Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

कर्जत पालिका विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड
कर्जत, ६ मार्च/वार्ताहर

 

कर्जत नगर परिषदेच्या सर्व विषय समिती सभापती आणि सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या स्थायी समितीसह सर्वच विषय समित्यांच्या सभापतींची आणि सदस्यांची निवड बिनविरोधपणे व्हावी, याबाबत सर्वसंबंधित राजकीय पक्षांचे एकमत झाल्यामुळेच हे शक्य झाले.
या निवडणुकीसाठी कर्जत नगर परिषदेच्या सभागृहामध्ये एका विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. पीठासीन अधिकारी नंदकुमार करणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला नगराध्यक्ष शरद लाड, उपनगराध्यक्षा अस्मिता मोरे, माजी उपनगराध्यक्ष राहुल डाळिंबकर यांच्यासह वंदना भोईर, गुरुनाथ पालकर, दीपक मोरे, राम वाघमारे, नितीन सावंत, भालचंद्र जोशी, नीलेश घरत, स्मिता हजारे, सुप्रिया चव्हाण, नीलेश हरिश्चंद्रे, सुनंदा कांगणे, शुभांगी जाधव, स्मिता पतंगे आणि यमुताई विचारे हे नगरसेवक उपस्थित होते.
नगराध्यक्ष लाड यांनी कर्जत नगर परिषदेतील शिवसेनेचे गटनेते नितीन सावंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते भालचंद्र जोशी यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची निवड बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसारच संबंधित पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले गेल्यामुळे सर्व सभापती आणि सदस्यांची निवडणूक बिनविरोध करण्यात आली असल्याचे पीठासीन अधिकारी करणे यांनी रीतसर घोषित केले. विविध विषय समित्यांसाठी निवड झालेल्या सभापती व सदस्य असे आहेत- (१) स्थायी समिती- शरद लाड (सभापती), तसेच अस्मिता गोरे, गुरुनाथ पालकर, दीपक मोरे आणि स्मिता पतंगे (सर्व सदस्य). (२) सार्वजनिक बांधकाम नियोजन व विकास समिती- गुरुनाथ पालकर (सभापती), तसेच शुभांगी जाधव, नीलेश घरत आणि नीलेश हरिश्चंद्रे (सर्व सदस्य). (३) स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती- अस्मिता मोरे (सभापती), तसेच वंदना भोईर, राहुल डाळिंबकर आणि नितीन सावंत (सर्व सदस्य). (४) पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती- दीपक मोरे (सभापती), तसेच राम वाघमारे, भालचंद्र जोशी आणि यमुताई विचारे (सर्व सदस्य). (५) महिला व बालकल्याण समिती- स्मिता पतंगे (सभापती), सुनंदा कांगणे (उपसभापती), तसेच सुप्रिया चव्हाण आणि स्मिता हजारे (सदस्या).