Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार
पुणे, २ मार्च/प्रतिनिधी

जन्मदा प्रतिष्ठान व बैठक म्युझिक फाउंडेशनतर्फे येत्या ८ मार्च या जागतिक महिलादिनी ‘तपस्या’

 

कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.
प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मकरंद केळकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. टिळक स्मारक मंदिर येथे रविवारी (दि. ८) सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये कला आणि संगीत क्षेत्रात कीर्ती मिळविणारे पं. सी. आर. व्यास यांच्या पत्नी इंदिरा व्यास व तबलावादक पं. चंद्रकांत कामत यांच्या पत्नी आशा कामत यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात कामा हॉस्पीटलमधील रुग्णांना धीर देत सेवा पुरविणाऱ्या हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. सरोज
महेशगौरी यांचाही गौरव करण्यात येईल. या सर्वाचे सत्कार स्त्री कलाकारांच्या दोन पिढय़ा घडविणारे मोहन भिडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. त्यानंतर संगीत सभेचे आयोजन केले आहे.
यामध्ये रघुनंदन पणशीकर, अपर्णा केळकर व डॉ. रेवती कामत यांचे विविध स्त्रियांनी रचलेल्या बंदिशीचे गायन करणार आहेत, असे केळकर यांनी सांगितले.