Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

एलकुंचवार समजून घेताना..
एखाद्या लेखकाच्या लेखनामागील प्रेरणा नेमक्या कोणत्या असतात? त्यात आत्मपर अनुभवांचा भाग किती असतो? व्यक्तिगत अनुभवांतील आशयद्रव्याचं लेखक कलात्मक अभिव्यक्तीत कसं रूपांतर करतो? सृजनाच्या प्रक्रियेत मूळ आशयद्रव्यातलं काय काय हरवतं? काय नवं गवसतं? लेखकाला अभिप्रेत असलेलं सारंच कलाकृतीत जसंच्या तसं उतरतं का? उतरत नसेल तर का उतरत नाही? आणि जे काही लिखाणात उतरतं, त्यानं लेखकाचं समाधान होतं का? लेखणीवर लेखकाला एकदा का हुकुमत आली की अवतीभोवतीच्या सामाजिक घटना-प्रसंगांतून, व्यक्ती वा समाजजीवनातून काही मूलभूत गोष्टी हेरून, त्यांचं अर्थनिर्णयन वा विश्लेषण करून, त्यामागचे विविध कंगोरे जाणून घेत त्यांना शब्दरूप देण्याचा तो प्रयत्न करतो का?

ग्रामीण भागात पोहोचणार ई-नेटवर्क
उत्तम शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था या दोन बाबी कोणत्याही देशाच्या विकासाचा पाया असतात. जगभरातील प्रत्येक खेडय़ापर्यंत ही सेवा पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही बाब शक्य असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार जगभरात याबाबतीत प्रयत्न सुरू झाले. याचे पहिले पाऊल भारताने उचलले. यातून इ-नेटवर्कचे जाळे पसरण्यास सुरुवात झाली. याचा पहिला प्रयोग भारत आणि आफ्रिका खंडामध्ये करण्यात आला.

वाकेन पण मोडणार नाही
‘मोडेन पण वाकणार नाही’ हे सूत्र सर्वच ठिकाणी लागू होत नाही. वडाळा येथील भारतीय क्रीडा केंद्रात अलीकडेच भरविण्यात आलेल्या ‘जिम्नॅस्टिक्स डिस्प्ले फेस्टिवल’मध्ये मात्र सुमारे दीड हजार जिम्नॅस्टिकपटूंनी ‘वाकेन पण मोडणार नाही’ या बाण्याचे दर्शन घडविले. पॅरलल बार, फ्लोअर एक्झरसाईझ, वॉल्ट या प्रकारात जॅम्नॅस्टिक्सच्या विद्यार्थिनींनी तर पोमेल हॉर्स, स्टिल रिंग्ज, वॉल्ट, पॅरलल बार, हाय बार या प्रकारांनामध्ये जॅम्नॅस्टिक्सच्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सादर केले.
छाया - प्रदीप कोचरेकर