Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

जागतिक महिला दिनानिमित्त विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर
ठाणे प्रतिनिधी: दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक महिला दिनानिमित्त येथील कौशल्य मेडिकल

 

फाऊंडेशनच्या वतीने शुक्रवार, १३ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत महिलांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. आशा भानुशाली आणि १५ स्त्रीरोगतज्ज्ञांची टीम, कर्करोगतज्ज्ञ डॉ. अनिल हेरूर, डॉ. चेतना बक्षी, डॉ. आशीष बक्षी, डॉ. बोरवणकर या शिबिरात रुग्ण तपासणी करणार आहेत. त्याचप्रमाणे दुपारी २ ते ४ यावेळेत डॉ. पराग राणे, डॉ. सुनील नलावडे स्थुलता निवारणाबाबत महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. याचवेळेत आहारतज्ज्ञ डॉ. पुष्पलता डुंबरे आहाराविषयी सल्ला देतील, तर डॉ. प्रिया श्रीनिवासन नेत्रचिकित्सा करणार आहेत. कौशल्य मेडिकल फाऊंडेशन ट्रस्ट हॉस्पिटल, गणेशवाडी, पाचपाखाडी, नितीन कंपनीच्या मागे, ठाणे (प) येथे ही शिबीर होईल. जास्तीत जास्त महिलांनी या विनामूल्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. सहभागासाठी नोंदणी आवश्यक आहे. संपर्क- २५४५४००० विस्तारित- ११३.