Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९

‘जोडी जमली रे’मध्ये आज रंगतदार फेऱ्या
प्रतिनिधी

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘जोडी जमली रे’ हा विवाह जुळविण्यारा ‘रिअॅलिटी शो’ दणक्यात सुरू झाला आहे. पहिल्या भागात सचिन चव्हाण, सुधीर तावडे आणि दीपक नानेकर हे तरूण, तर तिलोत्तमा मोरे, नेहा भोर आणि डॉ. रश्मी देसाई या तरुणींनी सहभाग घेतला. या तीन जोडय़ांमध्ये विविध इंटरॅक्टिव्ह स्वरुपाचे खेळ खेळण्यात आले.

‘रिहॅब एरिया’च्या टूममुळे म्हाडा इमारतींचा पुनर्विकास पुन्हा धोक्यात?
निशांत सरवणकर

हक्काचे मोठे घर मिळावे म्हणून गेल्या दीड-दोन
वर्षांपासून डोळे लावून बसलेल्या म्हाडा वसाहतींतील एलआययजीवासीयांना (अल्प उत्पन्न गट) प्राधिकरणाच्या नव्या धोरणामुळे पुन्हा अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. म्हाडा वसाहतींतील एलआयजीवासीयांना ३०० चौरस फूट इतका ‘रिहॅब एरिया’ निश्चित करण्याचा अट्टाहास प्राधिकरणाकडून केला जात असल्यामुळे म्हाडा वसाहतींचा पुनर्विकासच धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अतिक्रमणाच्या वेढय़ातील मध्ययुगीन बौद्ध गुंफा सुटकेच्या प्रतीक्षेत
संदीप आचार्य

छत्रपती शिवजी महाराजांचे ऐतिहासिक किल्ले असोत की अतिप्राचीन लेणी, त्यांच्या पुनर्वसन व जपणुकीबाबत राज्य शासन तसेच पुरातत्व विभाग कायमच उदासिन असल्याचे वेळोवेळी दिसून येते. यामुळे अशा ऐतिहासिकदृटय़ा तसेच पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अनेक वास्तू केवळ दुर्लक्षित राहिलेल्या नाहीत तर अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्या आहेत.

..थोडे पुढे!
विनायक परब

उमेदीच्या कालखंडात कलावंत धडपडत असतो. नंतर कधी तरी त्याला स्वतचा सूर सापडतो, शैली सापडते आणि त्यानंतर मग तो वर्षांनुवर्षे तेच ते काम त्याच पद्धतीने करीत राहतो. मग त्याची शैली एवढी परिचित होते की, अगदी झोपेतदेखील कुणालाही त्या कलावंताचे चित्र ओळखता यावे. स्वतची शैली सापडणे ही चांगली गोष्ट असली तरीही त्यातील प्रयोगशीलता संपणे हे त्या व्यक्तीतील कलावंत थांबल्याचे लक्षण असते.

‘मुंबई संस्कृती’ महोत्सव
प्रतिनिधी

इंडियन हेरिटेज सोसायटीच्या वतीने येत्या ७ व ८ मार्च रोजी ‘मुंबई संस्कृती’ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव टाऊन हॉलच्या पायऱ्यांवर होणार आहे. या महोत्सवात संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.

एका भावाची कैफियत
प्रतिनिधी

मुंबईची एकता ग्रुप ही संस्था १९८५ पासून हौशी रंगभूमीवर कार्यरत आहे. या संस्थेतर्फे लोकनृत्य स्पर्धा- एकांकिका स्पर्धा यासारखे सांस्कृतिक उपक्रम हाती घेतले जातात. महाराष्ट्र राज्य नाटय़ स्पर्धेत या संस्थेस अनेक पारितोषिके मिळाली आहेत.

ज्ञानाचा महावृक्ष
‘‘आम्हाला अशी अपेक्षा आहे, नकाशावरील अजूनही अज्ञात असणाऱ्या रिकाम्या जागा भरल्या जातील, शास्त्रज्ञांना हिमराजीतील अनोखं जैववैविध्य, हिमनद्या, प्रस्तरवैभव, जनजीवनाची अधिक माहिती मिळो, गिर्यारोहकांनी शतकानुशतके अज्ञात व अजिंक्य अशा हिमशिखरांवर साहसी आरोहण करतील म्हणूनच आज हिमालयन क्लबची स्थापना होत आहे.’’

‘एकापेक्षा एक’च्या अंतिम फेरीत ठाणेकरांचे वर्चस्व!
प्रशांत मोरे

परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांनी एसएमएसद्वारे पाठविलेली मते यांच्या आधारावर निकाल अवलंबून असणाऱ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील विविध रिअॅलिटी शोजमध्ये बहुतेक स्पर्धेक आपापल्या गावाचे, जिल्ह्याचे अथवा प्रांताचे प्रतिनिधीत्व करताना दिसतात. त्या दृष्टिकोनातून पाहिले तर सध्या झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘एकापेक्षा एक’ या नृत्यविषयक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सध्या तरी ठाणेकरांचे वर्चस्व दिसत आहे.

माजी नगरसेवकाला न्याय कधी मिळणार ?
प्रतिनिधी

शिवडी कोळीवाडा येथील एका रस्त्याला शिवसेनेचे माजी नगरसेवक गणपत महाडिक यांचे नाव देण्याचा ठराव होऊन वर्ष झाले. मात्र या ठरावाची अंमलबजावणी करण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करीत असून सत्ताधारी शिवसेनेलाही या आपल्या माजी नगरसेवकास न्याय देण्यासाठी वेळ नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे महाडिक कुटुंबीयांनी खेद व्यक्त केला आहे. शिवडी कोळीवाडा असे नाव असलेल्या रस्त्यास गणपत महाडिक यांचे नाव देण्याचा ठराव १६ डिसेंबर १९९३ संमत करण्यात आला होता. मात्र या ठरावाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. नंतर या रस्त्याला पालिकेने जोसेफ मिंगेल कोळी यांचे नाव दिले. मात्र पुन्हा एकदा पालिकेने या रस्त्याला महाडिक यांचे नाव देण्याचा ठराव जानेवारी २००८ मध्ये मंजूर केला. हा ठराव होऊनही एक वर्ष उलटून गेले, मात्र ‘एफ-एस’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी या ठरावाची अंमलबजावणी केली नाही. पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र आपल्याच माजी नगरसेवकाला न्याय देण्यासाठी शिवसेनेच्या एकाही नगरसेवकाने प्रशासनाला धारेवर धरले नाही. या विषयी महाडिक कुटुंबीयांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

‘स्त्री मेरे भीतर’चे ८ मार्च रोजी प्रकाशन
प्रतिनिधी

शब्द पब्लिकेशन तर्फे ‘दुसऱ्या रविवारची शब्द संध्या’ या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध हिंदी कवी पवन करण यांच्या ‘स्त्री मेरे भीतर’ या हिंदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवार, ८ मार्च रोजी करण्यात येणार आहे. बोरीवली (पश्चीम), एम.एच.बी कॉलनी जवळील सायली इंटरनॅशनल शाळेच्या सभागृहात संध्याकाळी ७.०० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जेष्ठ कवी व लेखक नामदेव ढसाळ यांच्या हस्ते या कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. लेखिका मेघना पेठे या कवितासंग्रहावर भाष्य करणार आहेत. त्याचबरोबर कवी पवन करण या कवितासंग्रहाचे तर मल्लिका अमरशेख आणि बलवंत जेऊरकर मराठीतील कवीतांचे वाचन करतील. हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य आहे.

लक्ष्मीबाई वडवलकर यांचे निधन
प्रतिनिधी

लक्षमीबाई काशिराम वडवलकर यांचे नुकतेच ताडदेव येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ७८ होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, ४ मुलगे असा परिवार आहे.
महाराष्ट्र टाईम्सचे माजी वार्ताहर आणि आजची नवी मुंबई या दैनिकाचे संपादक सुरेश वडवलकर हे त्यांचे पुत्र आणि वारकरी पंथाचे काशिराम उर्फ दादा वडवलकर यांच्या त्या पत्नी होत.

‘हा हसरा संसार’ येतंय..
प्रतिनिधी

डॉ. अविनाश कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित ‘हा हसरा संसार’ हे कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक मार्चच्या पहिल्या आठवडय़ात रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचे नेपथ्य- प्रकाशयोजना ज्ञानेश्वर आंगणे यांची असून, विजय गोखले यांच्या गीतांना अनंत पांचाळ यांनी संगीत दिले आहे. स्वप्नील बांदोडकर आणि उत्तरा केळकर यांनी ही गाणी गायिली आहेत. अरुण कानविंदे पाश्र्वसंगीताची बाजू सांभाळत आहेत. नयना आपटे, जनार्दन परब, माधवी दाभोळकर, पूर्वा वायकर, पद्माकर आठवले, घन:श्याम गावकर, प्रीतेश पोटे, सचिन फाटक, अल्ताफ पठाण आणि सतीश तारे यांच्या या नाटकात भूमिका आहेत. श्री वज्रेश्वरीदेवी प्रॉडक्शन या बॅनरखाली निर्माते गणेश गोपाळ जोशी यांनी या नाटकाची निर्मित केली असून, निर्मितीप्रमुख आहेत संजय बांदेकर व राकेश यादव. नाटकाचे सूत्रधार परमानंद पेडणेकर आहेत.