Leading International Marathi News Daily
बुधवार, ४ मार्च २००९
  स्त्री-उद्योजकतेला चालना हवी!
  हम भी कुछ कम नहीं!
  ऑपरेशनप्रमुख
  समाजशास्त्रातील संधी..
  ‘सीपा’ पत्रकारिता फेलोशिप उपक्रम
  विदेशातील प्रवेश प्रक्रिया : कागदपत्रांची पूर्तता
  दुर्लक्षित करिअर:
इन्श्युरन्स सव्‍‌र्हेअर/ व्हॅल्युअर
  मुक्त विद्यापीठाचा अभिनव
पदव्युत्तर व एम.फिल. शिक्षणक्रम
  स्पर्धा परीक्षांच्या जगात वावरताना
  ‘पॅथ’पंथ
  शोध : व्यक्तिमत्त्व विकासाचा
  डिफरन्ट एमबीए
विविध मॅनेजमेंट कोर्सेस

 

निसर्गत:च मृदू स्वभाव, प्रेम, करुणा, दया, वात्सल्य, क्षमा, सहानुभूती, विचारांचे सामथ्र्य, साऱ्या कुटुंबाला भावनांच्या ेरशीम पाशांनी एकत्र बांधून ठेवण्याची जिव्हाळ्याची वृत्ती असणारी स्त्री जात्याच उद्यमशील, कष्टाळू आहे. गर्भाला स्वत:च्या देहात पोसून जन्म देऊन, त्याच्यावर संस्कार घडविणारी स्त्री माता आहे.
समाजीकरणाच्या प्रक्रियेत तिचा मोलाचा वाटा आहे. शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचे बीज रुजवणाऱ्या जिजाऊंना शत:श प्रणाम! स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून समाजाची अवहेलना झेलणाऱ्या सावित्रीबाई फुले, कुष्ठरोग्यांची अविरत सेवा करणाऱ्या मदर तेरेसा, राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी अशी एक ना दोन अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत.
पुरुषांची मक्तेदारी असलेल्या पुरुषप्रधान समाजात पूर्वी महिलांना दुय्यम स्थान होतं. चार भिंतीतील जीवन हेच तिचं विश्व होतं. तिचं स्वत:चं अस्तित्वच नव्हतं. समाजाच्या बंधनानी तिला चार भिंतीच्या पिंजऱ्यात डांबून तिच्या पंखांना जणू कापून टाकलं होतं. पण
 

नव्या युगाने तिला त्या पिंजऱ्यातून मुक्त करून स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी, स्वच्छंदीपणे उडण्याची एक अमूल्य संधी दिली आणि ती अमूल्य संधी न दवडता तिने आपल्या कार्याचा ठसा प्रत्येक क्षेत्रात उमटविण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आजची स्त्री प्रयत्नशील आहे. पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत महिला जवळपास सर्वच क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. विमान, रेल्वे, रिक्षा, ट्रक, ट्रॅक्टर चालविण्यासारख्या राकट कामातही ती अग्रेसर आहे. अशक्यप्राय आव्हाने स्वीकारून यशाची शिखरे पादाक्रांत करण्यात तिची सतत आगेकूच आहे.
एक स्त्री साक्षर झाली की, सारं कुटुंब साक्षर होतं असे म्हटले जातं आणि ते यथार्थ आहे. महिलांमध्ये उद्योजकता रुजल्याशिवाय घराघरात उद्योजकता रुजणार नाही. कुटुंबातील एक स्त्री उद्योजक झाली तर उद्योजकतेचे संस्कार ती आपल्या कुटुंबावर करील तिच्या उद्योजकीय संस्कारातून भावी पिढी उद्योजकीय होईल. उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे सारे गुण तिला निसर्गाने बहालच केले आहेत. समाजात खऱ्या अर्थाने उद्योजकीकरणाचे बीजारोपण करण्याचे काम ती उत्कृष्टपणे करू शकते.
उद्योग, व्यवसाय हा केवळ पुरुषच करू शकतात. स्त्रियांना उद्योगातलं काडीमात्र कळत नाही, असा समाजातील बहुसंख्य पुरुषांचा गैरसमज होता पण काही महिलांनी एकत्र येऊन पापड बनविण्याचा घरगुती उद्योग सुरू केला आणि हळूहळू आपल्या पापडाची लिज्जत जगभर पसरवली. ‘लिज्जत पापडा’ने आपले नाव केवळ देशातील नव्हे तर परकीय बाजारपेठेत गाजवलं आणि महिला उद्योजकांचं खरं अस्तित्व या पुरुषप्रधान समाजाला कळलं.
महिलांचा उद्योग क्षेत्रातील सहभाग लक्षणीय आहे. समाजाचे उद्योजकीकरणाच्या प्रक्रियेत महिलांचे योगदान अजून आवश्यक आहे. संस्कारक्षम बालमनावर उद्योजकीय संस्कार करून उद्योजक निर्माण करण्यात तुमचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार विकासात ५० टक्के पेक्षाही जास्त योगदान महिलांचेच आहे. गरज आहे ते योगदान अजून वाढविण्याची.
अगदी पुरातन काळात मागे पाहिले तरी असंच दिसून येईल की, स्त्री ही पूर्वीपासून उद्योगीच आहे. अजूनही ग्रामीण भागात दृष्टिक्षेप टाकला तर असंच दिसून येईल की, स्त्रिया या आपल्या पतीला त्याच्या अर्थार्जनासाठी अप्रत्यक्षपणे मदत करतात. मग शेतात कामे करताना सारी कष्टाची कामे स्त्रिया पार पाडत असत. कुंभाराची बायकोही कुंभाराने मडकी बनविली की ती सुकवायला. माती ओली करून तिची छाननी करायला हातभार लावते. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून पतीला अर्थार्जनात हातभार लावण्याची दुहेरी भूमिका ती उत्स्फूर्तपणे पार पाडते.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असे म्हटले जाते आणि ते यथार्थ आहे. शिवबांना सोळाव्या वर्षीच राज्याची बागडौर सांभाळायला शिकविणाऱ्या जिजाऊंचं योगदान किती महत्त्वाचं होतं हे इतिहासातून दर्शित होतं.
स्त्री हे आद्यशक्तीचं रूप आहे, ती कर्तृत्वशालिनी आहे. तिच्यामध्ये समाजाला बदलण्याचे सामथ्र्य आहे, ती प्रेरणेची जननी आहे.
बहुतेक स्त्रियांना घरातील सारी कामे व्यवस्थितरीत्या पार पाडून मुलांना सांभाळून काही अर्थार्जन करता येईल का? यांच्याकडे कल असतो. मग अशावेळी नोकरीच्या ठिकाणी योग्य वेळेत पोहोचणे, कामाची दगदग सहन करणे, ओढाताण करून अर्थार्जन करणे जरा अवघडच असते; परंतु ती कोणताही उद्योग घरच्या घरी सहज करू शकते. छोटय़ा उद्योगाची मुहर्तूमेढ एकदा रोवली.
मन लावून काम केले तर उद्योग वृद्धिंगत होण्यास वेळ लागत नाही.
स्त्रियांमध्ये चिकाटी, उत्साह, कष्ट करणाची तयारी, कल्पकता, विनम्रता हे सुप्त गुण तर आहेतच. गरज आहे केवळ या गुणांना तिच्या कल्पकतेला प्रोत्साहन देण्याची. तिच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करण्याची.
आज शासनाने महिलांसाठी विविध शासकीय योजना आखल्या आहेत. महिलांच्या विकासासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
बहुतेक महिलांची इच्छा असते स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू करण्याची, स्वयंरोजगार करण्याची. परंतु नवीन उद्योग सुरू करायचा पण कोणता? आज महिलांसमोर अनेक उद्योगसंधी उभ्या ठाकल्या आहेत. महिलांनी सवत:ची क्षमता, कौशल्य आणि उद्योगांसाठी लागणारी भांडवलाची तरतूद या गोष्टीचा प्रामुख्याने विचार केला तर निश्चितच त्या छोटासा उद्योग सुरू करू शकतील.
छोटा-मोठा उद्योग करून अर्थाजन करता येणे खरोखरच सोपं आहे. गरज आहे ती तुमच्यामधील कौशल्य ओळखण्याची, योग्य माहिती मिळवण्याची आणि मार्गदर्शनाची. आपण एखाद्या उद्योग करायचे ठरवल्यानंतर सर्वात प्रथम आपण काही गोष्टीची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हटला की, लगेचच तो सुरू करता येणार नाही. सर्वात महत्त्वाचे ठरते ते म्हणजे त्या व्यवसायाविषयी असलेले तुमचे ज्ञान, त्याचा सखोल अभ्यास, बाजारपेठ, सर्वेक्षण इत्यादी. सध्या जमाना आहे तो सव्‍‌र्हिस इंडस्ट्री. त्यामुळे ‘सेवा उद्योग’ विविध सेवा पुरविण्याचा व्यवसायही सहज करता येण्याजोगा आहे.
कलाकौशल्यावर आधारित व्यवसायामध्ये फॅन्सी पर्सेस तयार करणे, पेपर क्विलिग, हँड एम्ब्रॉयडरी, रिबन वर्क, विविध कलात्मक वस्तू तयार करण्यासारखे उद्योग करता येऊ शकतात. अशा उद्योगांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाही असतात. त्याचे प्रशिक्षण घेऊन स्वत:चा कलाकौशल्यावर आधारित व्यवसायही सुरू करता येईल. सेवा उद्योगामध्ये छोटंसं ब्युटी पार्लर चाालवणे, कॅटरिंग स्नॅक्सचा बिझनेस, पोळी-भाजी केंद्र चालवणे, पाळणाघर चालवणे, ताज्या भाज्यांच्या घरपोच सेवेचा व्यवसाय, खाद्यपदार्थ तयार करणे, वैविध्यपूर्ण मसाले तयार करून पुरवणे इ. प्रकारच्या सेवा पुरविण्याचे असंख्य उद्योग येतात. महिलांना स्वत:चा उद्योग सुरू करता यावा याकरिता राज्य व केंद्र शासनानेही अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांचा फायदा घेऊन अल्प भांडवलात छोटासा उद्योग तुम्हीही सुरू करू शकता.
संवाद कौशल्य, वेळेचे नियोजन, अर्थकारणाची सांगड, जबाबदारीची जाणीव, जोखीम स्वीकारण्याची वृत्ती, परिस्थिती हाताळण्याची, त्यामध्ये यशस्वी होण्याची क्षमता, नेतृत्वगुण, कामातील नीटसपणा, चोख व्यवहार या उपजत उद्योजकीय गुणांचा वापर करून उद्योग क्षेत्रात तुम्ही आपले कर्तृत्व सिद्ध करू शकता. स्वत:च्या उद्योगाबरोबर इतर चार हातांना काम देण्याचे बहुमोल कार्य तुमच्या हातून घडू शकते.
महिलांनी महिला बचत गटांनी कलाकौशल्यावर आधारित जर असे व्यवसाय केले तर कौशल्यातून त्याचे स्वालंबनाचे लक्ष्य पूर्ण होईल.

स्त्री-उद्यमशीलतेसाठी पूर्वअट
नियोजित उत्पादनाबद्दल संपूर्ण माहिती करून घेणे.
आपापल्या उत्पादनाची बजारात स्थिती काय आहे?
या उत्पादनासाठी आपल्याला कच्चा माल कसा उपलब्ध होईल?
उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ.
उत्पादन प्रकल्प उभारताना भांडवलाची उभारणी कशी करणार आहोत?
आपल्या उत्पादनासाठी कुशल कामगार, इतर उद्योगांची स्पर्धा, प्रकल्प कर्ज कोठे मिळेल?
त्याचबरोबर या उद्योगातून आपल्याला आर्थिक फायदा किती प्रमाणात होईल?
सारिका भोईटे-पवार
संपर्क- ९८१९५९७१३२/ २५३७९९४४.