Leading International Marathi News Daily शनिवार, ७ मार्च २००९
  समतेसाठी पुरुषांचा पुढाकार
  स्त्री-पुरुष समतेचा गोफ
  स्त्रीत्वाचा सोयीस्कर अर्थ
  शाळेसह व्यापक कुटुंब
  थांब, माझ्या संसाराला...
  विज्ञानमयी
  गर्भासंबंधीचा कायदा
  'संवाद' सखी
  स्त्री-मनातले क्षितीज
  माळाकोळीतील दारूबंदी लढा!
  आगळीवेगळी क्षमा
  संसारकथा
  ताई आपटे : एक प्रेरणास्रोत
  मधुघटचि रिकामे
  कावळा
  प्रतिसाद
  हर्बिन : पूर्वेकडील मॉस्को!
  गाडी बुला रही है!

समानतेसाठी आम्ही!
स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

  राष्ट्रसेविका समितीच्या दुसऱ्या प्रमुख संचालिका ताई (सरस्वतीबाई) आपटे यांची यंदा जन्मशताब्दी साजरी होत आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या कार्याचा हा परिचय..
टिळकांचे भाचे नाना विद्वांस यांच्या ताई आपटे या कन्या. कोकणातील आंजर्ले गावी त्यांचा १७ मार्च १९१० रोजी जन्म झाला. तिचे नाव तापी ठेवण्यात आले. तिचे बालपण केळशीला विद्वांसांच्या घरी गेले. नंतर वडिलांच्या नोकरीमुळे हे कुटुंब पुण्याला आले. तापीने सातवीची परीक्षा दिली. त्यानंतर तेव्हाच्या रीतीप्रमाणे तापीचे लग्न विनायकराव आपटे या पेशाने शिक्षक असलेल्या तरुणाशी झाले. पुढे वकिलीची सनद घेऊन ते वकिली करू लागले. तापी (ताई) सावळ्या, ठेंगण्या होत्या, तरी टिळकांची नात म्हणून त्यांनी तिला पसंत केलं.
विनायकराव आपटे यांच्याकडे भारतीय मित्र मंडळाचे लोक येत, चर्चा करीत. ताई (सरस्वतीबाई) स्वैंपाकघरात काम करता करता या चर्चा ऐकत. रा. स्व. संघाचे संस्थापक आणि आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी विनायकरावांना पुण्यात
 
संघचालक म्हणून नेमले. त्यामुळे संघाचे अधिकारी, स्वयंसेवक यांचेही जाणे-येणे सुरू झाले. ताई सर्वाची उत्तम बडदास्त ठेवत.
रा. स्व. संघाचे काम जवळून बघितल्यावर महिलांसाठीही अशा कार्याची गरज आहे, असे वाटल्याने ताईंनी १९३६ साली आपल्या घरीच बायकांना जमवून काम सुरू केले. बकुळ नातू (देवकुळे) यांनी लेझीम व लाठीकाठीचे शिक्षण पाहून ताईंनी मुलींसाठीही काम सुरू केले.
असेच महिलांचे काम ‘राष्ट्रसेविका समिती’ या नावाने लक्ष्मीबाई (मावशी) केळकर यांनी वध्र्याला १९३६ साली सुरू केले होते. त्यांनी डॉ. हेडगेवारांशी चर्चा करून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे शाखा सुरू केली. त्याच सुमारास भंडारा व अकोला येथेही महिलांचे काम सुरू झाले होते. सरसंघचालकांच्या सांगण्यावरून सर्व ठिकाणचे काम एकत्रित करण्याच्या हेतूने ताईंना भेटायला लक्ष्मीबाई केळकर पुण्याला आल्या. क्षणाचाही विलंब न लावता ताईंनी या गोष्टीस संमती दिली. मावशी केळकरांनी ताईंना पुण्याच्या प्रमुख म्हणून व नंतर अ. भा. कार्यवाहिका म्हणून नेमले. कुठलेही काम नियोजनपूर्वक व चोख करण्याच्या स्वभावामुळे ताईंनी खूप शाखा वाढविल्या. देशभर दौरे केले. खूप लोकसंग्रहही केला.
विनायकरावांनी संघाच्या कामाला जास्त वेळ देता यावा म्हणून वकिली बंद केली. त्यामुळे ताईंना कठीण आर्थिक प्रसंगांना तोंड द्यावे लागले. घरची थोडी शेती होती, तेवढाच आधार. १९६२ साली चिनी आक्रमणाच्या वेळी, तसेच १९६५ सालच्या पाकिस्तानशी झालेल्या युद्धाच्या वेळीही सैनिकांना भेटी पाठविणे, त्यांना स्टेशनवर डबे देणे, प्रथमोपचाराचे वर्ग, नेमबाजीचे शिक्षण वगैरे काम सुरू झाले. देशभक्तीला त्यांनी कृतीची जोड दिली. १९६५ साली पानशेतचे धरण फुटून हाहाकार झाला तेव्हा ताईंनी अहोरात्र खपून अनेकांना मदत केली.
१९६७ साली विनायकरावांना कॅन्सर झाला. मुंबईला आणून उपचार करूनही यश अाले नाही. ताईंनी हे दु:ख धैर्याने सोसले. ताईंचे काम जवळून पाहिल्यावर केळकर मावशींनी पुण्याला अ. भा. स्तरावरील सेविकांचे संमेलन घेण्याचे ठरविले. ताईंच्या नियोजन व परिश्रमांमुळे संमेलन यशस्वी झाले. हजारो सेविका त्यास आल्या होत्या.
१९७२ साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला तेव्हा राऊतवाडी हे गाव दत्तक घेऊन तिथे काही र्वष नियमितपणे जाऊन ताईंनी आवश्यक ती मदत केली. त्यामुळे तेथील लोक त्यांना ‘या आमच्या आई आहेत,’ असं म्हणत. त्याचप्रमाणे विडी कामगारांच्या वस्तीत नियमित जाऊन त्यांनी त्यांना स्वच्छता, शिक्षण, खाण्यापिण्याच्या सवयी याबद्दल मार्गदर्शन केले. लो. टिळकांना ‘तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी’ म्हणत. त्यांच्या या नातीनेही आयुष्यभर तळागाळातल्या लोकांमध्ये जाऊन काम केले.
ताईंच्या अमृतमहोत्सवानिमित्त ठिकठिकाणी त्यांचा सत्कार करून त्यांना निधी देण्यात आला. त्या निधीत स्वत:ची भर घालून तो त्यांनी नागपूरच्या श्रीशक्तिपीठाला दिला. एका कार्यक्रमात ब्रह्मचारी विश्वनाथजींनी त्यांना ‘लोकमाता’ संबोधून त्यांचा गौरव केला. केळकर मावशींच्या निधनानंतर ७८ साली त्यांच्या इच्छेनुसार ताई आपटे वयाच्या ६९ व्या वर्षी राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका झाल्या. वध्र्याला देवी अष्टभुजेचे मंदिर, नागपूरला अहल्यादेवी मंदिर, नाशिक येथे राणी लक्ष्मीबाई भवन या वास्तू समितीने उभारल्या, तसेच पुण्याला जिजामाता स्मारकही उभारले.
‘गरिबीला लाजू नका, श्रीमंतीने माजू नका, कोणी सल्ला मागितला तरच द्या,’ असे त्यांचे व्यावहारिक सांगणे असे. ‘बोले तैसा चाले’ हा अनुभव त्यांच्या वागण्यातून येत असे. गीता, दासबोध आचरणात आणणाऱ्या ताईंनी ९ मार्च १९९४ रोजी रात्री झोपेत या जगाला रामराम केला. त्याआधी त्यांनी उषाताई चारी यांना सहसंचालिका नेमले होते, त्यांच्यावर समितीचा कार्यभार सोपवून त्या नििश्चत मनाने मृत्यूला सामोऱ्या गेल्या.
मंदाकिनी बखले