Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘रचना’कार
मुंबईतील अप्लाईड आर्टस् कॉलेजेसमधील एक अग्रगण्य नाव म्हणजे रचना संसद, प्रभादेवी येथील विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे वार्षिक प्रदर्शन नुकतेच पार पडले. मुलांमधील कल्पकता आणि सृजनशीलता

 

त्यांच्या प्रोजेक्टसमधून अप्रतिमरित्या साकार झाली होती.
तिसऱ्या व चौथ्या वर्षांच्या मुलांनी फोटोग्राफी, एक्झिबिशन डिस्प्ले, टायपोग्राफी, कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि इलस्ट्रेशन्स या पाच इलेक्टिव्ह सब्जेक्टसपैकी त्यांच्या आवडीचा विषय निवडून त्यावर सुंदर प्रोजेक्टस् या प्रदर्शनात मांडले होते.
ग्रिष्मा शाह या फायनल इयरच्या विद्यार्थिनीचा विषय होता फॉन्ट डिझायनिंग. तिने ‘पत्त्यांचा कॅट’ ही संकल्पना घेऊन स्वत: एक फॉन्ट विकसित केला होता. प्रतिक गुप्ता याने ‘फोटोग्राफी’ विषय घेतला होता. त्याने काढलेले विविध फोटोज उपस्थितांना आकर्षित करत होते. प्रतिक म्हणाला, ‘मी लहानपणापासूनच टेक्नोसॅव्ही आहे. त्यामुळे कॅमेऱ्याची ओढ लहानपणापासूनच आहे. छायाप्रकाशाचा खेळ मी खूप एन्जॉय करतो.’ प्रतीकला ऑटोमोटिव्ह किंवा फॅशन फोटोग्राफीमध्ये करियर करायचं आहे. पायल झव्हेरीने ‘इलस्ट्रेशन्स’ सब्जेक्ट घेऊन ‘मॅड सिटी’ या कल्पनेला धरून टी शर्टस्, शूज, ब्रोशर्स डिझाईन केले होते. नमिता मोहनदास या विद्यार्थिनीच्या ‘थ्रेडस् ऑफ थॉटस्’ या अतिशय कल्पक प्रोजेक्टला ‘बेस्ट स्क्रिप्ट इन टेलिव्हिजन’ म्हणून गौरविण्यात आलं. श्रीला नायर हिचा ‘लाईफ टू लाईफलेस’ या ‘कम्प्युटर ग्राफिक्स’ विषयातील प्रोजेक्ट खरंच खूप सुंदर होता. ‘निसर्ग हा आपल्याला जीवन देतो आणि मानवसुद्धा अ‍ॅनिमेशनच्या सहाय्याने निर्जीव वस्तूंना आपल्यापुढे जिवंत करतो.’ श्रीलाचा हा प्रोजेक्ट खूपच वेगळा आणि नाविन्यपूर्ण होता.

रचना संसदच्या प्राचार्या सविता सराफ म्हणाल्या, यंदाच्या आमच्या वार्षिक प्रदर्शनाला ‘आऊटस्टॅण्डिंग’ असं सर्व प्रेक्षकांनी एकमुखाने गौरविलं आहे. आमचे विद्यार्थी अतिशय कल्पक आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने स्वत:ला व्यक्त करू पाहतायत. अ‍ॅडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीला आमच्याकडून खूप टॅलेन्ट मिळण्याच्या अपेक्षा आहेत. म्हणूनच मला माझ्या विद्यार्थ्यांचा खूपच अभिमान वाटतो. या कार्यक्रमामध्ये फेबर कॅसल, स्पायकर जीन्स, रिडिफ्युजन अ‍ॅड एजन्सी या कंपनीजचा मोलाचा सहभाग होता.
स्पृहा जोशी
रामनारायण रुईया महाविद्यालय

spruhaj@gmail.com