Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

चौदाव्या लोकसभेत राज्यातील चार खासदारांची सवरेकृष्ट कामगिरी
देवेंद्र गावंडे
चंद्रपूर, ४ मार्च

सभागृहात विचारलेल्या प्रश्नांची संख्या, चर्चेतील सहभाग व ठरावाची मांडणी लक्षात घेता चौदाव्या लोकसभेत राज्यातील आनंदराव अडसूळ, शिवाजी आढळराव पाटील, रामदास आठवले व हंसराज अहीर या चार खासदारांनी सवरेकृष्ट कामगिरी बजावली असून, साताऱ्याचे लक्ष्मणराव पाटील व अभिनेता गोविंदा हे शेवटच्या स्थानावर असल्याचे एका अहवालात आढळून आले आहे.

निवडणुकीच्या रणधुमाळीत दुष्काळाचा प्रश्न विरणार?
बुलढाणा, ४ मार्च / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बुलढाणा जिल्ह्य़ातील भीषण दुष्काळाचा मुद्दा वाऱ्यावर सोडला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन संपूर्णपणे लोकसभा निवडणुकीत व्यस्त झाल्यास दुष्काळाशी संबंधित पाणी व चाराटंचाई तसेच रोजगारच्या प्रश्नावरून जनतेत प्रचंड असंतोष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १७ पदे मागणाऱ्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांना या संदर्भात जनतेला सामोरे जाऊन जाब द्यावा लागणार आहे.

काँग्रेसच्या विदर्भ मेळाव्याचा ‘फ्लॉप शो’
कोटी रुपयांचा खर्च पाण्यात
न.मा. जोशी
यवतमाळ, ४ मार्च

कोटी रुपये खर्च करूनही काँग्रेसच्या विदर्भ मेळाव्याचा ‘फ्लॉप शो’ का झाला, कार्यकर्ते आणि बडय़ा नेत्यांनी मेळाव्याला पाठ का फिरवली, याबद्दलचे कवित्व आता काँग्रेसमध्ये सुरू आहे. सकाळी १० वाजता आयोजित मेळावा दुपारचे साडेबारा वाजले तरी सुरू करण्याची हिंमत आयोजकांनी केली नाही.

‘सुशीलकुमारांनीच सोलापुरातून निवडणूक लढवावी’
सोलापूर, ४ मार्च/प्रतिनिधी

राष्ट्रीय पातळीवरील मोठा प्रकल्प सोलापूरला प्रथमच आणणाऱ्या केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जिल्ह्य़ाच्या सर्वागीण विकासासाठी सोलापूर लोकसभा (राखीव) मतदार संघातून निवडणूक लढवावी अशी मागणी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना केली. शिंदे यांना देशाच्या राजकारणात आणि काँग्रेस पक्षात वेगळे स्थान आहे.

गडचिरोली-चिमूरसाठी भाजपतर्फे आमदार अशोक नेतेंची चर्चा
गडचिरोली, ४ मार्च / वार्ताहर

गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे गडचिरोलीचे आमदार अशोक नेते यांना उमेदवारी मिळणार असल्याचे मानले जात असताना पक्ष निरीक्षकांसमोर ऐनवेळी डॉ. रमेश गजबे यांचेही नाव समोर आले आहे. आदिवासी स्वायत्त परिषदेचे अध्यक्ष दिवाकर पेंदाम व डॉ. देवराव होळी यांनीही उमेदवारीसाठी अर्ज केला आहे.

काँग्रेसचे ‘जय हो’..
नवी दिल्ली, ४ मार्च/पी.टी.आय.

आठ पुरस्कार पटकाविलेला ‘स्लमडॉग मिलिऑनेर’ या चित्रपटात ए. आर. रहमान याने संगीत दिलेल्या ‘जय हो’ गाण्यानेही इतिहास घडविला. गाण्यातील देशभक्तीपर भाव व त्याला लाभलेली अतीव लोकप्रियता आगामी लोकसभा काँग्रेस पक्षाच्या चाणाक्ष नेत्यांच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. ‘जय हो’ गाण्याचे हक्क काँग्रेस पक्षाने मोठी रक्कम मोजून टी-सिरिज कंपनीकडून विकत घेतले आहेत. ‘जय हो’ गाण्यात काही बदल करून त्याचा लोकसभा निवडणूकीतील प्रचारात काँग्रेस पक्ष वापर करणार आहे. या गाण्याच्या हक्कापोटी काँग्रेसने टी-सिरिजला कंपनीला किती रक्कम मोजली हे मात्र उघड करण्यात आलेले नाही. ‘जय हो’ हे गाणे गुलझार यांनी लिहिलेले असून ते सुखविंदरसिंगने गायले आहे.

उत्तराखंडातील नेत्यांना चिंता अडीच महिने टेम्पो टिकविण्याची
डेहराडून, ४ मार्च/वृत्तसंस्था

दर पाच वर्षांनी निवडणुका येतात हा नित्यक्रमच आहे. परंतु तरीही निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर करतो याकडे सगळेच राजकीय पक्ष डोळे लावून बसलेले असतात. आता भारतासारख्या खंडप्राय देशात निवडणूक टप्प्याटप्प्यानेच घेणे क्रमप्राप्त आहे. पण आपल्या मतदानाच्या तारखा कोणत्या यावर बरेच काही अवलंबून असते. या तारखेला जोडून आधी किंवा नंतर सुट्टय़ा तर नाहीत ना ही राजकीय कार्यकर्त्यांची एक प्रमुख चिंता असते.

‘आयारामां’साठी कर्नाटक भाजपच्या पायघडय़ा
बंगलोर, ४ मार्च / वृत्तसंस्था

लोकसभेच्या निवडणुकीसाठी तारखा जाहीर होताच कर्नाटकात भाजपने आयाराम नेत्यांसाठी लाल पायघडय़ा अंथरण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी भाजपच्या जाळ्यात काँग्रेसचे माजी खासदार जी. एस. बसवराजू अडकले त्यांना त्यांच्या पारंपरिक तुमकूर लोकसभा मतदारसंघातून आता बहुदा भाजपतर्फे उमेदवारी दिली जाईल. तुमकूरमधून गेल्या निवडणुकीत भाजपचे एस. मल्लिकार्जुनय्या यांनी बसवराजू यांचा पराभव केला होता.

सोनिया गांधी रायबरेलीतून; तर राहुल अमेठीतून लढणार!
नवी दिल्ली, ४ मार्च/खास प्रतिनिधी

समाजवादी पार्टीशी जागावाटपाची चर्चा अपूर्णच असताना आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशातून २४ उमेदवारांच्या नावांची आज सायंकाळी घोषणा केली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाचे तरुण सरचिटणीस राहुल गांधी, केंद्रीय गृह राज्यमंत्री श्रीप्रकाश जयस्वाल, केंद्रीय मंत्री महावीर प्रसाद, माजी प्रदेशाध्यक्ष सलमान खुर्शीद, बेगम नूरबानो आदी नेत्यांना काँग्रेसने निवडणूक िरगणात उतरविले आहे. काँग्रेसने जाहीर केलेली यादी याप्रमाणे आहे. सोनिया गांधी (रायबरेली), राहुल गांधी (अमेठी), श्रीप्रकाश जयस्वाल (कानपूर), महावीर प्रसाद (बांसगाव), सलमान खुर्शीद (फारुकाबाद), जितीन प्रसाद (धौराहरा), राज बब्बर (फतेहपूर सिक्री), बेनीप्रसाद वर्मा (गोंडा), राजेश मिश्रा (वाराणशी), बेगम नूरबानो (रामपूर), रत्ना सिंह (प्रतापगढ), हरेंद्र मलिक (मुजफ्फरनगर), सुरेंद्र प्रकाश गोयल (गाझियाबाद), देवी दयाल (बुलंदशहर), बिजेंद्र सिंह (अलीगढ), मानवेंद्र सिंह (मथुरा), प्रवीण सिंह ऐरोन (बरेली), श्रीमती अन्नु टंडन (उन्नाव), पी. एल. पुनिया (बाराबंकी), निर्मल खत्री (फैजाबाद), जगदंबिका पाल (डुमारियागंज), आर. पी. एन. सिंह (कुशीनगर),सुधा राय (घोसी) आणि भोला पांडे (सलेमपूर).

कोलकात्यात भिंती झाल्या ‘बुक’!
कोलकाता, ४ मार्च/वृत्तसंस्था

निवडणूक प्रचारासाठी भिंती रंगविणे हा नवी दिल्लीत दखलपात्र गुन्हा झाला असला तरी देशाच्या अन्य भागांत मात्र प्रचारातून भिंती सुटत नाहीत. लोकसभा निवडणुका जाहीर होताच या प्रचारात आघाडी घेतली आहे ती पश्चिम बंगालमधील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने! पांढऱ्या रंगावर लाल रंगात विळाकोयता रंगवून उमेदवाराचा प्रचार करण्याची परंपरा पश्चिम बंगालमध्ये पूर्वापार आहे.

अण्णाद्रमुक, तेलुगू देसमने एनडीएशी संबंध तोडल्याचा यूपीएला फायदा होणार
छाप्रा, ४ मार्च/पीटीआय

आगामी लोकसभा निवडणूकांमध्ये विजय संपादन करून यूपीएच केंद्रात पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव यांनी आज व्यक्त केला. अण्णाद्रमुक व तेलुगू देसमसारख्या घटक पक्षांनी एनडीएबरोबर संबंध तोडल्याचा फायदा यूपीएला लोकसभा निवडणूकीत होणार आहे असेही यादव म्हणाले. ते पुढे म्हणाले की, एनडीएचे पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार व भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे दिवास्वप्न पाहात आहेत.

भाजप कार्यकर्त्यांची हत्या
कानपूर, ४ मार्च / पीटीआय

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राजकीय धुळवडीला रंग भरू लागला असून याची सुरूवातच एका भाजप कार्यकत्याच्या हत्येने झाली आहे. कानंदू शिजू असे या भाजपा कार्यकर्त्यांचे नाव आहे. शिजू यांची हत्या कम्युनिस्ट पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. व्यवसायाने ठेकेदार असलेल्या शिजू यांच्या हत्येने भाजपाने आज या परिसरात बंद पुकारला होता. दरम्यान या हत्येबाबत मालोर पोलिसात अज्ञांताविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.