Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

साध्वी प्रज्ञासिंगची प्रकृती बिघडली
रुग्णालयात हलविण्याचे मोक्का न्यायालयाचे आदेश
मुंबई, ७ मार्च / प्रतिनिधी

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक केलेल्या आणि सध्या कारागृहात असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग

 

ठाकूर हिची प्रकृती बिघडल्याने तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये हलविण्याचे आदेश आज विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने दिले.
कारागृहात मांसाहारी जेवण देण्यात येते आणि त्यामुळे माझा धर्म भ्रष्ट होतो म्हणून मला घरचे जेवण मिळावे, अशा आशयाचा अर्ज प्रज्ञासिंग हिने न्यायालयात केला होता. कारागृहात देण्यात येणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असून त्यामध्ये अळ्याही आढळल्या, असे साध्वीने अर्जात म्हटले होते.
मात्र न्यायालयाने प्रज्ञासिंग हिचा घरचे जेवळ मिळण्याबाबतचा अर्ज फेटाळला. त्यानंतर गेल्या आठवडय़ापासून साध्वीने कारागृहात उपोषण सुरू केले होते. आज तिची प्रकृती अधिकच ढासळल्याने तिला हॉस्पिटलमध्ये हलविण्याचे आदेश विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने दिले.