Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सांगली लोकसभा मतदारसंघात १६८१ मतदान केंद्रे निश्चित
सांगली, ६ मार्च/प्रतिनिधी

 

सांगली लोकसभा मतदारसंघात १४ लाख ८६ हजार ३५१ इतके मतदार असून, या मतदारसंघात दि. २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी एक हजार ६८१ इतकी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी दिली.
सांगली लोकसभा मतदारसंघात जिल्ह्य़ातील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ व जत या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या लोकसभा मतदारसंघांत सात लाख ५९ हजार २२० पुरुष, तर सात लाख २७ हजार १३१ स्त्री मतदारांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्य़ातील इस्लामपूर व शिराळा हे दोन विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आले आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रे, पुरुष, महिला व एकूण मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे- सांगली विधानसभा मतदारसंघ- (मतदान केंद्रे २५०), पुरुष १३८७१७, स्त्री १३२०३९, एकूण मतदार २७०७५६, मिरज- (मतदान केंद्रे २८०), पुरुष १३५३४४, स्त्री १२८५०८, एकूण मतदार २६३८५२, पलूस- कडेगाव (मतदान केंद्रे २६७), पुरुष ११६८४८, स्त्री ११३२०६, एकूण २३००५४, खानापूर- (मतदान केंद्रे ३३१), पुरुष १३४२३०, स्त्री १३००१०, एकूण २६४२४०, तासगाव-कवठेमहांकाळ- (मतदान केंद्रे २८५), पुरुष १२१५०९, स्त्री ११८२७४, एकूण २३९७८३, जत विधानसभा मतदारसंघ- (मतदान केंद्रे २६८), पुरुष ११२५७२, स्त्री १०५०९४, एकूण २१७६६६.