Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

डोळ्याला झालेल्या जखमेबद्दल चोवीस हजारांची नुकसानभरपाई
कोल्हापूर, ६ मार्च / प्रतिनिधी

 

दगड मारून डोळ्यास गंभीर इजा केल्याच्या आरोपावरून समीर कुलकर्णी व प्रमोद जाधव यांनी फिर्यादी युवराज चौगुले याला २४ हजार रूपयांची नुकसान भरपाई द्यावी असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एच.जाधव यांनी यासंदर्भातील खटल्याचा निकाल देताना केला आहे.
बालाजी पार्क येथे समीर कुलकर्णी, प्रमोद जाधव आणि युवराज चौगुले यांच्या दरम्यान किरकोळ कारणावरून वादावादी झाली. या वादावादीत समीर आणि प्रमोद या दोघांनी युवराज चौगुले याला मारहाण केली. त्यांनी फेकून मारलेला दगड युवराज चौगुले याच्या डोळ्यास लागला. त्यामुळे डोळ्यास गंभीर इजा पोहोचली. जुना राजवाडा पोलिसांनी समीर कुलकर्णी, प्रमोद जाधव या दोघांच्याविरूध्द प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटला दाखल केला होता. दोघांच्यावरही गुन्हा शाबित झाल्यामुळे न्यायदंडाधिकारी जाधव यांनी आरोपींना शिक्षा ठोठावण्याऐवजी जखमी युवराज चौगुले याला २४ हजार रूपयांची नुकसान भरपाई द्यावी असा आदेश दिला. या खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून सचिन कोरे यांनी काम पाहिले.