Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्याचे समजल्यानंतर बुधवारी ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक करून दुकानदारांना धमकावण्यास सुरुवात केली. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना पांगवले. यामुळे काही काळ शहरातील वातावरण तंग बनले होते.

ब्रह्माळा तलावातील प्रदूषणामुळे दरुगधी!
ठाणे/प्रतिनिधी : ठाण्यातील प्रताप सिनेमा व ब्रह्माळा तलाव परिसरातील अनधिकृतपणे सुरू असलेल्या म्हशींच्या तबेल्यांतील मल, मूत्र तलावात व आजूबाजूला सोडून देण्यात येत असल्याने नागरिकांना प्रचंड दुर्गंधीबरोबरच मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियासारख्या साथीच्या रोगांची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरातील तबेले शहरापासून दूर ठिकाणी हलविण्यात यावेत, अशी मागणी जोर धरीत आहे.

ठाणे काँग्रेसमधील नाराजी शिगेला!
दिलीप शिंदे

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना पक्षांतर्गत नाराजीला धुमारे फुटू लागले आहेत. त्याची ठिणगी ठाणे शहर काँग्रेसमध्ये पडून माजी शहर अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर हे काही नगरसेवकांसह काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या मानसिकतेला पोहचले आहेत.

डम्पिंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
ठाणे/प्रतिनिधी

स्वच्छ आणि सुंदर शहराचा राष्ट्रीय पुरस्कार पटकाविणाऱ्या ठाणे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, या प्रश्नाने उगरूप धारण केले असताना मुलुंडच्या डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्यातून येणाऱ्या दरुगधीने ठाणेकर नागरिक हैराण झाले आहेत.

टॅरो माइंडेड रिटायर्ड लाइफ!
प्रशांत मोरे

नेहमीच्या सरळ चाकोरीबद्ध जीवन प्रवासात एखादे वळण असे येते की, त्यामुळे त्या व्यक्तीच्या पुढील आयुष्याची दिशाच बदलून जाते. ठाण्यातील मधुकर लेलेंबाबत असेच काहीसे घडले. नोकरीत असताना टॅरो कार्डस् हा शब्दही त्यांनी कधी ऐकला नव्हता आणि आता निवृत्तीनंतर मात्र ते टॅरोमय जीवन जगत आहेत.टॅरो हा प्राचीन इजिप्त आणि इटालियन संस्कृतीत भविष्यातील घटनांचा अंदाज घेण्यासाठी खेळला जाणारा पत्त्यांचा डाव. त्यातील प्रत्येक पत्ता हा विशिष्ट घटनांचा द्योतक असतो.

गुंतवणूक करताना सावधान!अर्थतज्ज्ञांचा सल्ला
ठाणे/प्रतिनिधी :
गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना भावनेपेक्षा वैचारिक बाबी विचारात घ्याव्यात, तसेच आपण करीत असलेली गुंतवणूक सल्लागारासाठी गुंतवणूक करत नसून, स्वत:साठी करीत आहोत हे गुंतवणूकदाराने लक्षात ठेवावे, असा सल्ला नामवंत अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी दिला.

चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरला शर्मिला ठाकरे यांची भेट
ठाणे/प्रतिनिधी :
महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट लेबर वेल्फेअर, ठाणे या संस्थेतर्फे नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत वाडा तालुक्यातील श्रीधरपाडा येथे साजरा झाला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रियेश साबळे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यात १२ वर्षांपूर्वी १८० मुला-मुलींसाठी शासनाची मदत न घेता बालशिक्षण केंद्रे सुरू केली. संस्थेच्या शाळांमध्ये प्रत्यक्ष मुलांना पुस्तकातून न शिकविता साहित्याद्वारे शिक्षण दिले जाते. चार ते १० वर्षे वयोगटातील मुलेही चांगल्या प्रकारे आपली कला दाखवू शकतात, हे दाखविण्यासाठी सदरचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कामगार नेते मनोज चव्हाण, श्वेता परुळेकर, रिटा गुप्ता, राजन गावंड, विनय भोईटे, ऊर्मिला तांबे आदी मनसे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मुलांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे शर्मिला ठाकरे यांनी कौतुक केले.

फुलवारी बच्चों की..
ठाणे/प्रतिनिधी :
हॅलो किड्स, कळवा शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फुलवारी बच्चों की’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना एवढय़ा लहान वयात स्टेज मिळाल्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास झपाटय़ाने होतो व एकंदर व्यक्तिमत्त्वावर छाप पडते, असे मुंबईचे सहपोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी यावेळी सांगितले. दीड ते साडेतीन वर्षांच्या मुलामुलींना रंगमंचाचे ज्ञान व्हावे, तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे प्राचार्या अ‍ॅनी मॅथ्यू व चेअरमन जॉर्ज चाको यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी, उपाध्यक्ष के. पी. पाटील, उद्योजक अशोक गुप्ता, नगरसेविका अपर्णा साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. हॅलो किड्स शाळेमध्ये मुलांच्या विकासगुणांसाठी हेल्थ बॉडी सेंटर, मोफत दंत चिकित्सा, हेल्थ चेकअप कॅम्प, चित्रकला स्पर्धा, गाण्याच्या स्पर्धा, नृत्य स्पर्धा, चेस, कॅरम, रांगोळी आदी स्पर्धा घेतल्या जातात.

टिळकनगर शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे प्रदर्शन
डोंबिवली/प्रतिनिधी :
येथील टिळकनगर शाळेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांच्या सहकार्याने तयार केलेल्या विविध प्रकल्पांचे प्रदर्शन शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यातील अनेक प्रकल्प लक्षवेधी ठरले. धार्मिक सण, परंपरा, आदिवासी लोकजीवन, विविध किल्ल्यांची माहिती, बॅटरीवर चालणारी पवनचक्की, सौरऊर्जा, शेतीची अवजारे, पाणी बचत, क्लेपासून बनविलेल्या विविध वस्तू, कागदी लगद्यापासून तयार केलेल्या सुबक वस्तू इत्यादींचा या प्रदर्शनात समावेश होता. विशेष म्हणजे विद्यार्थी स्वत: या प्रकल्पांची माहिती देत होते. शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आदर्श विद्यालयाच्या संस्थापिका विनिता भट यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी जी.व्ही. कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले, तसेच विस्तार अधिकारी चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण, तसेच सर्जकता रुजावी म्हणून शासन निर्णयानुसार असे विकासपूरक उपक्रम राबविले जातात, अशी माहिती टिळकनगर विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका विद्या घैसास यांनी दिली. प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी विद्या बुरसे, विजया निरभवणे, नलिनी वळवी, राणी गोसावी, मंगल बारवे, वैशाली कुलकर्णी, राजश्री कोळी, सुनीता संभूस, वृषाली देवधर, वंदना मगर, अंजली पाटील, ज्योती अणावकर, मकरंद खाडे यांनी प्रयत्न केले.