Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

कुंदनानी फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधास प्रथम क्रमांक
कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेत

 

उल्हासनगरच्या प्रिन्सिपॉल के.एम. कुंदनानी फार्मसी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. गेली तीन वर्षे कुंदनानी फार्मसीचे विद्यार्थी या स्पर्धेत हे यश संपादन करीत आहेत.
बुलढाणा येथील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ही स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत राज्यातील ३८ फार्मसी कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत कुंदनानी फार्मसीचे डिप्लोमा इन फार्मसी अंतिम वर्षांचे विद्यार्थी अरविंद परिहार, विनोद शर्मा, निखिलेश धुरिया, नितेश अग्रवाल यांनी यश मिळविले. या विद्यार्थ्यांनी कुपोषण व त्यामध्ये औषध विक्रेत्याची भूमिका या विषयावर शोधनिबंध सादर केला. उत्कृष्ट शोधनिबंध सादरीकरण केल्याबद्दलचे उत्कृष्ट सादरीकरणाचे पारितोषिक अरविंद परिहार याला मिळाले.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य सी. व्ही. अच्छरा यांच्या पुढाकाराने प्रा. हेमंतकुमार चव्हाण, उपप्राचार्या मंजिरी घरत यांनी मार्गदर्शन केले. या विद्यार्थ्यांनी वाडा, भिवंडी परिसरातील दुर्गम भागात जाऊन तेथील बालकांचे सर्वेक्षण केले. यामध्ये बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण आढळून आले. याविषयी औषध विक्रेते काय भूमिका बजावू शकतात. यासाठी करावयाच्या उपाययोजनेविषयीचा शोधनिबंध या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे.