Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘मॉडेल यू. एन.’
लाल दगडांची इमारत, हिरवेगार बगीचे, थंडगार वाऱ्याची झुळूक.. हे वर्णन वाचून तुम्हाला वाटलं असेल की मी एखाद्या राजवाडय़ाचं वर्णन करत आहे! अगदी चूक.. हे वर्णन आहे एका कॉलेज कॅम्पसचं सेंट-स्टीफन्स, दिल्ली. मॉडेल युनायटेड नेशन्स कन्वेन्शनच्या निमित्ताने दिल्लीला सेंट स्टीफन्स कॉलेजला भेट देण्याचा योग आला. मॉडेल युनायटेड नेशन्स कन्वेन्शनला ‘मन’ असं संबोधलं जातं. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आंतरशालेय, आंतरमहाविद्यालयीन अशा अनेक पातळ्यांवर ‘मन’चं आयोजन

 

करण्यात येतं.
भारतामध्ये जे राष्ट्रीय ‘मन’ होतात त्यामध्ये सेंट स्टीफन्सचा मन खूप नावाजलेला आहे. ‘मन’ म्हणजे थोडक्यात सांगायचं तर युनायटेड नेशन्स (संयुक्त राष्ट्र संघ) यांच्या मॉक असेंब्लीज. इथे विद्यार्थी एखाद्या देशाचे डेलिगेट म्हणून जातात. संयुक्त राष्ट्रांच्या सभा व समित्या (असेंब्ली व कौन्सिल्स) ज्या पद्धतीने कार्यरत त्या पद्धतीने चार दिवस कॉन्फरन्स होतात. जनरल असेम्ब्ली, सिक्युरिटी कौन्सिल, इकॉनॉमिक- सोशल कौन्सिल (इको-सॉक) ह्य़ुमन राईटस कौन्सिल, कौन्सिल फॉर क्राईम प्रिव्हेन्शन व क्रिमिनल जस्टीस (उउढउख) यासारख्या अनेक कौन्सिल्स व त्यांच्यामधील विविध देशाचे डेलिगेटस (विद्यार्थी) मिळून अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करतात व त्यानंतर रेझोल्युशन पास करतात. या कॉन्फरन्सेसच्या दरम्यान एखादी मॉक आणिबाणी निर्माण केली जाते. उदा. चायनीज अतिरेक्यांनी ग्वान्तानामोबेवर हल्ला करून, ५ पॅलेस्टिनी, ४ फ्रेंच, २ पाकिस्तानी कैदी बेपत्ता केले आहेत. मग अशा परिस्थितीत डेलिगेट्सनी या आणीबाणीबद्दल स्वत:च्या देशाची बाजू मांडायची आणि चर्चेतून यावर मार्ग काढायचा. ‘मन’साठी संयुक्त राष्ट्रांचा कडक फॉरमॅट पाळला जातो. कौन्सिलसाठी एक चेअरपर्सन असतो, कोरम असतो. इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस (कउफउ) अशा अनेक ‘मन्स’ना मदत करते. या कॉन्फरन्सेसमध्ये भाग घेऊन विद्यार्थ्यांना जगाच्या राजकारणाबद्दल खूप माहिती कळते. युनायटेड नेशन्सच्या कामाबद्दल निरनिराळ्या गोष्टी कळतात. रोम, हारवर्ड युनिव्हर्सिटी यासारखे अनेक आंतरराष्ट्रीय ‘मन’ खूप नावाजलेले आहेत. मुंबईत जी.एल.सी., एच.आर. झेवियर्स यासारख्या कॉलेजेसमध्ये मॉडेल यू. एन्स होत असतात.
प्राजक्ता कुवळेकर
सेंट झेवियर्स कॉलेज

praku15@yahoo.co.in