Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

अ‍ॅण्ड द अ‍ॅवॉर्ड गोज टू..
‘स्लमडॉग मिलयनेर’ला गेल्या आठवडय़ात जेव्हा ऑस्कर जाहीर झाले तेव्हा मुंबईमधील एका महाविद्यालयात अजून एका फिल्मला बेस्ट फिल्म अ‍ॅवॉर्ड मिळाले. फरक इतकाच की ती फिल्म

 

विद्यार्थ्यांनी तयार केलेली होती.
बी. एम. एम.च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या फिल्म्सची दरवर्षी के. सी. महाविद्यालयात फेब्रुवारी महिन्यात अशी कॉम्पिटिशन घेण्यात येते.
मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी. एम. एम.चे विद्यार्थी कन्टेंपररी इश्युस् (ूल्ल३ील्लस्र्१ं१८ क२२४ी२) या विषयासाठी एक डॉक्युमेंटरी फिल्म तयार करतात, याच फिल्म्सची के. सी. महाविद्यालयात कॉम्पिटिशन घेण्यात येते.
या वर्षी राहुल खन्ना, मेघना गुलझार यांनी या कॉम्पिटिशनच्या जजेसची भूमिका निभावली. अ‍ॅन्टी टेरर लॉज्, युनिफॉर्म सिव्हिल कोड, मुंबई पोलीस, देवदासीस् अशा सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनी फिल्म्स तयार केल्या होत्या. १० हजार ते ८० हजार रु.पर्यंत प्रॉडक्शन कॉस्ट असलेल्या या डॉक्युमेंटरीजमुळे विद्यार्थ्यांना कन्टेंपररी इश्युज व फिल्म मेकिंगचे बारकावे समजण्यात मदत झाली.
मीनाक्षी अय्यर, स्तुती शुक्ला, अरात्रीका रथ, सविता विजयकुमार, रोहिनी रामकृष्णन, झीनत नाग्री यांच्या गटाला १० हजार रु.चे प्रथम अवॉर्ड मिळाले. चिंगारा लॅण्ड स्ट्रगलकर या विद्यार्थ्यांनी फिल्म तयार केली होती.
ज्युरीने विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाचे कौतुक करत फिल्म मेकिंगसाठी काही मोलाच्या टीप्सही दिल्या. याच वेळी तृतीय वर्ष जर्नालिझमच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक अंकाचेही प्रकाशन करण्यात आले.
मीडियाचे विद्यार्थी करत असलेल्या प्रयत्नांमुळेच कदाचित भारताला भविष्यात बेस्ट फिल्म व बेस्ट डायरेक्टरचे अवॉर्ड मिळेल.
वरद लघाटे
पाटकर महाविद्यालय
,
varadlaghate@rediffmail.com