Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
व्यापार - उद्योग

ऊर्जाक्षेत्रातील गुंतवणुकीसाठी जर्मनी उत्सुक
व्यापार प्रतिनिधी: जगातील सर्वच देशांपुढे ऊर्जा निर्मितीचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे मंदीचा काळ असला तरीही ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील गुंतवणूक वाढवायला हवी, असे मत जर्मनीतील एनआरडब्ल्यू राज्याच्या अर्थ व ऊर्जा विभागाचे उपमंत्री मायकेल गेसनर यांनी आज व्यक्त केले. भारतातील ऊर्जाक्षेत्रात गुंतवणूक करण्यास जर्मनी इच्छुक आहे, असेही त्यांनी सांगितले.
एमसीओ विनमार्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या भारत-जर्मनी संयुक्त प्रकल्पातर्फे चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रामध्ये रिन्यूटेक इंडिया २००९ या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन गेसनर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर मुंबईतील जर्मनीचे कौन्सल जनरल वॉल्टर स्टेचेल, इंडो-जर्मन ऑफ कॉमर्सचे महासंचालक बेर्नहार्ड स्टेनरूकी, इंडिया टेक फाऊंडेशनचे अध्यक्ष इंद्र मोहन, सुझलॉन इन्फ्रास्ट्रक्चर सव्र्हिस लिमिटेडच्या इंडिया बिझनेस विभागाचे अध्यक्ष रोहित मोदी, महाऊर्जाचे महासंचालक महेश झगडे, केंद्र शासनाच्या शाश्वत ऊर्जा मंत्रालयाचे सल्लागार के. पी. सुकुरामन, एमसीओ विनमार्क एक्झिबिशन प्रा. लि.चे संचालक आशिष गुप्ता आदी उपस्थित होते.

‘क्लीयरट्रीप डॉट कॉम’चा ‘इटझ्कॅश’ बरोबर सामंजस्य करार
व्यापार संक्षिप्त

व्यापार प्रतिनिधी: ऑनलाईन व्यवहारांसाठी बँकींग सुविधा उपलब्ध नाही अशा मोठय़ा प्रमाणावरील ग्राहकांना ऑनलाइन प्रवास आरक्षण सुलभ व्हावे म्हणून इट्झकॅशने क्लीअरट्रीप डॉट कॉमबरोबर सहकार्य करार केला आहे.

अ‍ॅ रिस अ‍ॅ ग्रोचा नवीन ‘सूर्योदय’ आणि ‘युनी कनेक्ट’ उपक्रम
व्यापार प्रतिनिधी:
अ‍ॅ रिस अअ‍ॅ ग्रो लि. या स्पेशालिटी मायक्रोन्यूट्रिएंट कंपनीने शेतकऱ्यांसाठी सूर्योदय आणि युनी कनेक्ट हे दोन सीएसआर उपक्रम हाती घेतले आहेत. हा उपक्रम कंपनीने ग्रामीण भागातील मुलांना शेतीच्या विविध पैलूंविषयी प्रशिक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या बाल कृषक संबोधन उपक्रमाला पूरक ठरणार आहे. कंपनीने आतापर्यंत प्रामुख्याने हरयाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तरखंड, कर्नाटक, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांत हा उपक्रम यशस्वीपणे राबवला आहे. या उपक्रमाला देशभरातील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कंपनीला हे उपक्रम आता बाल कृषक संबोधन उपक्रमासोबत कंपनी कार्यरत असलेल्या सर्व २०२ राज्यांत राबवायचा आहे. सूर्योदय आणि युनी कनेक्ट यांचा हेतू शेतकऱ्यांना तंत्रज्ञान, पिकासाठी अनुकूल हवामान, मातीची चाचणी, खतांचे योग्य प्रमाण, पावसाचा कालावधी आदीविषयी माहिती देणे हा आहे. पिकांविषयी भरपूर माहिती देण्यासाठी सूर्योदय हा खास उपक्रम कंपनीने आखला आहे. अॅरिस अॅग्रोने शेतकऱ्यांना कृषीविषयी ताजी आणि महत्त्वाची माहिती देण्यासाठी हा उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. हा उपक्रम कृषी विद्यापीठातील संशोधक आणि प्राध्यापकांचा पाठिंबा असलेल्या अॅरिसच्या तांत्रिक गटातील कृषी व्यावसायिक राबवणार आहेत. कार्यक्रम हाती घेण्यासाठी विद्यापीठातील फॅकल्टी, संशोधक व विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील युवकांशी संवाद साधण्यासाठी युनी कनेक्ट हे उत्तम व्यासपीठ आहे. शेतकऱ्यांना नेमके कोणते प्रश्न भेडसावत आहेत याचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठीही चांगली संधी आहे.

जैन इरिगेशनचा विदेशातून भांडवल उभारणीचा प्रस्ताव
व्यापार प्रतिनिधी:
जैन इरिगेशन संचालक मंडळाने आज १० रुपये किमतीचे २० लाख समभाग इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन, वॉशिंग्टन (आयएफसी)ला देण्याचा ठराव संमत केला. सेबी (डीआयपी)च्या २००० च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरविण्यात आलेल्या किंमतींना हे समभाग प्राधान्य तत्त्वाने देण्यात येणार आहेत. ही गुंतवणूक आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर प्रत्यक्षात येणार आहे. हे फंड कंपनीची बॅलन्सशीट सुधारण्यासाठी आणि कंपनीचा नियमित भांडवली खर्च सुधारण्यासाठी वापरण्यात येणार आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २००९ मध्येही आपल्या एमआयएस/ एसआयएस, पायपिंग आणि अन्नपदार्थ व्यवसायामध्ये भव्य वृद्धी नोंदविली आहे. सरकारने जल आणि कृषी क्षेत्रांना मोठय़ा प्रमाणावर पैसा उपलब्ध करून दिला आहे आणि त्याचमुळे कंपनी येत्या भविष्यकाळात मोठय़ा प्रमाणावर वृद्धी नोंदविण्यास सज्ज झाली आहे. आयएफसीने गेल्या २४ महिन्यांमध्ये कंपनीला ३० दशलक्ष डॉलरचे फंड याआधीच दीर्घ मुदतीने आकर्षक दरांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. त्याशिवाय आणखी ३० दशलक्ष डॉलर दोन टप्प्यांमध्ये भांडवली खर्चासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या फंडामधील महत्त्वाचा भाग कंपनीने मायक्रो इरिगेशन विभागाची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी वापरायचा आहे. या इश्युनंतर प्रस्तावित समभाग एकत्रित भागभांडवलाच्या सुमारे २.६९ टक्के असणार आहे.

‘मर्क इंडिया’द्वारे शार्प अॅण्ड अॅक्टिव्ह उपक्रम
व्यापार प्रतिनिधी:
जर्मनी येथील मर्क एजी या जगातील सर्वात जुन्या औषधी व रसायन क्षेत्रातील कंपनीच्या ग्राहकोपयोगी आरोग्यनिगा विभागाने भारतात ‘शार्प अॅण्ड अॅक्टिव्ह’ उपक्रम सुरू करीत असल्याची घोषणा केली आहे. लोहातील कमतरतेविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. वरवर निरूपद्रवी दिसणाऱ्या त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्षण केल्यास पंडुरोग (अॅनिमिया) उद्भवतो आणि या रोगाची लागण झालेल्या सर्वाधिक लोक असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगातील एक-तृतीयांश लोक अॅनिमियाचे बळी आहेत. लाल रक्तपेशींमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटल्यामुळे ही परिस्थिती उद्भवते. यामुळेच शरीरातील पेशींना ऑक्सिजन पुरवठा होण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. २००६ सालच्या ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सव्र्हे’नुसार जवळपास ५६ टक्के भारतीय महिला अॅनिमियाने पिडित आहेत. वेगाने बदलती जीवनशैली, विभक्त कुटुंबपद्धतीमुळे घरात व घराबाहेरही स्त्रियांना बजवावी लागणारी मुख्य भूमिका, करिअरबाबत महिलांमधील सक्रियता, यामुळे भारतीय महिलांमध्ये आरोग्यविषयक प्रमुख समस्या निर्माण झालेल्या दिसून येतात. केस गळणे, चिडखोरपणा, एकाग्रतेचा अभाव आणि थकवा ही सामान्यपणे लोहाची कमतरता दर्शविणारी लक्षणे आहेत. लोहयुक्त अन्नाचे सेवन पुरेशा प्रमाणात न करणे हे यामागील मुख्य कारण आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी मर्क कन्झ्युमर हेल्थकेअरने ‘फेमिबिअन-शार्प अॅण्ड अॅक्टिव्ह’ हा आहारास पूरक कार्यक्रम आणला असून यामुळे शहरातील स्त्रीला निरोगी जीवनशैलीबरोबरच लोहाच्या कमतरतेवर मात करणे शक्य होईल, असा विश्वास प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. धुरू शाह यांनी व्यक्त केला.