Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राज्यातील निवडणूक तीन टप्प्यांमध्ये
नवी दिल्ली, २ मार्च/खास प्रतिनिधी

 

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदा तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान झाले होते. यंदा १६ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात संपूर्ण विदर्भ व मराठवाडय़ातील तीन मतदारसंघ अशा १३ मतदारसंघांमध्ये मतदान होईल. २३ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण पश्चिम व उत्तर महाराष्ट्र, मराठवाडय़ातील ६ मतदारसंघ आणि कोकणातील २ अशा २५ मतदारसंघांमध्ये मतदान होईल. तिसऱ्या टप्प्यात मुंबईच्या सर्व सहा आणि कोकणातील ४, अशा १० मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

१६ एप्रिल (१३ मतदारसंघ)
अधिसूचना जारी करण्याची तारीख : २३ मार्च, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : ३० मार्च, उमेदवारी अर्जांची छाननी : ३१ मार्च, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : २ एप्रिल.
बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी

२३ एप्रिल (२५ मतदारसंघ)
अधिसूचना जारी करण्याची तारीख : २८ मार्च २००९, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : ४ एप्रिल, उमेदवारी अर्जांची छाननी : ६ एप्रिल, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ८ एप्रिल.
नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, दिंडोरी, नाशिक, रायगड, मावळ, पुणे, बारामती, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड,
उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

३० एप्रिल (१० मतदारसंघ)
अधिसूचना जारी करण्याची तारीख : २ एप्रिल, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : ९ एप्रिल, उमेदवारी अर्जांची छाननी : ११ एप्रिल, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : १३ एप्रिल.
पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई