Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पुनवडी जत्रेचे उद्घाटन;बचत गटांचे २०० स्टॉल
पुणे, २ मार्च /प्रतिनिधी

मानसी महिला उन्नती केंद्रातर्फे काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पुनवडी जत्रेचे उद्घाटन खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे निरीक्षक नितीन व्यास उपस्थित होते. ही जत्रा येत्या ४ मार्चपर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत सर्वासाठी

 

खुली राहील.
या जत्रेत पुणेकरांना भरली वांगी, कोल्हापुरी मटण, खेकडा करी, कोंबडी वडे आदी खाद्यपदार्थाची लज्जत घेता येणार आहे. तसेच ज्वेलरी, अत्तरे, उद्बत्ती, विविध हस्त कलेच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने, साडय़ा, ड्रेस मटेरियल आदींची खरेदी करता येणार आहे. काँग्रेस भवनच्या पटांगणात सुमारे ३०० महिला बचत गटांनी २०० स्टॉल उभारले आहेत.
उद्घाटनप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष अभय छाजेड, दीपक मानकर, नीता रजपूत, महेंद्र सावंत, राहुल म्हस्के आदी उपस्थित होते.
मानसी महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा व पुनवडी जत्रेच्या संयोजिका माजी महापौर दीप्ती चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर अश्विनी नायर यांनी आभार मानले.