Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

विशेष

श्रीमंत देशांचा नववसाहतवाद?
दक्षिण कोरियाच्या देवू लॉजिस्टिक्स या कंपनीने काही आठवडय़ांपूर्वी मादागास्करमध्ये ९९ वर्षांच्या भाडे करारावर (लीजवर) एक दशलक्ष हेक्टर शेतजमीन घेतली आहे. या जमिनीत मक्याची (कॉर्नची) लागवड करण्यात येईल. दरवर्षी पाच दशलक्ष टन मका या जमिनीत पिकविण्याचे देवूचे उद्दिष्ट आहे. आणखी एक लक्ष वीस हजार हेक्टर जमीन ताडाच्या (पामच्या) लागवडीसाठी घेण्याचा देवू विचार करीत आहे. या प्रकल्पात ७० हजार लोकांसाठी नव्याने रोजगार उपलब्ध होईल. या शेतीतून पिकणारे धान्य व निघणारे तेल, देवू आपल्या देशात घेऊन जाणार किंवा इतर देशांना निर्यात करणार.

‘नमस्कार, चाकरमन्यांनू, ओळखलत काय माका?’
‘अरे असा काय, ओळखूक नाय माका, अरे मी बिल्डर, तुमच्या स्वप्नांची पूर्तता करणारो तो मीच. आता ह्य़ा मुंबईचो संपूर्ण इकास करुची जबाबदारी सरकारान टाकलीसा. म्हणान म्हटला तुमच्याशी गजाली करया..’ ‘मुंबयत प्रत्येकाक घर मिळाकच व्होया यासाठी मी कित्येक वर्षां काम करतसय. आता मुंबयत जागाच रवक नाय. मग शेवटी ‘झोपू’ योजना माझ्या डोसक्यातून ही कल्पना इली. झोपडपट्टीतल्या लोकांक मोफत घर दिवची योजना म्हणजे एक आश्चर्यच होता. पण धीमेगतीन का नाय ती योजना मी राबयली. आमचे दोस्त सगळ्या पक्षात आसत. त्यांच्या डोक्यात ही कल्पना घातली त्येंका ही इतकी आवाडली की त्येंनी निवडणुकीत गाजरासारखी वापरली. गाजरासारखी म्हणजे हो गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाय तर मोडून खाल्ली, आणि खराच तसाच झाला- झोपू योजना अमलात आणताना आमच्या राजकारणी मित्रांनी पुंगी वाजय वाजय वाजयली आणि शेवटी मोडून खाल्लीपण. मीया खोटा नाय हा बोलणय पण मीसुद्धा हेचेल भरपूर हात मारलो.’

ग्रह-ताऱ्यांचं बारसं
मूल जन्मास आलं की, आपण त्याचं बारसं करतो. त्याचं नाव काय ठेवायचं यासाठी आईची, वडिलांची वेगवेगळी मते असतात. मग शेवटी समजुतीसाठी काही वेळा दोन नावेही ठेवली जातात. कालांतराने त्यातले एकच नाव राहते व त्या नावाने ती व्यक्ती पुढे ओळखली जाऊ लागते. ग्रहताऱ्यांचं बारसं करताना मात्र अशी कुठलीही तडजोड नसते. कुठलंतरी एकच नाव त्यांना दिलं जातं. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटना म्हणजे ‘आयएयू’कडे अनेक लोक असा प्रस्ताव मांडतात की, अमूक एका व्यक्तीचे नाव एखाद्या ताऱ्याला द्या; भले त्यासाठी कोटय़वधी रुपये मोजायलाही हे महाभाग तयार असतात. पण तसं करता येत नाही. काही व्यावसायिक कंपन्या भरमसाठ पैसे घेऊन ग्रहताऱ्यांना तुम्हाला हवे ते नाव देण्याचा ‘व्यवसाय’ करतात, पण त्यात काही तथ्य नाही. या कंपन्यांना ग्रहताऱ्यांचे नामकरण करण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यांनी असे नामकरण केल्याचा कुठलाही दावा केला तरी त्याला काही अर्थ नाही. काही चमकदार ताऱ्यांना प्राचीन, पारंपरिक, अरबी नावे आहेत पण इतर बहुतांश ताऱ्यांना कॅटलॉग नंबर दिलेले आहेत. आकाशातील त्यांचे स्थानही त्यात विचारात घेतले जाते. तारे किंवा दीर्घिकांना नावे देताना अनेक बारकावे विचारात घेतात.