Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ मार्च २००९

तबले के पिछे गायब हो जाता हूँ.
प्रतिनिधी

सुमारे सात इंच व्यासाचा तबला आणि त्यापेक्षा थोडा जास्त व्यास असलेला डग्गा, मध्यभागी असलेली शाई, कडेला असलेला चाटीचा भाग एवढय़ा भांडवलावर किती प्रकारचे बोल निघू शकतात याचे दर्शन झाकीर हुसेन यांनी घडवले.

गुन्हे विभागाच्या गालावर फुलली गुलाबाची कळी!
प्राजक्ता कदम

माणसाकडे दोन रुपये असतील तर त्यातील एक रुपयाची त्याने भाकरी विकत घ्यावी व दुसऱ्या एक रुपयाने फूल विकत घ्यावे. भाकरीने माणसाची भूक भागते आणि फूल माणसाला जगायला शिकवते, अशी चिनी भाषेतील म्हण प्रसिद्ध आहे. या म्हणीतील दुसरी बाब एका अधिकाऱ्यामार्फत सध्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्षात उतरवली जात आहे.

आव्हानांची ‘मिठी’ सोडवून साकारतोय रेल्वे पूल..
प्रतिनिधी

पश्चिम द्रूतगती मार्गावरील ताशी हजारो गाडय़ांची वर्दळ.. सकाळ-संध्याकाळ मिठी नदीत शिरणारे भरती-ओहोटीचे पाणी.. दर तीन-चार मिनिटांनी बाजूने धडधडत जाणाऱ्या लोकल.. यापैकी कोणत्याही गोष्टीवर फारसा प्रतिकूल परिणाम होऊ न देता पश्चिम दूतगती मार्गाखाली नवा रेल्वेमार्ग टाकण्यासाठी जागा तयार करण्यात आली. मिठी नदीवर नवा पूल बांधण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे.

माथेरानलाही स्काय वॉकचा प्रस्ताव
शशिकांत कोठेकर

माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांची पायपीट कमी त्रासाची व्हावी, यासाठी दस्तुरी नाका ते माथेरान दरम्यानच्या रस्त्यावर स्काय वॉक बांधण्याच्या प्रस्तावावर एमएमआरडीए गांभीर्याने विचार करीत आहे. एमएमआरडीए क्षेत्रात माथेरान हे एकमेव हिल स्टेशन आहे. या हिल स्टेशनला पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी काय करता येईल, त्याची पाहणी करण्यासाठी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त रत्नाकर गायकवाड नुकतेच माथेरानचा दौरा करून आले.

‘पारंगत सन्मान’मध्ये ‘अनन्या’ आणि ‘सालं.. एकदा तरी’ सवरेत्कृष्ट
प्रतिनिधी

एकांकिका कलाकारांचे कौतुक करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पारंगत सन्मान पुरस्कारांवर रुईया महाविद्यालयाच्या ‘अनन्या’ या एकांकिकेने निर्विवाद वर्चस्व गाजविले. प्रताप फड (सवरेत्कृष्ट दिग्दर्शन), स्पृहा जोशी (अभिनेत्री), अभिषेक खणकर व समीर सप्तिस्कर (संगीत), कुलभूषण देसाई (प्रकाशयोजना) या पुरस्कारांबरोबरच सवरेत्कृष्ट एकांकिकेचा ‘पारंगत सन्मान’ही ‘अनन्या’ने मिळविला.

सामाजिक परिस्थितीवर भाष्य
प्रतिनिधी

नागपूर येथील अभिनय ही नाटय़संस्था २५ वर्षांपूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या चळवळीतून उभी राहिली. या संस्थेने आतापर्यंत ‘ऋतु हिरवा’ ही एकांकिका, ‘माणसाचा केला देव’ हे पथनाटय़, ‘निरो’ हे नाटक, ‘प्रेषितांचे बेट’ इत्यादी नाटके सादर केली आहेत.पराग घोंगे हे गेल्या काही वर्षांपासून आगळ्या-वेगळ्या विषयांवर अनेक नाटकांचे लेखन करीत आहेत. त्यातील ‘वाळूचं घर’ या नाटकास राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत आठ राज्य पुरस्कार मिळाले आहेत.

एक ‘कागद’ ठरला दुवा!
वांद्रे येथील रिझवी कॉलेज ते कालिना परिसरातील झोपडपट्टी व निर्जन भागाबाबत काहीतरी रेखाटने केलेला कागद आमीरचे वडील सिद्दीकी शेख यांनी खार पोलीस ठाण्याच्या गुन्हे विभागाचे निरीक्षक बापूसाहेब मुखेडकर यांना दिला तेव्हा तो दुवा किती महत्त्वाचा आहे याची त्यांना खात्री पटली होती.

तीर नजरेचे तुझ्या घायाळ करिती साजणा..
नव्या उभरत्या गायक-गायिकांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची सागरिका कंपनीची परंपरा मागील १०-१२ वर्षे अखंडितपणे चालू आहे. आज लोकांमध्ये लोकप्रिय झालेले गायक व संगीतकार अवधुत गुप्ते हे त्यामधीलच एक कलाकार..ऐका दाजिबाफेम वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, श्रेया घोषाल अशा कितीतरी गायिक-गायिकांना सागरिकाने लोकांसमोर आणले. त्यांचे आल्बम काढून त्यांच्यातील प्रतिभेला नवा दिला.याच महिन्यात यात भर पडली आहे ती जानवी प्रभु अरोरा यांची..सारेगमप स्पर्धेचे आजचे लोकप्रिय परीक्षक अवधूत गुप्ते हेच त्यांना सागरिकाच्या प्रमुख सागरिका बाम यांच्याकडे घेऊन गेले व तिचा आवाज ऐकून या कंपनीतर्फे तिच्या गाण्यांचा जानवी हाच आल्बम कंपनीतर्फे या महिन्यात सादर झाला आहे.

‘मस्सकली’ मटकणार फरहान अख्तरसोबत
टेलिस्कोप

‘मस्सकली.. मटक्कली’ या गाण्यामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली सोनम कपूरची मुलाखत येत्या शुक्रवारी ओय! इट्स फ्रायडे या फरहान अख्तरच्या कार्यक्रमात होणार आहे. फरहान अख्तरच्या खुसखुशीत सादरीकरणामुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या कार्यक्रमात आता ‘मस्सकली’ सोनम कपूर फरहानच्या कोपरखळ्यांना प्रत्युत्तर कशी देते ते शुक्रवारी रात्री १० वाजता एनडीटीव्ही इमॅजिनवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

ऊर्जाबचतीची ट्रेन..
प्रशांत मोरे

पारंपरिक ऊर्जास्रोतांच्या टंचाईचे संकट वीज भारनियमनाच्या रूपाने आपल्या अवतीभवती दिसू लागले असून, आता अपारंपरिक ऊर्जा साधनांशिवाय पर्याय उरलेला नाही.

कोळी समाजाच्या मागण्यांचा प्राधान्य देऊ - रविशेठ पाटील
प्रतिनिधी

कोळी समाजाच्या विविध मागण्यांची आपण माहिती घेत असून याबाबत त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईलच. परंतु कोळी समाजाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासह इतर मागण्यांना आपण प्राधान्य देऊ, असे राज्याचे मत्स्योद्य्ोग मंत्री रविशेठ पाटील यांनी सांगितले. मुंबई कोळी सी फूम्ड फेस्टिवल संस्थेतर्फे शिवतीर्थावर पहिल्यांदात आयोजित करण्यात आलेल्या कोळी सी फूड फेस्टिवलच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. महापौर डॉ. शुभा राऊळ, खासदार मोहन रावले, आमदार वर्षां गायकवाड तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, मच्छिमार नेते अनंत तरे, माजी महापौर महादेव देवळे, मिलिंद वैद्य, रामभाऊ पाटील आदी उपस्थित होते. शेवटच्या दिवशी ७५ हजारांहून अधिक मुंबईकरांनी भेट दिली. हा महोत्सव सात दिवस तरी असावा, अशी मागणी केली जात असल्याचे संस्थेचे प्रमुख किरण कोळी यांनी सांगितले. दरवर्षी अशा रीतीने महोत्सवाचे आयोजन केले जाईल, असेही कोळी यांनी यावेळी जाहीर केले. हा महोत्सव राज्यभर व्हावा यासाठी शासनाने अनुदान द्यवे, अशी मागणीही त्यांनी केली. या महोत्सवात विविध भागांतील ४० हून अधिक मच्छिमार संस्था सहभागी झाल्या होत्या. या महोत्सवामुळे काही कोळी महिलांना हॉटेलची कंत्राटे मिळाल्याचेही कोळी यांनी सांगितले.

शास्त्रीय संगीत स्पर्धेत धनंजय म्हसकर प्रथम
प्रतिनिधी

अभिजात शास्त्रीय संगीताची लोकांमध्ये रुची वाढावी आणि नवोदित कलाकारांना उत्तेजन मिळावे म्हणून वसईच्या अमर कला मंडळातर्फे दरवर्षी राज्यपातळीवर शास्त्रीय संगीत गायनाची स्पर्धा आयोजित केली जाते. या वर्षी २० स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातील ११ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. प्राथमिक फेरीसाठी माया मोटेगावकर आणि डॉ. संपदा पोतदार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ७ फेब्रुवारीला या स्पर्धेची अंतिम फेरी मोठय़ा जल्लोषात पार पडली. वसईकर रसिकांनी या स्पर्धेला मोठय़ा प्रमाणावर हजेरी लावून स्पर्धकांना भरभरून दाद दिली. त्यांना स्पर्धकांनीही निराश केले नाही. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत धनंजय म्हसकर याने राग शुद्ध कल्याण गाऊन प्रथम क्रमांक पटकावला. पल्लवी राऊतने पुरीया कल्याण गाऊन द्वितीय क्रमांक मिळवला. यमन गाणाऱ्या या स्पर्धेचा २००७ चा विजेता कौस्तुभ आपटेला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविलेल्या रसिका कारुळकरने राग अल्हेय्या बिलावल सादर केला. विद्या जाईल आणि अरविंद वाकणकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. अमर कला मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय शिरीशकर यांनी या स्पर्धेची पारितोषिके पुरस्कृत केली होती. कार्यवाह शरद चौधरी यांनी या कार्यक्रमादरम्यान दिवंगत साहित्य-कला रसिक मधूशेठ नाईक यांना श्रद्धांजली वाहिली. या यशस्वी स्पर्धेचे अविनाश वर्तक, अरविंद कारखानीस, डॉ. संपदा पोतदार यांनी कुशलतेने नियोजन केले. नाना वळवईकर, श्रीकांत वेचलेकर, पुरुषोत्तम वर्शीकर, कांता पाटील यांनी नेटके आयोजन केले. या संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन विलास पागार यांनी केले.

भारतालाही हवाय एक ‘ओबामा’- नितीन पोद्दार
प्रतिनिधी

आर्थिक आरिष्टातून मार्ग काढीत वाटचाल करणाऱ्या अमेरिकेला बराक ओबामांच्या रुपाने एक आशेचा किरण लाभला आहे. शेकडो वर्षे गुलामगिरीत जीवन जगणाऱ्या कृष्णवर्णीय समाजात जन्मलेल्या या व्यक्तीने स्वकर्तृत्त्वावर अमेरिकेसारख्या बलाढय़ देशाच्या अध्यपदापर्यंत मजल मारून जगासमोर एक आदर्श निर्मा केला आहे. कर्तृत्त्वाने जग बदलण्यासाठी महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या या ओबामासारख्या व्यक्तिमत्त्वाची भारतालाही गरज आहे, असे मत प्रसिद्ध कॉर्पोरेट सॉलिसिटर नितीन पोद्दार यांनी व्यक्त केले. नवी मुंबईत साईराज प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्व. प्रमोद महाजन स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी तिसरे पुष्प गुंफले. ‘भारताला पाहिजे एक बराक ओबामा’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे, साईराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष व नगरसेवक भरत जाधव उपस्थित होते.