Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

शिक्षण मंडळाच्या दप्तर खरेदीतही घोटाळा
ठाणे/प्रतिनिधी :
ठाणे महापालिका शिक्षण मंडळाने केलेल्या दप्तर-वह्या खरेदीत मोठय़ा प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनीच ही गंभीर बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणली असून, संबंधित घोटाळ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

मागासवर्गीयांची पदे भरण्यास टाळाटाळ
कडोंमपामध्ये नाराजी

सोपान बोंगाणे

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील एकूण मंजूर पदांपैकी पालिका प्रशासनाने मागासवर्गीयांसाठी राखीव असलेली एक हजार ८०० पदे अद्याप भरलीच नसल्याचे उघड झाले आहे.

कल्याणच्या नवीन महापौर निवासस्थानात लपलाय ‘पांढरा हत्ती’
कल्याण/प्रतिनिधी

पालिकेच्या महासभेत मंजूर झालेला एखादा विषय प्रत्यक्ष कृतीत उतरण्यासाठी प्रसंगी आठ-आठ वर्षे लागतात. पण नवीन महापौर निवासस्थान उभारण्यासाठीचा प्रस्ताव महासभेत मंजूर झाल्यानंतर नऊ दिवसांनी त्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडतो.

जाने कहाँ गए वो दिन..
ठाणे/प्रतिनिधी :
हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चे युग निर्माण करणारे नायक-निर्माता व दिग्दर्शक राज कूपर यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एण्डतर्फे नुकताच ‘जाने कहाँ गए वो दिन..’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. राज कपूरजींच्या सदाबहार गाण्यांचा हा कार्यक्रम अपंग व मूक-बधिर मुलांच्या मदतीसाठी घेण्यात आला होता.

कर्तृत्ववान ठाणेकरांना ‘मी मराठी’चा सलाम
ठाणे/प्रतिनिधी :
सामान्य जीवन जगताना समाजासाठी काही करण्याच्या इराद्याने असामान्य कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान ठाणेकरांना एका शानदार सोहळ्यात ‘मी मराठी’ने सलाम केला. आणि उपस्थित तमाम ठाणेकरांनीही टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना मानवंदना दिली.‘इथे संस्कृतीचिये नगरी’ असे ज्याच्याबद्दल अभिमानाने म्हटले जाते, त्या ठाणे शहराला आणि येथील कर्तृत्वान अवलीयांना सलाम ठोकण्यासाठी ‘मी मराठी’ वाहिनीने शनिवारी गडकरी रंगायतनमध्ये एका कौतुक सोहळ्याचे आयोजन केले होते.

‘कोळी समाजाला न्याय देऊ’
प्रतिनिधी :
कोळी समाजाच्या विविध मागण्यांची आपण माहिती घेत असून याबाबत त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईलच. परंतु कोळी समाजाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासह इतर मागण्यांना आपण प्राधान्य देऊ, असे राज्याचे मत्स्योद्य्ोग मंत्री रविशेठ पाटील यांनी सांगितले. मुंबई कोळी सी फूम्ड फेस्टिवल संस्थेतर्फे शिवतीर्थावर पहिल्यांदात आयोजित करण्यात आलेल्या कोळी सी फूड फेस्टिवलच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. महापौर डॉ. शुभा राऊळ, खासदार मोहन रावले, आमदार वर्षां गायकवाड तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, मच्छिमार नेते अनंत तरे, माजी महापौर महादेव देवळे, मिलिंद वैद्य, रामभाऊ पाटील आदी उपस्थित होते. शेवटच्या दिवशी ७५ हजारांहून अधिक मुंबईकरांनी भेट दिली.

ठाण्यात बुधवार, शुक्रवारी पाणी नाही
ठाणे/प्रतिनिधी :
शहाड-टेमघर पाणीपुरवठा प्राधिकरणामार्फत ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठय़ात ६.६४ टक्के कपात करण्यात आल्यामुळे उद्या बुधवार व शुक्रवारी ठाणे शहरातील बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उद्या सकाळी ८ ते गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत घोडबंदर रोड भागातील पातलीपाडा, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा या भागात पाणीपुरवठा होणार नाही. तसेच शुक्रवारी नौपाडा, उथळसर, पाचपाखाडी, वागळे इस्टेट या परिसरात पाणीपुरवठा होणार नसून, पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेने कळविले आहे.

दुर्गाडी किल्ल्याजवळील गणेशघाटावर दशक्रिया विधी करण्यास मंजुरी
कल्याण/प्रतिनिधी -
दुर्गाडी किल्ल्याजवळील गणेशघाटावर दशक्रिया, उत्तरकार्य विधी करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला. ही सुविधा कल्याणमध्ये उपलब्ध नसल्याने नागरिकांना शहरापासून दूर अंतरावर जावे लागत होते. नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांनी सांगितले, मर्तिकाचे सर्व विधी यापूर्वी काळा तलावावर होत असत. मात्र तलावाचे सुशोभीकरण करण्यात आल्यानंतर या ठिकाणी उत्तरक्रिया, दशक्रिया विधी करणे गैरसोयीचे झाले. त्यामुळे नागरिकांना पाचवा मैल, कांबा येथील पाणवठय़ावर जावे लागते. बाहेरगावाहून या विधीसाठी येणाऱ्या नागरिकांची त्यामुळे खूपच गैरसोय होते. त्यामुळे दुर्गाडी किल्ल्याजवळील गणेशघाट येथे ही सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली होती. नागरिकांची गैरसोय विचारात घेऊन हा विषय तात्काळ मंजूर करण्यात आला. रोटरी क्लब अत्यावश्यक सुविधा त्या ठिकाणी निर्माण करून देण्यास तयार आहे.

मुंब्रा-कौसा पतंग महोत्सवाला हिंदू-मुस्लिम तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे/प्रतिनिधी :
महाशिवरात्रीचे औचित्य साधून काँग्रेस, राष्ट्रवादी व समाजवादी पक्षाच्या वतीने मित्तल मैदान, मुंब्रा येथे ‘पतंग महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सिडको संचालक सुभाष भोईर, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष नईम खान, माजी स्थायी समिती सभापती महेंद्र कोमुर्लेकर यांनी फुगे व पतंग उडवून महोत्सवाला सुरुवात केली. मुंब्रा-कौसा विभागातील तरुणांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू-मुस्लिम तरुणांमध्ये एकोपा वाढावा, त्यांच्या गुणांना प्रोत्साहन मिळावे, तरुणांना क्रीडा प्रकारामुळे मानसिक आधार मिळावा व समूहातून विकास घडावा, अशाप्रकारचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे आयोजक सुभाष भोईर यांनी सांगितले. शेकडो तरुणांनी या महोत्सवात सहभाग घेतला. वेगवेगळ्या रंगांचे पतंग व्यासपीठावर लावले होते, तर अनेक आकाराचे पतंग आकाशात उडत होते. वंदे मातरम्, भारत माता की जय असे लिहिलेले पतंग विशेष आकर्षण ठरले. स्थानिक महिलांनीसुद्धा सहभाग घेत या महोत्सवाला रंगत आणली.