Leading International Marathi News Daily शनिवार, ७ मार्च २००९
  समतेसाठी पुरुषांचा पुढाकार
  स्त्री-पुरुष समतेचा गोफ
  स्त्रीत्वाचा सोयीस्कर अर्थ
  शाळेसह व्यापक कुटुंब
  थांब, माझ्या संसाराला...
  विज्ञानमयी
  गर्भासंबंधीचा कायदा
  'संवाद' सखी
  स्त्री-मनातले क्षितीज
  माळाकोळीतील दारूबंदी लढा!
  आगळीवेगळी क्षमा
  संसारकथा
  ताई आपटे : एक प्रेरणास्रोत
  मधुघटचि रिकामे
  कावळा
  प्रतिसाद
  हर्बिन : पूर्वेकडील मॉस्को!
  गाडी बुला रही है!

समानतेसाठी आम्ही!
स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

  बीजिंगपासून साधारण दोन तासांचा विमानप्रवास करून उत्तरेकडील हेलाँगजिएँग प्रांताच्या राजधानीत म्हणजेच हर्बिनमध्ये आलो. सुमारे १०० वर्षांपूर्वी मासेमारीसाठी प्रसिद्ध असणारं हे लहानसं बंदर ब्रिटिशांनी पाहिलं आणि चीनच्या भूमीवर पहिलं पाऊल टाकलं. हा प्रांत हंस पक्ष्याच्या आकाराचा आहे आणि हर्बिन शहर हे या प्रांताच्या गळ्यातील मोती म्हणून ओळखलं जातं. असं विशेषण मिरवणारं हे शहर अतिशय सुंदर आहे. युरोप-आशियातील प्रथम पूल म्हणून ते नावारूपाला आलं. आजही या शहरात १०० वर्षांपासून असलेली जगप्रसिद्ध ब्रिटिश ब्रँडस्ची दुकानं दिमाखात उभी आहेत. ब्रिटिशांनी व्यापार सुलभ व्हावा म्हणून चीनमधील पहिली रेल्वे इथूनच सुरू केली. रशियाची सीमारेषा या शहरापासून अगदी जवळ आहे. असं म्हणतात की, इथून रशियाला सकाळी जाऊन संध्याकाळी परतसुद्धा येता येतं. अतिशयोक्तीचा भाग सोडला तर खरंच एकूण शहराचा नूर बघितला
 
तर मॉस्को शहराची आठवण प्रकर्षांने येते. म्हणूनच या शहराला पूर्वेकडील मॉस्कोसुद्धा म्हणतात. आणि हिवाळ्यात हवामानसुद्धा रशियासारखंच म्हणजे २५ ते २८ सेंटिग्रेडपर्यंत जातं. रशियाचा परिणाम एवढा आहे की, हर्बिनमध्ये रशियन स्ट्रीट म्हणून एक पूर्ण मोठा रस्ताही आहे. एकूण हर्बिनमधील इमारती, चर्चेस वगैरे सुद्धा रशियातील वास्तूंची आठवण करून देतात. इतकं, की क्षणभर वाटावं, आपण रशियातचं आहोत! बऱ्याचशा हर्बिनवासीयांना रशियन भाषा अस्खलितपणे येते. येथील लोकांना रशियन संस्कृती, रशियन नाचाचे प्रकार, रशियन राहणीमान यांचं जबरदस्त आकर्षण आहे.
ईशान्येला असल्यामुळे हर्बिनचा हिवाळा फारच असह्य़ असतो. संपूर्ण हिवाळा येथील हवामान उणे अंश सेल्सिअसमध्येच असतं. शहराच्या बाजूने जाणारी साँगहूआ नदी पूर्णपणे गोठून जाते. या नदीचं पात्र इतकं मोठं आहे, की समुद्रच वाटावा! एकूणच चिनी माणूस इतका कामसू आणि नवीन नवीन गोष्टी निर्माण करण्याची क्षमता असणारी, कलासक्त आणि कुठल्याही परिस्थितीत स्थितप्रज्ञ असणारा आहे. निसर्गाच्या प्रत्येक कलेचा फायदा करून घेणारा आहे. असा हा चिनी माणूस इतकं मोठं नदीचं पात्र बर्फ झालेलं फार र्वष गप्पपणे पाहू शकला हेच आश्चर्य वाटण्यासारखं! परंतु मागच्या दहा वर्षांपासून हर्बिनमध्ये ‘आइस अ‍ॅण्ड स्नो फेस्टिव्हल’ सुरू करून त्यांनी आपल्यातील कलात्मकता सिद्ध केली आहे. नदीच्या पात्रातील बर्फ झालेल्या पाण्याचे मोठमोठाले ब्लॉक्स काढून त्यापासून मोठमोठाले बंगले, चर्चेस, बिल्डिंग्ज, अगदी हुबेहूब फॅक्टरी बनवून त्याचं प्रदर्शन ‘आइस अ‍ॅण्ड स्नो फेस्टिव्हल’ म्हणून साजरा करतात. हिवाळ्यात अनेकदा बर्फ पडत असल्यामुळे आणि सततच उणे तापमान असल्यामुळे ती वितळत नाही, तो पांढराशुभ्र बर्फ एकत्र करून त्यापासून निरनिराळे डिस्ने व्यक्तिरेखा, वेगवेगळ्या मूर्ती आणि सुंदर शिल्प तयार करून त्याचंसुद्धा प्रदर्शन खरोखरच चिनी लोकांनीच करावं. या प्रकारचं जगातील हे एकमेव प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात आता जगातील इतर भागांतूनसुद्धा वास्तुशिल्पकार येऊन आपल्या कलेचं प्रदर्शन करतात. आता या शिल्पांसाठी स्पर्धासुद्धा ठेवल्या जातात. आणि सगळ्यात गंमत म्हणजे हे आइस एक्झिबिशन नदीच्या पात्रातच उभं केलं जातं. कारण बर्फ वितळल्यावर त्याचं पाणी नदीतच जावं म्हणून! बर्फ झालेल्या नदीवर पांढऱ्याशुभ्र बर्फाचा जाड थर असतो. आपल्याला सुद्धा त्यावर चालायचं म्हणजे कसरतच असते. आधीच अंगावर असलेल्या भरपूर हिवाळी कपडय़ांचं वजन सांभाळत चालायचं, ते सुद्धा बर्फावर! पण खरंच अनुभव घ्यावा असे हे जगावेगळं प्रदर्शन! बर्फानीच बांधलेली कॉफी हाऊसेस, बर्फाच्याच घसरगुंडय़ा, बर्फापासून बनवलेली निरनिराळी वास्तुशिल्पं.. सगळंच आश्चर्यचकित करणारं, हे सगळं बघताना आपल्याला इतकी थंडी वाजतेय, हे सुद्धा विसरायला होतं. अहो, चक्क त्या बर्फावर आम्ही नाचसुद्धा केला! हर्बिन शहराचा हा जगावेगळा हिवाळा!
या शहरातला उन्हाळासुद्धा असाच जगप्रसिद्ध! इतकं मोठं पात्र असलेली ही साँगहुआ नदी, उन्हाळ्यात खळखळत वाहत असते. पाण्यातले निरनिराळे अडथळे, वॉटर राफ्टिंगसाठी आकर्षित करतात. त्यामुळे उन्हाळ्यातसुद्धा या छोटेखानी शहरात र्पयटकांची खूप गर्दी असते. उन्हाळ्यात त्या शहरात सगळीकडे फुलांची रेलचेल असते. चिनी लोकसुद्धा फुलांचे वेडे आहेत. त्यांच्या कलात्मकतेने ते फुलांचे निरनिराळे ताटवे अगदी रस्त्या-रस्त्याला तयार करतात. जणू काही पूर्ण शहर म्हणजे फुलांची बागच! अशा निरनिराळ्या पुलाच्या रंगांनी आणि सुगंधांनी धुंद झालेल्या शहराकडे पर्यटक फिरकले नाहीत तरच नवल! त्यातून जगप्रसिद्ध ब्रँडसची दुकानं अगदी पॅरिससारख्या फॅशनेबल ललना. उन्हाळ्यात हे सगळं इतकं पाहायला मिळतं! त्यामुळेच कदाचित या शहराला पूर्वेकडील पॅरिसही म्हटलं जातं. हर्बिनचं आणखीन एक आकर्षण म्हणजे टायगर पार्क. या पार्कमध्ये वाघोबा अगदी मोकळे असतात बरं का! आपणच चालायचं पिंजऱ्यामधून.. तारा लावलेल्या पिंजऱ्यातून! हिवाळ्यात तर चक्क पडलेला बर्फ खातात हे वाघोबा! चिनी लोकांनी चक्क वाघ आणि सिंह यांचा संकर करून एक नवा प्राणी जन्माला घातला आहे आणि त्याला ते Liogar (Lion + Tiger) म्हणतात. अशी दोन पिल्लं आहेत. बघायचं अजून काही काळाने ती मोठी होतील तेव्हा कशी दिसतील ते!

असा हा चिनी माणूस सतत नावीन्य जपणारा, नावीन्याची आस असणारा! आणि आपल्या पूर्वापार गोष्टींना जपणाराही! आपलं हे वेगळेपण आता जगापुढे उघड करणारा चिनी माणूस तसा वेगळ्या अर्थानी बदनामही आहे, सगळ्या जगप्रसिद्ध ब्रँड्सची कॉपी करून तीसुद्धा स्वस्त आणि न टिकणारी बनविण्यात तो माहीर आहे. परंतु त्यांची कला आणि त्यांच्यातील उद्यमशक्ती (उद्योजकता), कामसू वृत्ती यामुळे आज चीननी जगावर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. पर्यटक कंपन्यांनीसुद्धा चीनमधील शहरं दाखविण्यापेक्षा अशा काही भागांच्या पर्यटनांची तयारी करावी. तेव्हा चला चीन 'Explore' करूया.
रेखा रबडे
rekharani10@hotmail.com