Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘छोटय़ा कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला हवी’
पुणे, २ मार्च/ प्रतिनिधी

विविध माध्यमांमुळे लहान मुलांच्या कलागुणांना सध्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे.

 

समाजानेही या छोटय़ा कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला हवी, असे मत संतोष बराटे यांनी आज व्यक्त केले. झुंझार मित्रमंडळ ट्रस्ट आणि संतोष बराटे मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात लिटल चॅम्पस स्पर्धेतील उपविजेता रोहित राऊत याचा बराटे यांच्या हस्ते एक लाख अकरा हजार रुपये देऊन गौरव करण्यात आला. बालकलाकार शरद गोवेकर याचाही या वेळी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सदानंद वझे, सुभाष मोरे, जनार्दन बराटे, गणेश हेडगे, राजगोपाल गोसावी, तुकाराम निमकर व पांडुरंग मुखडे व्यासपीठावर उपस्थित होते. बराटे म्हणाले की, समाजातील विविध संस्था, संघटना आणि व्यक्तींनी उमलत्या वयातील कलाकारांना योग्य प्रोत्साहन दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वाढीला लागून भविष्यात कलाक्षेत्राला चांगले कलाकार मिळू शकतील. रोहितने या वेळी हरिनाम सप्ताहानिमित्त दोन अभंग गायन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मराज हांडे यांनी केले, तर सुरेश बराचे यांनी आभार मानले.