Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९

माढय़ाची जहागीर
आणि शिरुरचा घाट

दादा (सिनिअर) आपल्या किल्ल्यावरून मावळतीला चाललेल्या सूर्याकडे पाहत होते. संध्याकाळी किल्ल्यावर जाण्याचा त्यांचा शिरस्ता होता. सरकारी खजिन्यातून खर्च करून गावचा किल्ला त्यांनी पर्यटन स्थल बनवून टाकला होता. खरं तर या किल्ल्यावर एखादा मावळाही फिरकल्याचा पुरावा इतिहासात नव्हता. पण दादासाहेबांच्या गावचा किल्ला पडला तो. ढासळते बुरूज घेऊन मिरवणाऱ्या रायगडाला, राजगडालाही सिनिअर दादासाहेबांच्या किल्ल्याचा हेवा वाटत होता. रायगड, राजगडच्या अंगाखांद्यावर साक्षात महाराज खेळले पण त्यांची डागडुजी केली नाही. पण अकलाईच्या किल्ल्याचं नशीब थोरच म्हणायचं. अशा या ऐतिहासिक किल्ल्यावर उभे राहून मोठे दादासाहेब चिंताग्रस्त होऊन उभे होते.

आठवलेंच्या उमेदवारीबाबत नेत्यांची सावध भूमिका
श्रीरामपूर, ७ मार्च/प्रतिनिधी
आपण काही झाले तरी शिर्डीतून निवडणूक लढविणार, मला दोन्ही काँग्रेसची मदत होणार, मी निवडून येणार, सर्वांचा पाठिंबा मला आहे, असे आठवले यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर उत्तर नगरमधील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची सावध भूमिका आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता राखीव झाल्यानंतर आठवले यांनी शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले होते. तसेच महिन्यापूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली.

वीज नाही, तर मत नाही
बिजनौर, ७ मार्च/वृत्तसंस्था
दर पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुका या राजकारण्यांसाठी सत्वपरीक्षाच असतात. आधीच्या पाच वर्षांत दिलेल्या वारेमाप आश्वासनांची पूर्तता करण्याची गरज सहसा कोणत्याच राजकारण्यांना वाटत नसते. पण कधीकधी सामान्य जनता आपल्या मिळालेल्या आश्वासनांचे काय केलेत, असा सवाल करते. नुसता सवाल करून थांबत नाही त्यासाठी ती निकरावर येते. आणि मग मात्र राजकारण्यांचीही पाचावर धारण बसते. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातल्या खानपूर माधौ या गावातील लोकांनी असाच रुद्रावतार धारण केला आहे.

राज्यातील १५ जागा स्वबळावर लढविण्याचा डाव्या आघाडीचा निर्णय
सांगली, ७ मार्च / प्रतिनिधी

निवडणुकीआधी युती करून नंतर तिची घोषणा करावी. आधी घोषणा करून युती नंतर करावी. युती न करता नुसतेच सहकार्य करावे, मैत्रीपूर्ण लढा द्यावा, काँग्रेसला पाठिंबा द्यावा की देऊ नये, यललितांपासून मायावतींपर्यंत कोणकोण आपल्या बाजूने यायला तयार आहे, कोणाकोणाला कळपात ओढता येईल, किती जागा मिळाल्या तर सत्तारूढ आघाडीत जाता येईल, किती जागा मिळाल्या तर तटस्थ राहावे लागेल, विधायक विरोधक कसे बनायचे.. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक शनिवारी नवी दिल्लीत झाली. या आणि अशाच मुद्दय़ांवर तर त्यात विचार झाला नसेल ना?

राष्ट्रवादीला झटका, लक्षद्वीपमध्ये सईद यांना काँग्रेसची उमेदवारी
नवी दिल्ली, ७ मार्च/खास प्रतिनिधी

काँग्रेसने आज लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघासाठी दिवंगत केंद्रीय मंत्री पी. एम. सईद यांचे पुत्र हमादुल्ला सईद यांच्या उमेदवारीची घोषणा करून पंधराव्या लोकसभेसाठी काँग्रेसने राष्ट्रपातळीवर युती करावी अशी मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनसुब्यांना जोरदार धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले लक्षद्वीपचे खासदार पी. पी. कोया यांच्यासाठी ही जागा सोडावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती. सन २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये लक्षद्वीपमध्ये कोया यांनी सईद यांना अवघ्या ७१ मतांनी पराभवाचा धक्का दिला होता.

शक्ती प्रदर्शनाने काँग्रेसचा प्रचाराचा नारळ फुटला
औरंगाबाद, ७ मार्च/खास प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक येथील सभेच्या तोडीसतोड सभा घेऊन औरंगाबादमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला. आज गरवारे स्टेडियममध्ये काँग्रेस प्रदेश समितीतर्फे आयोजित जनजागरण विकास यात्रेचा समारोप आणि कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेऊन राष्ट्रवादीच्या नाशिकच्या सभेला जोरदार उत्तरही दिले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला आठपैकी एकही जागा मराठवाडय़ात जिंकता आली नव्हती. काँग्रेसने गेल्या साडेनऊ वर्षांत याच मराठवाडय़ातून विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण हे दोन मुख्यमंत्री दिले आहेत. त्यामुळेच यंदा जनजागरण विकास यात्रेचा समारोप मराठवाडय़ाची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. काँग्रेससाठी दुबळ्या असणाऱ्या मराठवाडय़ाला औरंगाबादची गरवारे स्टेडियमची ही सभा नवसंजीवनी देईल आणि आगामी निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळेल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

युपीएच्या पाच वर्षांच्या ‘कुशासना’ला उत्तर अडवाणींच्या ‘कुशल नेतृत्वा’चे
नवी दिल्ली, ७ मार्च/खास प्रतिनिधी

केंद्रातील युपीए सरकारच्या पाच वर्षांच्या ‘कुशासना’चे उत्तर भाजप-रालोआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांचे कुशल नेतृत्वच देऊ शकते, असा ठाम विश्वास असलेल्या भाजपने ‘कुशल नेतृत्व’ अशा घोषणेवर भर देत लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ‘कुशल नेतृत्व’ अशी घोषणा देताना प्रभावी, अनुभवी आणि निर्णय घेण्याची क्षमता राखण्याचे नेते अशी अडवाणींची मतदारांमध्ये प्रतिमा तयार करण्याची भाजपकडून येणाऱ्या दोन महिन्यांत व्यापक मोहीम उघडली जाईल. अडवाणी हे अनुभवी, कार्यकुशल आणि निर्णय घेण्याची क्षमता राखणाऱ्या व्यक्तिमत्वाचे प्रतीक आहे, असे भाजपचे प्रवक्ते रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले. काँग्रेसने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मनमोहन सिंग यांचे नाव पुढे केले असले तरी काँग्रेसने देशभरात सुरु केलेल्या प्रचारमोहीमेत ते कुठेही झळकलेले नाहीत. दिल्लीतून नियंत्रित होणाऱ्या काँग्रेसच्या देशव्यापी प्रचारात सोनिया गांधी, मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांची छायाचित्रे असलेले होर्डिंग्ज असले तरी मनमोहन सिंग यांचे छायाचित्र असलेले एकही स्वतंत्र होर्डिंग दिसत नसल्याचा दावा प्रसाद यांनी केला. काँग्रेसच्या प्रचार मोहीमेचा रोख लक्षात घेता मनमोहन सिंग यांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या घोषणेला कोणत्याही प्रकारे दुजोरा मिळताना दिसत नाही, असा टोलाही प्रसाद यांनी लगावला.