Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

अनगाव येथील वैद्यकीय शिबिरात ३३० मुलांची तपासणी
कल्याण वार्ताहर

येथील अनंत वझे संगीत कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने अलिकडेच भिवंडी तालुक्यातील

 

अनगाव, कवाड आणि परिसरातील ४० खेडय़ांमधील रहिवाशांसाठी बालआरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात परिसरातील लहान मुला-मुलींची विनामूल्य तपासणी करण्यात आली. परिसरातील ३३० मुलामुलींनी याचा लाभ घेतला. बालरोगतज्ज्ञ डॉ. चंदा अडवाणी आणि सहकाऱ्यांनी मुला-मुलींना तपासले.
या शिबिरात जन्मजात हृदयदोष, कर्करोगाची गाठ इ. आजारांनी ग्रस्त असलेली मुलेही आढळून आली. प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मुलांना जीवनसत्त्व आणि कॅल्शियमच्या औषधांचे वाटप करण्यात आले. संचालक डॉ. दीपक वझे, डॉ. प्रताप पानसरे, डॉ. गौरी वझे आणि डॉ. इशा पानसरे हेही शिबिरात कार्यरत होते. मुख्याध्यापक भारांबे, शिक्षिका सीमा दातार, वसंत दातार, रेखा दातार, सतीश आणि रेखा पटवर्धन, निशांत मुळिक, लेले आणि इतरांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी हातभार लावला.