Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

क्रीडा

क्रिकेटपटू रणांगणात
अर्जुना रणतुंगा

युद्धावरून परतल्यावर आपल्या कुटुंबियांना बिलगणाऱ्या सैनिकांप्रमाणे कधी क्रिकेटपटूंनाही परतावे लागेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण लाहोरहून श्रीलंकेचे क्रिकेटपटू अगदी या सैनिकांप्रमाणे मायदेशी दाखल झाले, हे पाहून खूप वाईट वाटले. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मला श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी दूरध्वनीवरून या दु:खद घटनेची माहिती दिली. त्यानंतर तब्बल चार तास आम्ही पाकिस्तानचे अधिकारी व इस्लामाबादमधील आमच्या दूतावासाशी संपर्क ठेवून होतो. सुदैवाने, यापेक्षा वाईट असे काही घडले नाही.

आयपीएलच्या सहभागाबद्दल ओरम द्विधा मन:स्थितीत
वेलिंगटन, ४ मार्च/ पीटीआय

लाहेर येथे झोलेल्या श्रीलंकेच्या बसवरील हल्ल्यानंतर भारतात एप्रिलपासून सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) सहभागाबद्दल न्यूझीलंडचा अष्ठपैलू खेळाडू जेकब ओरम द्विधा मन:स्थितीत आहे. गेल्यावर्षी खेळविण्यात आलेल्या आयपीएलमध्ये ओरम चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळला होता. पण मुंबईत झालेल्या दहशतवाही हल्ल्यानंतर क्रिकेट खेळण्यासाठी भारत कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न त्याच्या मनात आहे.

आनंदची बरोबरीची मालिका कायम
लिनारेस, ४ मार्च / पीटीआय

विश्वविजेता आणि भारताचा ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद याने लिनारेस बुद्धिबळ स्पर्धेतील लढती बरोबरीत सोडविण्याची मालिका ११व्या फेरीतही कायम ठेवली. या स्पर्धेतील सलग पाचवी लढत बरोबरीत सोडवून आनंद संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. वांग यूविरुद्धच्या या लढतीत आनंदने बरोबरी साधली. या लढतीनंतर आनंद ५.५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

मायदेशातील दहशतवादाच्या अनुभवामुळे बचावलो- जयवर्धने
कोलंबो, ४ मार्च/ पीटीआय

संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यापासून बचाव करण्यासाठी चपळ हालचाली करताना मायदेशातील दहशतवादाच्या अनुभवाचा फायदा झाला, असे मत श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धनेने व्यक्त केले आहे. श्रीलंकेमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच असतात. त्यामुळे गोळीबार आणि बॉम्बस्फोट सारख्या गोष्टींची आम्हाला चांगलीच सवय झालेली आहे.

चालक बनला रक्षक
लाहोर, ४ मार्च / एएफपी

‘ गद्दाफी स्टेडियम सुमारे अर्धा किलोमीटर दूर होते. त्याच वेळी अचानक १२ बंदूकधाऱ्यांनी बसवर गोळीबार सुरू केला, अन् काळजाचा ठोका चुकला. क्षणाचाही विलंब न लावता चहूबाजूंनी येणाऱ्या गोळ्यांपासून पाहुण्या श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंना वाचवत दूर घेऊन जात होतो.’

न्यूझीलंडमधील वेगवान खेळपट्टय़ांमुळे नाऊमेद झालेलो नाही -हरभजन सिंग
वेलिंग्टन, ४ मार्च / पी. टी. आय.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय लढतीत चार चेंडूंत तीन बळी मिळविल्याने आत्मविश्वास उंचावलेल्या हरभजनसिंगने येथील वेगवान खेळपट्टय़ांमुळे आपण अजिबात नाऊमेद झालेलो नाही, असे म्हटले आहे. हे शेवटी मनाचे खेळ आहेत. कारण खेळपट्टीच्या स्वरूपाप्रमाणे गोलंदाजाची भूमिका बदलत असते. खेळपट्टी तुमच्या गोलंदाजीला मदत करणारी नसते त्या वेळी तुम्हाला धावा रोखण्यावर भर द्यावा लागतो.

आनंदची बरोबरीची मालिका कायम
लिनारेस, ४ मार्च / पीटीआय

विश्वविजेता आणि भारताचा ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद याने लिनारेस बुद्धिबळ स्पर्धेतील लढती बरोबरीत सोडविण्याची मालिका ११व्या फेरीतही कायम ठेवली. या स्पर्धेतील सलग पाचवी लढत बरोबरीत सोडवून आनंद संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. वांग यूविरुद्धच्या या लढतीत आनंदने बरोबरी साधली. या लढतीनंतर आनंद ५.५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. वांग यूविरुद्ध काळ्या मोहऱ्यांसह खेळताना आनंदने आपल्या आवडत्या निम्झो इंडियन पद्धतीचा वापर केला आणि त्याला लढतीवर पकड घेण्यासाठी फारसे कष्ट पडले नाहीत. मात्र वांग यूकडूनही तोडीसतोड उत्तर मिळाले. अखेर २७व्या चालीनंतर दोघांचे बरोबरीवर एकमत झाले. या स्पर्धेच्या आता केवळ तीन फेऱ्या शिल्लक असून उद्या विश्रांतीचा दिवस आहे. अव्वल स्थानी असलेल्या ग्रिसचुकच्या आसपास पोहोचण्यासाठी आनंदला आता उरलेल्या लढतीत प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान कसोटी स्पर्धेच्या आयोजनाची इंग्लंडची तयारी
मेलबर्न, ४ मार्च / पीटीआय
श्रीलंकन क्रिकेटपटूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाची तयारी इंग्लंड क्रिकेट मंडळाने दर्शवली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान क्रिकेट मंडळासमवेत यासंदर्भात चर्चा झाल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रवक्ते पीटर यंग यांनी सांगितले आहे. पाकिस्तानने त्यावेळी यावर विचार करण्यासाठी अवधी मागितला होता. इंग्लंडमध्ये पाकिस्तानचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे २०१० मध्ये होणाऱ्या या कसोटी सामन्यास दर्शकांचा चांगला प्रतिसाद मिळेल. तसे पाहता अशा तिऱ्हाईत ठिकाणी सामने खेळवल्यास दर्शक त्याकडे पाठ फिरवण्याची भीती असते. मात्र इंग्लंडच्या मूळ पाकिस्तानी असलेल्या नागरिकांमुळे दर्शकांची भरपूर उपस्थिती लाभू शकते. दरम्यान, इंग्लंडचे क्रीडा मंत्री जेरी सुट्कलीफ यांनीही लाहोरच्या हल्ल्यानंतर कसोटी स्पर्धा आयोजित करण्यास हिरवा कंदील दाखवल्याचे एएपीने म्हटले आहे.

बास्केटबॉल: ओएनजीसी आणि सेनादलाची आगेकूच
मुंबई, ४ मार्च/ पीटीआय

इंडियन जिमखान्यात सुरु असलेल्या रौप्यमहोत्सवी रामू स्मृती बास्केटबॉल स्पर्धेत ओएनजीसी आणि सेनादलाने विजयी आगेकूच सुरू ठेवली आहे. आजच्या सामन्यात ओएनजीसीने महाराष्ट्रावर ६५-४६ अशी मात करीत स्पर्धेतील दुसरा विजय नोंदविला. तर गेल्यावर्षी उपविजेते ठरलेल्या सेनादलाने चेन्नई कस्टमचा ९७-८४ असा पराभव केला. ओएनजीसीकडून पराभव पत्करणाऱ्या पश्चिम रेल्वेने आज इंडियन ओवरसीस बॅंकेला ९१-५७ अशी धूळ चारली.
निकाल पुढील प्रमाणे :- पुरुष गट: ओएनजीसी ६५ (देसराज १३), वि. महाराष्ट्र ४६ (सोजी चेरीयन १२), पश्चिम रेल्वे ९१ (विघ्नेश ३२) वि. इंडियन ओवरसीस बॅंक ५७ (चंद्रशेखर २०), सेनादल ९७ (दिलीप कुमार २१) वि. चेन्नई कस्टम ८४ (बी. राजन २०) महिला गट: छत्तीसगढ ७१ (भारती नेताम १३) वि. उर्वरीत महाराष्ट्र ३४ (कंवलजीत सिंग १९)

संक्षिप्त क्रीडावृत्त
अंजुमचे अर्धशतक; भारताने दुसरा सराव सामना जिंकला

सिडनी: सलामीवीर अंजुम चोप्राने केलेल्या नाबाद ७३ धावांच्या जिगरबाज खेळीमुळे भारतीय महिला संघाने येथे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात न्यूझीलंडवर २७ धावांनी विजय मिळविला. भारताचा सराव सामन्यांतील हा दुसरा विजय होता. ओल्ड किंग्स येथे झालेल्या या सामन्यात चोप्राच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने निर्धारित ५० षटकांत ६ बाद १६८ धावापर्यंत मजल मारली. त्यानंतर गौहर सुलताना (२-१५), रुमेली धर (२-२८) आणि प्रियांका रॉय (२-३६) यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे भारताने न्यूझीलंडला रोखण्याची कामगिरी केली. न्यूझीलंडने १-६१ अशी दमदार सुरुवात केल्यानंतर भारताच्या हातून विजयाची संधी निसटण्याची शक्यता व्यक्त होती, पण भारताने न्यूझीलंडविरुद्ध बाजी उलटविली.

विजय हजारे ट्रॉफी: मुंबईचे आव्हान संपुष्टात
आगरतळा: रणजी क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविणाऱ्या मुंबईच्या संघाचे विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेमधील आव्हान आज संपुष्टात आले. स्पर्धेच्या उपान्त्य पूर्व फेरीत तामळनाडूने मुंबईचा ५६ धावांनी पराभव केला. मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांच्या चांगलाच अंगलट आला. तमिळनाडूचा सलामीवीर अनिरुद्ध श्रीकांत (६७) आणि रवीचंद्रन अश्विन (४६) यांच्या उपयुक्त खेळीमुळे तमिळनाडूने ५० षटकांत २५२ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचे फलंदाज ठराविक फरकाने तंबूत परतले आणि मुंबईला ५६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने मुंबईचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून तमिळनाडूचा उपान्त्य फेरीचा सामना उत्तर प्रदेश विरूद्ध होणार आहे.
बास्केटबॉल: रोमहर्षक सामन्यात महाराष्ट्र पराभूत
मुंबई: इंडियन जिमखान्यात सुरु असलेल्या रौप्यमहोत्सवी रामू स्मृती बास्केटबॉल स्पर्धेच्या एका रोमहर्षक सामन्यात उर्वरीत भारताच्या संघाने महाराष्ट्राच्या संघावर ६०-५८ असा निसटता विजय मिळवला. सामना संपायला १५ मिनीटे असताना दोन्हीही संघाचे ५८ असे समान गुण होते. पण उर्वरीत भारताच्या सुनिल कुमारने अंतिम क्षणी बास्केट करून संघाला विजय मिळवूल दिला. दुसऱ्या पुरुषांच्या सामन्यात ओएनजीसीने विजयी घौडदौड सुरुच ठेवत चेन्नई कस्टम संघाला ८५- ७८ असे नमविले. तर महिलांच्या सामन्यात दक्षिण रेल्वेने छत्तीसगडला ७७-५२ अशी धूळ चारली.
फुटबॉल: स्पोर्टिग, एफसीआय उपान्त्य फेरीत
मुंबई: अखिल भारतीय निमंत्रितांच्या वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत गोव्याच्या स्पोर्टिग व्हेटरन्स व कोलकात्याच्या एफसीआय या संघांनी उपान्त्य फेरीत धडक मारली आहे. कर्नाटक स्पोर्टिग असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या या सिरो क्लिनफार्म सातव्या फुटबॉल स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार ब्रुनो कुटिन्होच्या नेतृत्वाखालील स्पोर्टिग व्हेटरन्सने सेन्चुरी रेयॉन्सवर ३-० अशी मात केली व उपान्त्य फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपान्त्यपूर्व लढतीत कोलकात्याच्या एफसीआय संघाने गतविजेत्या कर्नाटक स्पोर्टिग असोसिएशन संघावर ५-४ अशी मात केली.
महापौर चषक कॅरम स्पर्धेला आज प्रारंभ
मुंबई: मुंबई महानगर पालिका व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली उपनगर जिल्हा मानांकन महापौर चषक कॅरम स्पर्धा ५ ते १० मार्च या कालावधीत होणार आहे. मातृ दुग्धशाळा कर्मचारी संघटना, गणेश मंडप हॉल, नेहरूनगर, कुर्ला (पूर्व), मुंबई-२४ येथे ५ मार्चला सायंकाळी ४-३० वाजता म. न. पा. सभागृह नेते सुनील प्रभू यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होईल. स्पर्धेत २४० कॅरमपटूंचा सहभाग असून, पुरुष, महिला आणि १८ वर्षे वयोगटाची मुले, अशा तीन गटात स्पर्धा खेळविण्यात येणार आहे.