Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

उज्वल भविष्याच्या ‘ट्रॅक’वर
चाळीतील खोलीची जेमतेम शंभर-दोनशे चौरस फुटांची जागा..तिच्यामध्ये एकत्र कुटुंबाचे वास्तव्य..बाजूच्या खोलीतील टीव्हीचा मोठा आवाज..गॅलरीत खेळणाऱ्या मुलांचा गलका..खालच्या मजल्यावर जोरजोरात वाजणारा लाऊडस्पीकर..बाजूच्या झोपडपट्टीमध्ये सुरू असलेला गोंधळ..रात्री उशिरापर्यंत सुरु असलेला कोलाहाल..हे चित्र मुंबईत अनेक ठिकाणी अनुभवण्यास मिळते.

सदोष एमयूटीपी लोकलमुळे मध्य व पश्चिम रेल्वे मेटाकुटीला
प्रतिनिधी

वारंवार नादुरुस्त होणाऱ्या एमयूटीपीच्या नव्या लोकलमुळे मध्य व पश्चिम रेल्वे मेटाकुटीला आली आहे. या ना त्या कारणाने बंद पडणाऱ्या एमयूटीपी लोकलमुळे दोन्ही रेल्वेच्या उपनगरी वाहतुकीचे वेळापत्रक दररोज विस्कळीत होऊ लागले आहे.

.. ये आराम का मामला है!
एसटीच्या अध्यक्ष पाध्यक्षांसाठी नव्या गाडय़ा

कैलास कोरडे

एसटी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक लवकरच नव्या कोऱ्या होंडा सिटी कारमधून फिरताना दिसणार आहेत. ‘ये आराम का मामला’ असल्याने महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी आधीच जुन्या गाडीला ‘टाटा’ केला आहे. आधीच्या जेमतेम चार वर्षे जुन्या गाडय़ा बदलण्याच्या त्यांच्या या निर्णयावर एसटीच्या वर्तुळातून जोरदार टीका होत आहे.

ब्लॅकबेरीवर उतरल्या कविता
प्रतिनिधी

एखादा मंत्री त्याच्या वाटय़ाला आलेल्या मंत्रीपदाचा कार्यभारात किती गढून जाऊ शकतो याचे उदाहरण नुकतेच केंद्रिय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी जगाला दाखवून दिले. मोबाइलमध्ये क्रांती घडविलेल्या ब्लॅकबेरी तंत्रज्ञानाचा उपयोग मंत्री महोदयांनी त्यांच्या कविता लिहिण्यासाठी केला. ही बाब मंगळवारी सिब्बल यांच्या ‘आय विटनेस : पार्शिअल ऑब्झव्‍‌र्हेशन्स’ या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी सर्वाच्यासमोर आली.

दहिसर, एक्सर लिंक रोड येथे उभी राहतेय दुसरी धारावी
संदीप आचार्य

मनसेने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे बुधवारी या झोपडय़ांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आणि पालिका अधिकारी गेले होते. मात्र त्यांच्यावर तेथील रहिवाशांनी तुफान दगडफेक केली. आता कोणत्याही परीस्थितीत ही झोपडपट्टी हटविण्याचा आम्ही निर्धार केला असल्याचे नयन कदम यांनी सांगितले.

खाशा पाहुण्यांना निरोप देण्यास वेळास सज्ज!
प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्य़ातील वेळास गाव यंदा सलग तिसऱ्या वर्षी त्यांच्या आगळ्यावेगळ्या पाहुण्यांना निरोप देण्यास सज्ज झाले आहे. हे आगळेवेगळे पाहुणे म्हणजे ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांची इवलाली पिल्ले! मार्च अखेरीस ही पिल्ले अंडय़ातून बाहेर पडतील आणि समुद्राकडे प्रयाण करतील, ही नैसर्गिक घटना पाहण्याची संधी कासवप्रेमींना ‘कासव महोत्सवा’द्वारे मिळणार आहे.

वेध भावभावनांचा
प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडण-घडणीत कोल्हापूरचे योगदान सर्वश्रुत आहे. कला, संगीत, लोककला, रंगभूमी, चित्रपट अशा विविध क्षेत्रात कोल्हापूरने आपला वैशिष्टय़पूर्ण ठसा उमटविला आहे.

श्री हरिमंदिर माणुकसार यांचे पुरस्कार जाहीर
प्रतिनिधी

सफाळा येथील श्री हरि मंदिर माणुकसारचे पुरस्कार जाहीर झाले असून श्रीहरिसेवा पुरस्कारासाठी प्रसिद्ध प्रवचनकार व कीर्तनकार श्रीधर दामोदर पात्रे यांची निवड करण्यात आली आहे. गुरुबंधु पुरस्कार मारुती बाबुराव कुंटे (टेंभोडे पालघर) आणि रामबागचे अनंत रामचंद्र पाटील यांना जाहीर झाला असून मंदिराच्या शताब्दी महोत्सव आरंभ सोहळ्यामध्ये ८ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. या समारंभाला पद्मनाभ शिष्य संप्रदाय तपोभूमी गोवा येथील पिठाधीश ब्रrोशानंद स्वामी, आमदार हितेंद्र ठाकूर, ठाणे जिल्हा सभापती कपिल मो. पाटील व भालचंद्र बागड उपस्थित राहणार आहेत. महोत्सवासाठी राज्यभरातून मोठय़ा प्रमाणात भाविक येणार असल्याचे मंदिराचे सरचिटणीस रामकृष्ण पाटील यांनी नमूद केले आहे.

उत्तरा मोने यांच्या पुस्तकांचे प्रकाशन
प्रतिनिधी

निवेदिका उत्तरा मोने यांच्या ‘आय रिमेंबर’ आणि ‘छंद माझा वेगळा’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन येत्या येत्या ६ मार्च रोजी एका विशेष कार्यक्रमात करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात रात्री ८ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन आयडियल एण्टरटेंटमेंट आणि मिती क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. ‘आय रिमेंबर’ या पुस्तकात विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या आयुष्यातील काही प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत. ‘छंद माझा वेगळा’ या पुस्तकात काही प्रसिद्ध व्यक्तींच्या अप्रसिद्ध छंदाबद्दल सांगण्यात आले आहे. पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, मोहन वाघ असे काही नामवंत रंगमंचावर आपल्या अप्रसिद्ध छंदांविषयी बोलणार आहेत.

दादरमध्ये ‘लढाई कॅन्सरशी’ विषयावर चर्चासत्र
प्रतिनिधी

कॅन्सर पेशंटस् एड् असोसिएशन आणि बॅंक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त येत्या ७ मार्च रोजी ‘लढाई कॅन्सरशी’ या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी मंदिर, दादर येथे दुपारी २.०० ते सायं. ५,०० या वेळेत हे चर्चासत्र पार पडेल. महिला दिनाच्या पूर्वसंध्याला आयोजित या चर्चासत्रात ‘समज, गैरसमज आणि उपचार पद्धती’ या विषयावर तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये कॅन्सर पेशंटस् एड् असोसिएशनचे अध्यक्ष वाय. के. सप्रू, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक नंदकुमार पुजारी, प्रख्यात कर्करोग शल्यविशारद डॉ. राजेंद्र बडवे, डॉ. हेमंत तोंडगावकर, डॉ. मंदाकिनी पुरंदरे, कॅन्सर पेशंटस् एड् असोसिएशनच्या संचालिका नीता मोरे, बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य व्यवस्थापक वैदेही सुखठणकर आदींचा समावेश आहे. या कार्यक्रमाला मोहन वाघ, वंदना गुप्ते व रेणुका शहाणे आदी उपस्थित राहणार आहेत. हे चर्चासत्र सर्वासाठी विनामुल्य उपलब्ध असल्याचे अधिक माहितीसाठी संपर्क: नीता मोरे ९८२१०७८८८३ / वैदेही सुखटणकर-२४४६९८६० / रंजना विघ्ने-२४४७३८७२.