Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

दिल से..
प्रिय सावनी,

जय हो.. जाम भारी झालं यार. आपल्या रेहमानला ऑस्कर मिळालं. तेही एक सोडून दोन. ये तो वैसे ही

 

हुआ ना। देने वाला जब भी देता, देता छप्पर फाडके. रेहमान सॉलिड आहे यार. इतक्या कमी वयात आणि वेळात त्याने संगीत क्षेत्रात जी उंची गाठली आहे, त्यासाठी पुन्हा एकदा रेहमान की जय हो. खरंच एखाद्याने स्वत:ला झोकून देऊन काम करणं म्हणजे काय असतं याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे. खरं तर मला स्लॅमडॉग काही ग्रेट मूव्ही वाटला नाही. चांगला आहे पण.. त्याहूनही चांगले चित्रपट आपल्याकडे तयार झाले आहेत व होतात. पण एखाद्या परदेशी दिग्दर्शकाने तो तयार केला आहे त्यामुळेच की काय त्याची ऑस्करवारी यशस्वी ठरली हेही अमान्य करता येत नाही.
तू मला मागच्या पत्रात विचारल्याप्रमाणे अ‍ॅक्टिव पॉलिटिक्समध्ये जाण्याचा माझा विचार हा पूर्वीपासूनचाच आहे. त्याबाबतचे प्लान्सही तुला मी वेळ आल्यावर सांगेनच, पण त्याआधी मला माझा बेस तयार करायचा आहे. कारण आपण ऐकीव गोष्टीवर कुणाचा तरी उदो उदो व निंदा करण्यापेक्षा ती मुळापासून जाणून घेतली तर आपला तिथला वावर हा सहज आणि लांब पल्ल्याचा ठरतो. नाहीतर मग आपणही एक दिवस त्यांच्यापैकी एक होऊन स्वत:च्या नशिबाला दोष देत बसतो. असो, तू मला या सर्व गोष्टींबाबत पत्रात विचारत जाऊ नकोस यार, नाहीतर मी त्यावरच लिहीत बसतो आणि बाकी बोलायचं राहूनच जातं. ऑल द बेस्ट फॉर एक्झाम डिअर. मस्त पेपर लिहून काढ. तशी तू हुशार आहेसच, त्यामुळे त्याची काळजी करण्याची गरज नाही. मला आठवतंय वर्षभर शुकशुकाट असणाऱ्या कॉलेजेसच्या लायब्ररीमध्ये, झेरॉक्स सेंटर्सवर, एवढंच काय आपण कधीच फिरकत नसलेल्या प्रोफेसर्स कॉमन रूम्समध्ये परीक्षेच्या दिवसात कसा मुलांचा दिवस-रात्र राबता असतो ते. पण ती मजाच वेगळी असते. वर्षभर अभ्यास केला नसल्याने शेवटच्या महिन्याभरात नोट्ससाठी होणारी धावपळ, रात्रीची जागरणं (त्यामुळे त्या काळात कॉफी आणि सिगरेटचं वाढणारं प्रमाण) हेहेहेहे.. पण त्यात वेगळीच मजा आहे. So, enjoy it and ones again all the best. आणि हो मला माहितेय तुझी परीक्षा चालू आहे, पण कोणतंही कारण न देता तू मला या आठवडय़ातसुद्धा पत्र लिहिणार आहेस. मी पत्राची वाट पाहतोय. Take care. Love you.
मिहीर