Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

बहुजन महासंघ कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी चारजणांना अटक
मुंबई, ७ मार्च / प्रतिनिधी

दहिसर पूर्व येथे २ मार्च रोजी भारतीय बहुजन महासंघाचे कार्यकर्ते यशवंत ओटले यांची निर्घृण

 

हत्या केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टीच्या तालुका सचिवासह चौघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट बाराच्या अधिकाऱ्यांनी आज अटक केली. प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
ओटले यांची दहिसर पूर्व रेल्वे स्थानकासमोर काही अज्ञात इसमांनी कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली होती. याबाबत समांतर तपास करणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद खेतले यांनी पोलिसांची पथके तयार करून माहिती घेतली. त्यावेळी शांतीनगर, डोंगरी परिसरात सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात रमाबाई आंबेडकर वाचनालय बिल्डरने तोडले होते. वाचनालय तोडण्यास ओटले याने विरोध केला होता तर रिपब्लिकन पार्टीचे दहिसर तालुका अध्यक्ष भाऊसाहेब ससाणे याने त्यास पाठिंबा दिला होता. सदर वाचनालय तोडून ते नव्या जागेत दिले जाणार होते. परंतु ओटलेला ते मान्य नव्हते. त्यामुळे त्याने २ मार्च रोजी सभा बोलाविली होती. ही सभा झाली तर लोकांचा ओटलेला पाठिंबा मिळेल या भीतीने ससाणे याने गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या रमेश ससाणे याला ओटलेला मारण्याची सुपारी दिली. ओटलेने राजू नेपाळी आणि बिट्टू वाघेला या दोघांना आठ हजार रुपये देऊन फक्त वार करण्यास सांगितले. बालाजी जाधव व शाम साबळे या दोघांनी ओटलेची ओळख पटवल्यानंतर दोघांनी भरगर्दीत वार केले. वार वर्मी बसल्याने ओटले जागीच ठार झाला. बाबू राणे, दिपक कांबळे, ढाकणे, संख्ये, गडदे, जाधव आदींच्या पथकाने ही माहिती काढून चौघांना अटक करून या हत्या प्रकरणाची उकल केली.