारली. स्पर्धेत मुंबईतील आयआयटी, मित्तल कॉलेज, सेंट अँड्रय़ुज, एस. पी. इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेला आजचा आघाडीचा अभिनेता राहुल बोस, टीव्हीवरील प्रसिद्ध सूत्रसंचालिका व पत्रकार मिनी मेनन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. वेगवेगळ्या समस्यांवर भाष्य करून जनजागृती निर्माण करण्यासाठी नाटक हे सवरेत्कृष्ट माध्यम असल्याचं अभिनेता राहुल बोस या वेळी म्हणाला.
प्रशांत ननावरे
nanawareprashant@yahoo.co.in

या वर्षी सर्वच एकांकिका स्पर्धा वेगवेगळ्या वादांमुळे भयंकर गाजल्या तर कधी एखादा जगविख्यात खेळाडू अमूक इन्स्टिटय़ूटमध्ये येणार आहे, राजकारण्यांना आमच्या पर्सनल गोष्टीत लुडबूड करण्याची काय गरज? या वेळच्या कॉलेज फेस्टला धमाल आली, साला युनिव्हर्सिटीचा हा निर्णय आपल्याला आवडला नाय, ये सही टाईमपास है भिडू- कुछ हटके, असं आपल्याला सर्वानाच नेहमी वाटत असतं. कॉलेजच्या कट्टय़ावर नेहमीच वेगवेगळ्या चर्चाना- वादांना ऊत येत असतो. जो-तो आपलं म्हणणं कसं बरोबर आहे हे पटवून देण्याचा आटापिटा करीत असतो. मग ते सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली जाते, पण मग यालाच जर एखादा हक्काचा प्लॅटफॉर्म मिळाला तर. थेट वर्तमानपत्राच्या पानावर तुम्हाला तुमचं म्हणणं मांडता आलं, वेगवेगळ्या विषयांवर लिखाणातून व्यक्त होता आलं तर किती सॉलिड. कॅम्पस् मूड तुम्हाला हा प्लॅटफॉर्म देत आहे. तुमच्या आवडत्या कॅम्पस् मूड पेजवर आम्ही तुमची स्पेस राखून ठेवत आहोत. मग उचला पेन आणि पाठवा तुमची आर्टिकल्स माय स्पेस डॉट कॉम्ला. तुमच्या आर्टिकलला आम्ही तुमच्या छायाचित्रासह व कॉलेजच्या नावासह प्रसिद्घी देणार आहोत. त्यामुळे छायाचित्र पाठवायला विसरू नका आणि कॉलेजच्या नावाचा उल्लेख जरूर करा. तुमचा मजकूर आणि फोटो तुम्ही प्रत्येक शुक्रवारी दुपारी ३.०० वाजेपर्यंत campusmood@gmail.com वर अथवा पाकिटावर कॅम्पस् मूड असा उल्लेख करून लोकसत्ता कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०० ०२१ या पत्त्यावर पाठवू शकता.

‘दहशतवादाविरुद्ध जनजागृती’ विषयावरील प्रदर्शन व परिसंवाद
विक्रोळी येथील विकास कॉलेजमध्ये नुकताच दहशतवादाविरुद्ध जनजागृती या संकल्पनेवर आधारित टोटल रीकॉल : मुंबई बॉम्ब ब्लास्ट १९९३-२००८ प्रदर्शन व परिसंवाद संपन्न झाला. सदर प्रदर्शनामध्ये १९९३ ते २००८ या कालावधीत मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ऐतिहासिक आढावा छायाचित्रांद्वारे दर्शविण्यात आला. परिसंवादामध्ये डॉ. विवेक पाटकर यांनी दहशतवाद आणि आपत्कालीन व्यवस्थापन या विषयावर आपले विचार प्रकट केले. मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख संजय रानडे यांनी तरुणांचा दहशतवादाकडे बघण्याचा दृष्टीकोन व भविष्यात घ्यावयाची काळजी या विषयावर आपले विचार विषद केले. तरुणांनी आपल्या सदसदविवेकबुद्धीचा विचार करून दहशतवादास सामोरे गेले पाहिजे असे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात व्याख्यानात विषद केले. तसेच जे. जे. रुग्णालयाच्या बधिरीकरण विभागाच्या डॉ. भारती कोंडविलकर यांचे दहशतवादी हल्ल्यापूर्वी व नंतर वैद्यकीय सेवेची तयारी या विषयांवर विचार प्रकट केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संचालक प. म. राऊत भूष दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस अधिकारी खुल्लाम यांनी प्रात्यक्षिकाद्वारे दहशतवादाचे स्वरूप यासाठी वापरले जाणारी साधने व उपाययोजना याविषयी माहितीपर व्याख्यान दिले. सदर परिसंवादास व प्रदर्शनास विक्रोळी व मुंबई उपनगरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास संस्थेचे सहसंचालक विनय प. राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या प. राऊत, प्राचार्य देवगावकर, प्रा. अनंत नितूरे, ग्रंथपाल प्रा. उदय कुलकर्णी, विद्यार्थी प्रतिनिधी श्रीकृष्ण मांजरेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विवेक कुरंभट्टी यांनी केले.
कॅम्पस मूड टीम

कॅम्पसवर ‘फ्रेम्स’ अनेक असतात, पण त्या ‘क्लिक’ करणं फार थोडय़ांना जमतं. आपमे हैं वह बात? तर मग उचला कॅमेरा आणि तुम्ही काढलेले फोटोज् campusmood@gmail.com वर पाठवा. अट एकच. फोटो कॉलेजशी, कॉलेज जीवनातील ‘हट के प्रसंगांशी आणि एकंदरीतच ‘कॅम्पसच्या मूडशी’ मॅच होणारे हवेत. सवरेत्कृष्ट फोटोला ‘कॅम्पस मूड’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. आणि हो! फोटोला शीर्षक तसेच फोटोबरोबर तुमचे नाव, कॉलेज व फोन नंबर पाठवण्यास विसरू नका.