Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

नव्या वीजबिल पद्धतीने चुकांमध्ये वाढ
पूर्वीप्रमाणे दोन महिन्यांनी बिल देण्याची मागणी
पुणे, २ मार्च/ प्रतिनिधी

विजेच्या बिलाबाबतच्या तक्रारींमध्ये मागील काही दिवसांपासून झपाटय़ाने वाढ झाली असून, त्यामुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांचाही बराचसा वेळ या

 

तक्रारींमध्ये खर्ची पडतो आहे. एक महिन्यातून वीजबिल देण्याच्या पद्धतीमुळेच या तक्रारींची संख्या वाढली असल्याचे दिसून येत असल्याने पूर्वीप्रमाणे दोन महिन्यातून एकदा बिल देण्याची व्यवस्था सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
चुकीचे रििडग, िरडिंगच न देणे, बिल मिळण्यास उशीर होणे, जादा बिल देणे आदी तक्रारींची संख्या सध्या मोठय़ा प्रमाणावर आहे. वीज कंपनीच्या बििलग व्यवस्थेतील त्रुटीमुळे अशा समस्या वाढत असल्याचा प्रश्न ‘लोकसत्ता’ने काही दिवसांपूर्वीच उपस्थित केला होता. हाच प्रश्न सध्या उग्र स्वरूप घेतो आहे.
ग्राहकांना त्याचा सर्वाधिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही या तक्रारी सोडविणे व ग्राहकांना सामोरे जाण्यात बराच वेळ द्यावा लागतो. त्यातून ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडत आहेत.
दर महिन्याला बिले देण्याची व्यवस्था राबविण्याासाठी कंपनीची बििलग व्यवस्था सक्षम नसल्याचे स्पष्ट होत आहे. वीज कंपनीने काही दिवसांपूर्वी राबविलेल्या ‘स्पॉट बिलिंग’पद्धतीत प्रत्येक महिन्याला बिल देण्याची पद्धत सुरू झाली. मात्र, ‘स्पॉट बिलिंग’ बंद झाले, तर महिन्याला बिल देण्याची पद्धत सुरूच आहे.
वीजबिलाबाबत निर्माण झालेल्या या समस्येबाबत सजग नागरी मंचचे अध्यक्ष व वीजक्षेत्रातील अभ्यासक विवेक वेलणकर यांनी महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठविले असून, एक महिन्याच्या बिलाची पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे दोन महिन्यातून बिल देण्याची योजना सुरू करावी, अशी मागणी त्यांनी मांडली आहे. घरगुती ग्राहकांबाबत वीजबिलातील तक्रारी मोठय़ा प्रमाणावर आहेत. सप्लाय कोडनुसार वीजबिल हे दोन महिन्यातून एकदा दिले पाहिजे, तर बिलाची तारीख व बिल भरण्याच्या तारखेमध्ये २१ दिवसांचे अंतर आवश्यक आहे.
प्रत्येक महिन्याला बिल देण्याच्या पद्धतीत एखाद्या ग्राहकाने शेवटच्या दिवशी धनादेशाद्वारे बिल भरल्यास धनादेश वटून प्रत्यक्षात तो बिलाचा भरणा महावितरणच्या बिलिंग व्यवस्थेत येईपर्यंत संबंधित ग्राहकाचे दुसरे बिल तयार झालेले असते. दर महिन्याला बिले काढणे व ती पाठविण्याची व्यवस्थाही कार्यक्षम नाही. त्यामुळे अनेक तक्रारी येत असल्याचे वेलणकर यांचे म्हणणे आहे.
दोन महिन्याला बिले देण्याची व्यवस्था केल्यास स्टेशनरी, बिलाचे वाटप आदींसह विविध प्रकारे कंपनीचीच बचत होणार आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांसाठी दोन महिन्यातून एकदा बिल देण्याची व्यवस्था राबविण्यात यावी, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.