Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

अंबरनाथ नगरपालिकेच्या शिलकी अर्थसंकल्पास मंजुरी
बदलापूर/वार्ताहर

अंबरनाथ नगर परिषदेचा २०१० चा कोणतीही करवाढ वा दरवाढ नसलेला सुमारे चार लाख रुपये

 

शिलकी अर्थसंकल्प मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्षा संपदा गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण, भुयारी गटार बांधणे, मलनिस्सारण केंद्र पुन्हा सुरू करणे, पूर्वेकडे स्मशानभूमी निर्माण करणे, गांडूळ खत प्रकल्प बीओटीवर सुरू करणे, क्रीडा संकुल-सर्कस मैदान या जागांवरील अतिक्रमण हटवून खेळाडूंना मैदान उपलब्ध करून देणे आदी महत्त्वाच्या बाबींचा नवीन वर्षांत समावेश असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
पर्यावरण रक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी स्मशानभूमीतील डिझेल शवदाहिनीत विनामूल्य सेवा देण्याचा मनोदय नगराध्यक्षांनी व्यक्त केला असून, मृत्यू दाखला (प्रारंभीचा) विनामूल्य देण्याचा ठराव मंजूर झाल्याचेही गडकरी यांनी सांगितले. पूर्वेकडील नेहरू उद्यान अद्ययावत करून, त्याला संरक्षक भिंत बांधून नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव असून, पूर्वीसारखी लहान मुलांसाठी गाडी सुरू करणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. लेखापाल भगवान कुमावत, अंतर्गत लेखा परीक्षक जे.बी. थेरे आदी यावेळी उपस्थित होते.