Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘संघर्ष’ च्या वतीने
‘मिळून साऱ्याजणी’

ठाणे/प्रतिनिधी : जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून ‘संघर्ष’ या ठाण्यातील संस्थेतर्फे ‘मिळून

 

साऱ्याजणी’ या चर्चात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी ७ मार्च रोजी टिप-टॉप प्लाझा हॉल, तीन हात नाका येथे सायंकाळी ६ वाजता ‘मिळून साऱ्या जणी’ चा कार्यक्रम संपन्न होणार असून, ‘संघर्ष’च्या महिला शाखेतर्फे त्याचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्यां आणि पत्रकार तीस्ता सेटलवाड, प्रख्यात स्त्री रोगतज्ज्ञ नंदिनी पालशेतकर, सेन्ट झेवियर्सच्या प्राचार्य नंदिनी सरदेसाई, ‘झी’ सारेगमची महागायिका वैशाली माडे, लावणीसम्राज्ञी माया खुटेगांवकर, अभिनेत्री आणि नृत्यांगना दीपाली सय्यद, कोरियोग्राफर फुलवा, झी एकापेक्षा एक या कार्यक्रमाची परीक्षक आणि लोककलावंत मीरा उमप आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्वत्वान महिला ‘साऱ्या जणी’मध्ये सहभागी होणार आहेत. पहिल्या सत्रात महिलांच्या आरोग्य समस्या या विषयावर डॉ. पालशेतकर, महिलांचे शिक्षण या विषयावर प्रा. सरदेसाई आणि महिलांच्या सामाजिक समस्या यावर तीस्ता सेटलवाड बोलणार आहेत.
पारंपरिक लावणीचे जतन-संवर्धन आणि वास्तवता या विषयावर माया खुटेगांवकर प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.
या सर्व कर्तबगार महिलांना बोलत्या करणार आहेत, निवेदिका उत्तरा मोने, दुसऱ्या सत्रात मनोरंजनाचे कार्यक्रम होतील. कावेरीताई पाटील (स्वातंत्र्यसेनानी) आणि बर्नडेथ पिमेंटा (सामाजिक कार्यकर्त्यां) यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी असून कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी संपर्क-अपर्णा चित्रे (९८६९४४१२०३) किंवा मीरा जंगम (९८२०१५९३७३)