Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

राहुल गांधींच्या दौऱ्याचा थांगपत्ता पोलिसांनाही नव्हता!
कोल्हापूर, ४ मार्च / प्रतिनिधी

काँग्रेसचे राष्ट्रीय युवा नेते खासदार राहुल गांधी यांच्या आजच्या कोल्हापूर दौऱ्याच्या निमित्ताने विशेष सुरक्षा पथकाचे (एस.पी.जी) वरिष्ठ अधिकारी व जवान गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापुरात होते. मात्र खासदार राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्याविषयी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनाही मंगळवारी सायंकाळपर्यंत कल्पना नव्हती. राहुल गांधी यांचा हा दौरा एक महिन्यापूर्वीच निश्चित झाला होता.

चाचा नेहरुंच्या पणतूच्या भेटीने गुलाबही मोहरले!
इचलकरंजी, ४ मार्च / वार्ताहर

चाचा नेहरूंना मनापासून आवडणारी बालके अन् छातीवर सदैव रूळणारा गुलाब हे दोघेही चाच्यांचे पणतू राहुल गांधी यांच्या भेटीने मोहरून गेले. निमित्त होते राहुल गांधी यांच्या अराजकीय दौऱ्याचे. बालक व गुलाबाच्या संगतीत रमलेल्या गांधींनी अन्य विषयावर भाष्य करण्याचे टाळले तरी त्यावरूनही तर्कवितर्कांना उधाण आलेच. दत्त साखर कारखान्यातील ऊस ते साखर हा प्रवास त्यांनी प्रत्यक्षरीत्या अनुभवला. प्रत्येक टप्प्यावरील प्रक्रिया समजावून घेतली.

‘वीजबचतीच्या नावाखाली मक्तेदाराचा खिसा भरण्याचा डाव’
सोलापूर महापालिका
सोलापूर, ४ मार्च/प्रतिनिधी
सोलापर महापालिकेच्या वतीने खाजगी तत्त्वावर वीजबचतीच्या नावाखाली पालिकेचे हित न पाहता मक्तेदाराचेच हित जोपासण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत या संदर्भात झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली आहे. या प्रश्नावर नगरविकास विभागाकडे दाद मागण्यात येईल. त्यानंतर उच्च न्यायालयातही जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सातारा, माढा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडावेत - आनंदराव पाटील
फलटण, ४ मार्च/वार्ताहर

आतापर्यंत आम्ही मिळतंजुळतं घ्यायची भूमिका स्वीकारली आहे. मात्र आता काँग्रेस पक्षाची ताकद राष्ट्रवादीपेक्षा वाढलेली असल्याने सातारा व माढा लोकसभा मतदारसंघ आमच्या पक्षासाठी राष्ट्रवादीने सोडावी. या मतदारसंघासाठी प्रसंगी आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठीही सज्ज असून एकदाची कोणाची किती ताकद आहे हे तर कळून येईल, असा टोला काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी लगावला.

सोलापूर विद्यापीठ इतिहास परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा. गरड
सोलापूर, ४ मार्च/प्रतिनिधी
ऐतिहासिक संशोधन आणि उत्खनन कार्यास चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सोलापूर विद्यापीठ इतिहास परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा. नामदेवराव गरड (कुर्डूवाडी) यांची तर सरचिटणीसपदी डॉ. नभा काकडे (सोलापूर) यांची एकमताने निवड झाली. अक्कलकोट येथे श्रीमती कल्याणशेट्टी महिला विद्यालयात प्रा. राजेंद्रसिंह लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास परिषदेची सभा झाली. त्यावेळी निवड करण्यात आलेले अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे- उपाध्यक्ष प्रा. भारत जाधव (मोहोळ), सचिव- प्रा. विलास अंधारे (अक्कलकोट), खजिनदार- प्रा. अरुण सोनकांबळे (सोलापूर), कार्यकारिणीवर सदस्य म्हणून डॉ. लता अकलूजकर (सोलापूर), प्रा. मारुतीराव सावंत (मंगळवेढा), प्रा. संजय गायकवाड (सोलापूर), प्रा. रामचंद्र लिंगे (पंढरपूर), प्रा. सोपान जावळे, प्रा. मारुतीराव मस्के व डॉ. चंद्रकांत चव्हाण (सोलापूर) यांची निवड करण्यात आली. या सभेस प्रा. मनोज कसबे, प्रा. विष्णू वाघमारे, डॉ. विकास कदम, डॉ. माया पाटील, डॉ. रवी माधव, डॉ. शिवाजी वाघमोडे, प्रा. कांतिकुमार पवार, प्रा. रामचंद्र संगशेट्टी, प्रा. विलास निंबाळकर आणि प्रा. जैनोद्दीन पटेल हे सदस्य उपस्थित होते.

पंढरपूर येथे आजपासून ग्राहकांसाठी ‘बी एस एन एल’चा मेळावा
पंढरपूर, ४ मार्च / वार्ताहर
टेलिफोन एक्सचेंज पंढरपूर शहर ग्रामीण यांचे वतीने टेलिफोन भवन येथे बी एस एन एल.चा ग्राहक मेळावा दि. ५ ते ७ मार्च व १९ ते २१ मार्च ०९ या कालावधीत आयोजित केला आहे. असे अभियंता प्रशांत वेळापुरे यांनी सांगितले.या मेळाव्यात ग्रहकांसाठी अनेक सवलतींचा वर्षांव करण्यात येणार आहे. रिचार्ज कुपन, आय टी सी कार्ड, विक्रीवर ४ टक्के सूट, तसेच या कालखंडात लॅण्डलाईन व ब्रॉडबँड कनेकशनची नोंदणी (बुकींग) करणाऱ्या ग्राहकास जोडणी आकार द्यावा लागणार नाही.ज्या ग्राहकांचे प्रतिमहा ५०० रुपयांचे पुढील बील सतत सहा महिने भरणाऱ्या ग्राहकास भाडे विरहित मोफत लॅण्ड लाईन सेवा कनेकशन देणे चालू आहे. प्रीपेड कार्डच्या खरेदीवर ५५ रुपयाचे एस. एम. एस. व्हाऊचर मोफत देण्यात येणार आहे. या कालावधीत पोस्टपेड कनेकशन नोंदणीवर १०० रुपयांचे आय टीसी कार्ड मोफत देण्यात येत आहे. या सवलतीचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन विभागीय ग्रामीण अभियंता एस. एन. थिटे यांनी केले आहे.

देशातील प्राध्यापकांचे दिल्लीत मोर्चा व धरणे आंदोलन
सोलापूर, ४ मार्च/प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यापीठ व महाविद्यालयीन प्राध्यापक महासंघातर्फे (एआयफुक्टो) प्राध्यापकांच्या सुधारित वेतनश्रेणीच्या अंमलबजावणीसह अन्य मागण्यांसाठी दिल्लीच्या जंतरमंतर येथे धरणे आंदोलन करून संसदेवर मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व महासंघाचे अध्यक्ष प्रा. थॉमस जोसेफ, सरचिटणीस प्रा. अशोक बर्मन यांनी केले. या आंदोलनात सोलापूर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रा. एस. के. मठपती, प्रा. देवेंद्र मदने, प्रा. हनुमंत आवताडे, प्रा. डॉ. राणू कदम, प्रा. बजरंग, प्रा. एन. जी. पाटील, प्रा. मारुतीराव सावंत, प्रा. खोत, प्रा. दत्तात्रेय फटे, प्रा. गायकवाड आदी सहभागी झाले होते.

पंढरपूर येथे १२ एप्रिल रोजी जैन वधू-वर परिचय मेळावा
पंढरपूर, ४ मार्च / वार्ताहर
पंढरपूर येथील पाश्र्वनाथ जैन मंदिर व समस्त जैन बांधव यांच्या वतीने दि. १२ एप्रिल ०९ रोजी राज्यस्तरीय जैन वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास तीन हजार लोक उपस्थित राहतील अशी अपेक्षा असल्याचे मेळावा कार्याध्यक्ष संजय मंगळवेढेकर, सचिव प्रशांत खडके, शीतल खडके यांनी सांगितले. या राज्यस्तरीय मेळाव्याची रुपरेखा व कार्यालयाचे उद्घाटन प्रकाश मंगळवेढेकर यांचे हस्ते करण्यात आले. वधू-वर परिचय मेळावा कार्यालय वर्धमान झेरॉक्स इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटर येथे आहे. हा मेळावा खानदेश मठ, संत पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे.

टेम्पोची धडक बसून मोटारसायकलस्वार ठार
कागल, ४ मार्च / वार्ताहर
कागल निढोरी मार्गावरील बामणी फाटय़ाजवळ टेंपो व मोटरसायकल यांची धडक होवून झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार जगन्नाथ साताप्पा दावणे (वय २४) हा जागीच ठार झाला. जगन्नाथ दावणे हा जम्मूकाश्मीर येथे लष्करात असून डिसेंबर महिन्यात त्याचा विवाह झाला होता. सहा मार्चला सुट्टी संपवून तो जम्मूकडे रवाना होणार होता. जगन्नाथ साताप्पा दावणे हा मंगळवारी दुपारी चार वाजता मटण आणण्यासाठी नदीकिनारा सिध्दनेर्ली येथे गेला होता. मटण घेवून बामणी गावाकडे परतत असताना बामणी फाटय़ाच्या वळणावर समोरून ऊसतोडणी कामगारांचे साहित्य घेवून येणाऱ्या टेंपोला जोराची धडक बसली. यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागून अतिरक्तस्त्रावामुळे तो जागीच ठार झाला.

फलटण पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेचा मोर्चा
फलटण, ४ मार्च/वार्ताहर
महाराष्ट्र पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेच्या फलटण शाखेच्या वतीने येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.शासनाने भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ मधील कलम ३० (ब) ची अंमलबजावणी स्थगित करून हे कलम कायद्यातून वगळावे आणि पदविका (डिप्लोमा) धारकांनी नोंदणी करून त्यांना पशुचिकित्सा करण्याची परवानगी द्यावी या प्रमुख मागण्यांसह अन्य काही मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून प्रांत कार्यालयावर गेल्यानंतर पोलिसांनी तो अडविला. यानंतर एका शिष्टमंडळाने नायब तहसीलदार संभाजीराव हेरवाडे यांना एक निवेदन दिले.

अन्न व भेसळ प्रतिबंधक विभाग निरीक्षकाच्या निलंबनाची मागणी
फलटण, ४ मार्च/वार्ताहर

शहरातील सोमवार पेठेतील जलशुद्धीकरण केंद्रातून खासगी पाण्याचा टँकर आपल्या मुलाला बेकायदेशीरपणे भरून देत असल्याबद्दल अन्न व भेसळ निरीक्षक तथा वसुली अधीक्षक पठाण यांना नगरपालिकेने सेवेतून निलंबित करण्याची मागणी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनुप शहा यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. पठाण यांच्या मुलाचा पाण्याचा खासगी टँकर (क्र. एमएच १४ जी ०५४०) असून याद्वारे शहरात पाणी विकले जाते. पठाण यांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून तसेच कामावर असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्याच्या परवानगीशिवाय स्वत:चा टँकर भरून नेला आहे. नगरपालिकेची कोणतीही पावती न फाडता जबरदस्तीने पाण्याचा टँकर भरून नेल्याप्रकरणी चौकशी करून पठाण यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा शहा यांनी दिला आहे.

विकासकामांना कात्री लावणार नाही- वळसे पाटील
शिक्रापूर, ४ मार्च/वार्ताहर
शेतक ऱ्यांची कर्ज माफी आणि सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजवणी यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा बोजा पडला असला तरी विकासकामांना कात्री लावली जाणार नसल्याचे अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. वळसे पाटील शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी राज्याच्या आíथक स्थिती विषयी आपली भूमिका पत्रकारांसमोर स्पष्ट केली. केंद्र सरकारने सहावा वेतन आयोग लागू केल्यानंतर महाराष्ट्रानेही या आयोगाच्या अभ्यासासाठी एक समिती नियुक्त केली होती. समितीच्या शिफारशीनुसार या नव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी राज्य सरकार करीत आहे. या वेतन आयोगात काही भत्ते देण्याबाबत राज्यसरकारकडून चालढकल केली जात असल्याच्या निषेधार्थ सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आंदलने केली. याकडे पत्रकारांनी वळसे पाटील यांचे लक्ष वेधले. त्यावर ते म्हणाले, ‘‘हे भत्ते देण्याबाबत शासनाकडून कुठलीही टाळाटाळ केली जात नाही. सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे राज्य सरकारवर सुमारे ११ हजार कोटी रुपयांचा बोजा पडला आहे. हा वेतन आयोग लागू करायचा असल्याने त्याची तरतूद सरकारने यापूर्वीच केली.

लोणावळ्यातील दोन आधिकारी व २९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
लोणावळा, ४ मार्च/वार्ताहर
पोलीस दलात सुरू असलेल्या बदल्याच्या सत्रात लोणावळा शहराच्या दोन पोलीस आधिकाऱ्यांसह तब्बल २९ कर्मचाऱ्यांच्या तर लोणावळा ग्रामीणमध्ये एक पोलीस अधिकारी व ७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पुणे जिल्ह्य़ातर्गत ५६३ कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे काल आदेश काढण्यात आले.
लोणावळा शहर पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांचे नाव व बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे-पोलीस निरीक्षक-सुदाम दरेकर (अलिबाग), सहा पो. नि. अजमुद्दिन मुल्ला (शिक्रापूर), कर्मचारी एस. बी. ढमाले (बारामती शहर), बी. बी. कदम (मुख्यालय), एस. एम. चव्हाण (इंदापूर), पी. डी. ठाकूर (बारामती ग्रामीण), एस. एम. बनसोडे (शिरुर), वी. वारुळे (दौंड), एम. जे. शेख (मुख्यालय), आर. बी. साळुंखे (वडगाव िनबाळकर), एस. एम. बाबर (जुन्नर), एस. एन. िशदे (सासवड), बी. एच. भागवत (घोडेगाव), एम. एल. अवघडे (भोर), एस. आर. िशदे (जुन्नर)

एकतर्फी प्रेमातून मुलीचा खून
वाडा, ४ मार्च/वार्ताहर
नात्याने चुलत बहिणीवर एकतर्फी प्रेम करून, लग्नाची मागणी करून दाद न देणाऱ्या १८ वर्षीय तरुणीवर सुऱ्याने वार करून ठार मारल्याची घटना खेड तालुक्याच्या पश्चिम भागात घडली. खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी डोंगराळ भागातील आव्हाट गावच्या डोंगरावर असणाऱ्या भगतवाडीतील वाशाळे या छोटय़ाशा वस्तीवर दोन मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या दुर्दैवी घटनेत सावित्रा रामचंद्र वाशाळे (वय १८) ही तरुणी ठार झाली. आरोपी रमेश विठ्ठल वाशाळे (वय २०) हा फरारी झाला आहे.

मोफत दूरध्वनी जोडसाठी संपर्क साधावा- गावडे
आळंदी, ४ मार्च/वार्ताहर
भारत संचार निगम लिमिटेडच्या पाचशे रुपयांवरील बिलधारकांस नवीन दुसरा मोफत दूरध्वनी जोड देण्यात येणार आहे. यासाठी ग्राहकांनी संपर्क साधावा, असे आवाहन खेड तालुका शिवसेना प्रमुख तथा सल्लागार राम गावडे यांनी केले आहे.पुणे विभागीय सल्लागार समितीची बैठक पुण्यात झाली. यातील कामकाजाची माहिती देताना गावडे बोलत होते. अध्यक्षस्थानी महाप्रबंधक व्ही. के. महेंद्रा होते.
गावडे म्हणाले, ज्या दूरध्वनी ग्राहकांचे बिल ५०० रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यात इनकमिंग सुविधा देण्यात येत असून कोणतेही मासिक शुल्क राहणार नाही. या योजनेचा फायदा चाकण, आळंदी, राजगुरुनगर मधील ग्राहकांना मिळणार आहे.

लोणावळा शहर तालुका शाखेकडून २४ लाखांचा दंड वसूल
लोणावळा, ४ मार्च/वार्ताहर

लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वहातूक शाखेने सन २००८ साली दंड वसुलीत अग्रक्रम गाठत वर्षभरात ३९१ अवैध वाहतूक धारकांवर कारवाई करत ४ लाख १९ हजार २०० रुपये तर मोटार वाहतूक कायद्याच्या अंतर्गत १८१४३ केसेस करत १९ लाख ८६ हजार ५८८ रुपये दंड वसुली करत जिल्ह्य़ात उत्कृष्ट कारवाई केली आहे. लोणावळा शहरचे पो. नि. सुदाम दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे सहा. पो. नि. अे. डी. फडतरे, पो. कर्मचारी हनुमंत वाघमारे, पिरगनवार, पी. एन. अवघडे, भोसले, उदय पवार, बी. एच. अवघडे, एस. पी. माने, मठ्ठी यांच्या पथकाने ही कारवाई केली.