Leading International Marathi News Daily शनिवार, ७ मार्च २००९
  समतेसाठी पुरुषांचा पुढाकार
  स्त्री-पुरुष समतेचा गोफ
  स्त्रीत्वाचा सोयीस्कर अर्थ
  शाळेसह व्यापक कुटुंब
  थांब, माझ्या संसाराला...
  विज्ञानमयी
  गर्भासंबंधीचा कायदा
  'संवाद' सखी
  स्त्री-मनातले क्षितीज
  माळाकोळीतील दारूबंदी लढा!
  आगळीवेगळी क्षमा
  संसारकथा
  ताई आपटे : एक प्रेरणास्रोत
  मधुघटचि रिकामे
  कावळा
  प्रतिसाद
  हर्बिन : पूर्वेकडील मॉस्को!
  गाडी बुला रही है!

समानतेसाठी आम्ही!
स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

  सुधा भट्टाचार्य
भारतीय फाळणीच्या वेळी सुधाचे कुटुंब पंजाबातल्या एका लहानशा गावातून नवी दिल्लीला आले. तिच्या आईने तेथे प्रथमच कॉस्मॉपॉलिटन समाज पाहिला आणि ती फार प्रभावित झाली. ते मद्रासी, बंगाली पाहा, कसे साधे राहतात आणि खूप खूप शिकतात! आपणही तसेच व्हायचे, असे तिने ठरवले. परवडत नव्हते तरी पतीकडे हट्ट करून मुलांना महागडय़ा इंग्लिश मीडियम शाळेत घातले. छोटय़ा सुधाने तेथे उत्तम मार्क्‍स मिळवून दाखवले. मग काय! मुलगेसुद्धा जिथे विश्वविद्यालयीन शिक्षण घेण्याची मारामार, तिथे सुधाच्या आईने तिला कॉलेजमध्ये पाठवले. अर्थात तिची उच्च शिक्षणाची कल्पना म्हणजे मुलीने बी.ए.- बी.एड. करायचे; शाळेत शिक्षिका व्हायचे आणि नंतर विवाह करून संसार थाटायचा, इतपतच होती. आणि सुधाची सायन्सची व्याख्या ‘स्कोअरिंग सब्जेक्ट’ एवढीच होती. अकरावीत गेल्यावर जेव्हा तिला आनुवंशशास्त्राचा व डीएनए (DNA) च्या दुहेरी गोफाचा प्रथम परिचय झाला तेव्हा तिला सायन्सची खरी गोडी लागली. मात्र, नॅशनल सायन्स टॅलन्ट परीक्षेसाठी तिच्या शाळेची
 
मुंबईच्या टीमबरोबर गाठ पडली आणि आपण किती कच्चे आहोत, हे जाणवून ती अगदी खट्टू झाली.
पुढे बी.एस्सी.च्या शेवटच्या वर्षी त्यांना एक अत्यंत प्रभावशाली शिक्षक भेटले. वनस्पतींचे शरीरविज्ञान ते इतक्या तन्मयतेने शिकवीत, की प्रकाशाचे सूक्ष्म कण वनस्पतींमधील हरितद्रव्यावर पडून ते उत्साहित होत आहेत, विद्युत्कार घेत आहेत व आपण हे प्रत्यक्ष अनुभवतो आहोत, असे विद्यार्थ्यांना वाटे. तिच्यातील संशोधक जागृत झाला तो इथेच. रेणूंचे जीवशास्त्र (Molecular Biology) शिकावेसे तिला वाटू लागले. त्यासाठी जीवरसायनशास्त्रात एम.एस्सी. करणे प्राप्त होते. ते दिल्लीतच करायचे म्हटले तर इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च ICAR फक्त होते आणि त्यांच्याकडे अवघ्या दोनच जागा होत्या. सुधाने त्यातली एक मिळवली. जीवनाचा नवीन प्रवाह सुरू झाला. सुधाच्या मनासारखा आणि आईच्या मनाविरुद्ध! कारण तिने लेकीला लग्नाचा आग्रह चालवला होता.
I.C.A.R. मध्ये सुधाला उत्तम गुरूजन भेटले. त्यांनी रेणूपातळीवर जीवशास्त्र, अनुवंशशास्त्र, जीवशास्त्रीय उत्प्रेरके (विकर) वगैरे विषय समरसून शिकवले. तिला त्यात अधिकाधिक रस वाटू लागला. गोडीगुलाबीने आईचे मन वळवून तिने दिल्लीतच या विषयात १९७७ साली पीएच. डी. केली. पोस्ट डॉक्टरल अभ्यासासाठी तिला फेलोशिप मिळाल्यावर मात्र आईने आक्षेप घेतला नाही. स्त्रीला संसाराशिवायदेखील काही जग असू शकतं, हे तिला पटलं असावं. पुढे आई स्वत:च फावल्या वेळात गरीब मुलांना विनावेतन शिकवायला जाऊ लागली. मात्र, आईच्या सुरुवातीच्या विरोधामुळेच आपण कणखर बनलो, असं सुधाला वाटतं.
यथावकाश सुधाने विवाह केला. तोही तिच्याच विषयातल्या एका बंगाली शास्त्रज्ञाबरोबर. त्यांना एक मुलगी आहे. पतीच्या संपूर्ण सहकार्याने व स्वत:च्या जिद्दीमुळे ती संशोधन, संसार, अपत्य संगोपन असं सर्व काही व्यवस्थित सांभाळू लागली. सध्या ती नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये असोसिएट प्रोफेसर आहे. तिला रॉकफेलर बायोटेक्नॉलॉजी अ‍ॅवॉर्ड मिळाले आहे. शास्त्रीय संशोधनाविषयी सुधा भट्टाचार्य म्हणते, ‘संशोधनातून प्रसिद्धी व पैसा मिळेल ही अपेक्षा तुम्ही ठेवत असाल तर तुम्हाला फारच अल्पसंतुष्ट म्हणावे लागेल. शुद्ध मूलभूत संशोधन संशोधकाला सत्यम- शिवम- सुंदरम्चा प्रत्यय देते.’
सुलोचना गाडगीळ
सुलोचनाबाई गाडगीळ या पुण्याच्या. त्यांचे माहेर-सासर दोन्ही घराणी विद्वान व स्त्रियांच्या उच्च शिक्षणास उत्तेजन देणारी होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण ऋषी व्हॅलीमध्ये झाले. त्यांनी पुण्यातच फग्र्युसन कॉलेजमध्ये अ‍ॅप्लाइड मॅथ्स (उपयोजित गणित) घेऊन एम. ए. केले. त्याच सुमारास त्यांचा सहाध्यायी माधव गाडगीळ यांच्याशी विवाह झाला. दोघांनाही उच्चतम शिक्षणासाठी हार्वर्ड (अमेरिका) येथे शिष्यवृत्ती मिळाली.
तेथील अभ्यासासाठी सुलोचनाबाईंनी गणित आणि निसर्ग या आपल्या आवडींशी निगडित ‘महासागरांवर भौतिकशास्त्राचे परिणाम’ हा विषय निवडला. प्रो. रॉबिन्सन यांच्याबरोबर या विषयाचा अभ्यास करत असतानाच माधवरावांमुळे ‘पर्यावरण- गणिताच्या दृष्टिकोनातून’ आणि ‘जीवशास्त्रातील उत्क्रांतीवाद’ या विषयांतही त्यांनी काही काम केले. विषुववृत्तावरील वातावरणाचे तज्ज्ञ प्रो. ज्यूल्स चर्नी यांच्याबरोबर ‘पृथ्वीवरील प्रवाहांचे गतिशास्त्र’ या विषयातही त्यांनी विशेष अभ्यास केला. आणि या सर्वाचा परिणाम म्हणून पीएच.डी.नंतर मान्सून (मोसमी वारे व पाऊस) या अत्यंत आव्हानात्मक विषयाचा प्रो. चर्नी यांच्याबरोबर MIT (मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) येथे त्यांनी आणखी एक वर्ष अभ्यास केला.
१९७१ मध्ये ते दोघे भारतात परत आले. सुलोचनाबाई इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटेऑरॉलॉजी येथे कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्चचे काम पाहू लागल्या. दोन वर्षे विषुववृत्तावरील वातावरणाचे तज्ज्ञ आर. अनंतकृष्णन आणि मान्सूनविषयक तज्ज्ञ डी. आर. सिन्हा यांच्यासमवेत काम केल्यानंतर तर त्यांची ‘मान्सून’शी आयुष्यभराची मैत्री जडली.
बंगलोरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सचे तेव्हाचे डायरेक्टर सतीश धवन यांनाही मान्सूनचे प्रचंड आकर्षण व आव्हान वाटत होते. त्यांनी या विषयाचा सांगोपांग अभ्यास करण्यासाठी CTS (सैद्धांतिक अभ्यास केंद्र) नावाची स्वतंत्र शाखा स्थापून तिथे सुलोचनाबाई व माधवराव यांना तसेच इतर काही शास्त्रज्ञांना निमंत्रित केले. तेथे या सर्वाबरोबर बरीच वर्षे काम करून सुलोचनाबाईंनी प्रचलित पद्धतीने तसेच उपग्रहाद्वारे माहिती मिळवून मान्सूनविषयी ‘का व कसे’ याचा अभ्यास केला. त्यांनी दाखवून दिले की, हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय प्रदेशावर मान्सूनच्या मोसमात ढगांचे पट्टे तयार होतात. ते थोडय़ा थोडय़ा आठवडय़ांच्या अंतराने उत्तरेकडे सरकत राहतात. म्हणजेच मान्सूनचा (पावसाचा) अनियमितपणा या ढगांच्या निर्मितीवर अवलंबून असतो व हे ढग निर्माण होणे सागराच्या पृष्ठभागाच्या तापमानावर अवलंबून असते.
आपल्या कृषिप्रधान देशात पाऊस नेमका कधी पडेल, याची माहिती मिळणे फारच महत्त्वाचे आहे. बाईंनी कर्नाटकसारख्या कमी पावसाच्या प्रदेशात शेतकऱ्यांत प्रत्यक्ष वावरून त्यांना शेती व पाऊस यांचा योग्य मेळ कसा साधावा, त्यामुळे उत्पादनात कशी वाढ होते, हे दाखवून दिले!
मान्सूनचा अभ्यास म्हणजे व्यवस्था आणि गोंधळ यांचा आश्चर्यकारक मिलाफ! बाईंना त्यात खूप आनंद मिळतो. त्यांनी संशोधनाकडे स्पर्धा म्हणून कधीच बघितले नाही. स्त्री म्हणून भेदभावही त्यांना कधी जाणवला नाही. त्यांना पुष्कळ मानसन्मानही मिळाले.. हरिओम् अ‍ॅवॉर्ड, अ‍ॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी अ‍ॅवॉर्ड आणि नॅशनल अ‍ॅवॉर्ड फॉर लाइफटाइम अचिव्हमेंट इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, वगैरे. आज एक संशोधक म्हणून तसेच एक गृहिणी, माता, आजी म्हणून त्या सर्वतोपरी सुखी आयुष्य व्यतीत करीत आहेत. सर्वच बाबतीत पती माधवराव गाडगीळ यांचे सहकार्य व प्रोत्साहन त्यांना मिळाले, हे त्या कृतज्ञतेने मान्य करतात.
वसुमती धुरू