Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९

रंगाचा बेरंग नको..
पुरुषोत्तम आठलेकर

सर्व ऋतूंमध्ये आल्हाददायक ऋतू म्हणून वसंत ऋतूची ख्याती आहे. त्याच्या स्वागतामध्येच विविध रंगांची उधळण करण्यात भारतीय संस्कृतीची निसर्गाप्रती असलेली संवेदनशीलता दिसून येते. या सर्व सणावारांच्या माध्यमातून निसर्ग हा लोकजीवनात एकरूप झालेला आपल्याला अनुभवास मिळतो, पण आज साजऱ्या केल्या जाणाऱ्या वसंत पौर्णिमेलाच म्हणजेच होळी पौर्णिमेचे आजचे स्वरूप परस्पर विरोधी का?

गणेशदादा, आता तरी कठोर व्हा...
जयेश सामंत

राज्याचे पर्यावरण मंत्री गणेश नाईक यांचे होम टाऊन असलेल्या नवी मुंबईतील पावणे गावातील ग्रामस्थांना मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा प्रदूषणाचा फटका बसला. ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टय़ातील शीतल कोल्ड स्टोअरेज या शीतगृहात अमोनिया वायूची गळती झाल्याने पावणे गावातील ३५हून अधिक ग्रामस्थांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले.

शिवतीर्थ रायगडावरील होळीचा माळ
सदाशिव टेटविलकर

प्राचीन काळापासून होळीचा सण हा लोकोत्सव म्हणून संपूर्ण भारतात साजरा होत असल्यामुळे त्या-त्या प्रांतात होळीला निरनिराळ्या नावाने ओळखतात. महाराष्ट्रात होळी, उत्तर प्रदेशात होरी, गोव्याला शिग्मा. शिग्मा या शब्दाचा उगम. रा.चि. ढेरे सांगतात की, देशी नाममालेत हेमचंद्राने या उत्सवाला ‘सुगिम्हअ’ म्हणजे ‘सुग्रीष्मक’ असे नाव दिले आहे.याच नावापासून कोकण गोमंतकातील मराठीत ‘शिग्मा’ हा शब्द सिद्ध झाला आहे आणि महाराष्ट्राच्या अन्य भागांत वर्णविपर्याने शिमगा असे त्याचे रूप रूढ झाले आहे. शालिवाहन शकाच्या मास गणनेप्रमाणे शेवटचा जो फाल्गुन महिना, त्या फाल्गुनोत्सव करावा असे भविष्यादी पुराणात कथन केले आहे. सामान्यत: शुल्क नवमीपासून पौर्णिमेपर्यंत हा उत्सव सर्व लहानथोर मोठय़ा उत्साहाने साजरा करतात. स्थानपरत्वे यास शिमगा, होलिकादहन, होळी, हुताशनी महोत्सव, उत्तरेत दोलयात्रा, तर दक्षिणेत कामदहन म्हणून होलिकोत्सव साजरा केला जातो.

रंगांची दुनिया..
शुभांगी पवार

‘मला ना डोळे बंद केल्यावर खूप रंग दिसले. लाल, पिवळा, निळा आणि एक दिसला त्याचं नाव नाही माहीत’, माझ्या चित्रकलेच्या क्लासमधील सहा वर्षांची तनया सांगत होती. मी नेहमीच त्यांना त्यांचे विषय रंगवायला सांगते. त्या दिवशी त्यांना म्हटलं, ‘डोळे बंद करा आणि त्यानंतर काय दिसतं ते चित्र काढा.’ अनेकांनी मासा, झाड असे आकार काढले, काहींनी फक्त रंगाचे पट्टे काढले, तर काहींनी काळ्या रंगाने कागद रंगवून काढला.

टॅरो माइंडेड रिटायर्ड लाइफ!
प्रशांत मोरे

नेहमीच्या सरळ चाकोरीबद्ध जीवन प्रवासात एखादे वळण असे येते की, त्यामुळे त्या व्यक्तीच्या पुढील आयुष्याची दिशाच बदलून जाते. ठाण्यातील मधुकर लेलेंबाबत असेच काहीसे घडले. नोकरीत असताना टॅरो कार्डस् हा शब्दही त्यांनी कधी ऐकला नव्हता आणि आता निवृत्तीनंतर मात्र ते टॅरोमय जीवन जगत आहेत.

उरणचा वीजनिर्मिती प्रकल्प लांबणीवर
मधुकर ठाकूर

राज्यात वीजनिर्मिती व पुरवठा यामध्ये प्रचंड तफावत आहे. राज्याला सध्या सुमारे सात हजार मेगाव्ॉट इतक्या विजेचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे भारनियमनाचे संकट जनतेच्या पाचवीलाच पुजलेले आहे. यावर वीज बचत आणि वीजनिर्मिती असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी वीजनिर्मितीच्या पर्यायासाठी राज्यभर अनेक वीज प्रकल्प उभारण्याचे संकल्प सरकारने सोडले आहेत.१२४० मेगाव्ॉट वीजनिर्मितीचा हा प्रकल्प २०१० मध्ये पूर्ण करण्याचा संकल्प सरकारने सोडला होता. मात्र या प्रकल्पासाठी लागणाऱ्या गॅसचाच प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. त्यातच लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने या विद्युत प्रकल्पाचे काम सुरू होण्यास आणखी वर्षभर वाट पहावी लागणार आहे. वीजनिर्मितीच्या क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर आहे. विजेची तूट भरून काढण्यासाठी शासकीय स्तरावर राज्यात विविध ठिकाणी नवीन व प्रस्तावित प्रकल्प तसेच योजना आखण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात नवीन परळी औष्णिक प्रकल्प संच क्रमांक-२, पारस औष्णिक विद्युत केंद्र विस्तार प्रकल्प हे २५० मेगाव्ॉट क्षमतेचे दोन, खापरखेड औष्णिक विद्युत केंद्र विस्तार प्रकल्प व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र विस्तार प्रकल्प, संच एक व दोन असे प्रत्येकी ५०० मेगाव्ॉट वीजनिर्मिती प्रकल्पांचे काम सुरू आहे. येत्या वर्षांत दोन तर पुढील वर्षांच्या अखेरीस हे प्रकल्प पूर्णत्वास जातील, असा महानिर्मितीचा दावा आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित तीन प्रकल्प आहेत. कोराडी औष्णिक विद्युत केंद्र विस्तार प्रकल्प (क्षमता ८०० मेगाव्ॉट), चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र विस्तार प्रकल्प, संच एक व संच दोन- प्रत्येकी ५०० मेगाव्ॉट वीजनिर्मिती क्षमतेचे प्रस्तावित आहेत. तसेच उरण वायू विद्युत केंद्र विस्तार प्रकल्पाचाही प्रस्तावित योजनेत समावेश आहे. दोन टप्प्यांत प्रस्तावित योजनेअंतर्गत ब्लॉक-१ मध्ये ७९० तर ब्लॉक-२ मध्ये ३९५ अशी एकूण १२८५ मेगाव्ॉट वीजनिर्मिती करण्याची योजना आहे. २००४ साली हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रकल्प उभारणीसाठी सुमारे दोन हेक्टर जागाही संपादन करण्यात आली आहे. उरण-बोकडवीरा येथील उरण गॅस टर्बाईन प्रकल्पाचा विस्तार योजनेअंतर्गत प्रकल्पाला जोडूनच हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. दोन टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली, त्यावेळी प्रकल्पाचा खर्च तीन हजार कोटी रुपये इतका होता. मात्र प्रकल्प लांबणीवर पडत चालल्याने हा प्रकल्प आता पाच हजार कोटींच्या घरात जाणार असल्याचे महानिर्मितीकडून सांगितले जात आहे. १२४० मेगाव्ॉट निर्मितीचा हा प्रस्तावित प्रकल्प मार्च-एप्रिल २०१० मध्ये पूर्ण होणार होता. मात्र या प्रकल्पासाठी लागणाऱ्या गॅसची अद्याप तजवीज करणे महानिर्मितीला शक्य झालेले नाही. गॅस पुरवठय़ाची हमी अद्याप तरी ओएनजीसी व इतर गॅस कंपन्यांनी दिलेली नाही. यामुळेच हा प्रकल्प दिवसेंदिवस लांबणीवर पडत चालला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चातही वाढ होत चालली आहे. या प्रकल्पाला गॅस पुरवठा करण्याची हमी द्यावी, यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या सोबतीने ओएनजीसीशी चर्चा सुरू आहे. मात्र लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याने व आचारसंहिता लागू झाल्याने या चर्चेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे गॅस पुरवठय़ाबाबत लोकसभा निवडणुकीनंतरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. या प्रकल्पावर लोकसभा निवडणुकीचे सावट पडल्याने २०१० मध्ये वीजनिर्मितीचे उद्दिष्ट असलेला हा प्रकल्प सुरू होण्यासाठी २०१२-१३ सालापर्यंत वाट पहावी लागणार आहे. उरण वायू विद्युत केंद्राच्या निर्मिती प्रकल्पाला २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. ८५२ मेगाव्ॉट इतक्या या वीजनिर्मिती केंद्रालाच ओएनजीसीकडून योग्य प्रमाणात गॅसचा पुरवठा होत नाही. यामुळे या वायू विद्युत केंद्राची वीजनिर्मितीची क्षमता निम्म्यावर येऊन ठेपली आहे, तर गॅस मिळत नसल्याने वीजनिर्मितीचे काही संच भंगारात निघाले आहेत. यामुळे प्रस्तावित १२४० मेगाव्ॉट वीजनिर्मिती प्रकल्पाला ओएनजीसीकडून गॅसचा पुरवठा होईलच याची खात्री देता येत नाही. यामुळे या प्रस्तावित प्रकल्प उभारणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.