Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

खासदार स्वीय सहाय्यक हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक
वाडा, ७ मार्च/वार्ताहर

खासदार दामू शिंगडा यांचे खासगी स्वीय सहाय्यक नरेश आकरे यांच्यावर रविवारी (१ मार्च)

 

वाडय़ात झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या वाडा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या हल्ल्याप्रकरणी चंद्रकांत हरड व विशाल बांगर (रा. मुरबाड) यांना पोलिसांनी गजाआड केले आहे.
या हल्ल्यात नरेश आकरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, दोन्ही हात फॅक्चर झाले आहेत. येथील पत्रकार शरद पाटील यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला झाल्याचा आरोप नरेश आकरे यांनी केला आहे. या हल्ल्यातील आरोपीला तात्काळ अटक करावी, अशी मागणी खासदार दामू शिंगडा यांनी यापूर्वीच ठाणे पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी वाडा बंद पुकारला होता. या बंदला सर्व वाडेकरांचा व व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून यावेळी वाडा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, आकरे यांच्यावर ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.