Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

नेवाशात घरफोडी; ५० हजारांचा ऐवज लंपास
नेवासे, ७ मार्च/वार्ताहर

शहरातील विवेकानंद वसाहतीमध्ये पहाटे चोरटय़ांनी अनेक घरांमध्ये हात मारून सुमारे ५० हजार

 

रुपयांचा ऐवज चोरून नेला. बसस्थानकाजवळच विवेकानंद वसाहत आहे. या ठिकाणी आज पहाटे संजय मिटकरे यांच्या घरातून सोन्याचे दागिने लांबविण्यात आले. मिटकरे यांची आई शेजारी सडय़ासाठी शेण आणावयास गेली असता, दर उघडे राहिले व त्यातच चोरटय़ांनी डाव साधला. शिंगी यांच्या घराच्या उघडय़ा खिडकीतून काठीच्या साहाय्याने पँटमधील ३ हजार रुपये लंपास केले. याच पद्धतीने शिर्के यांच्या घरातील १० हजार रुपये चोरीस गेले. विवेकानंद वसाहतीमध्ये दहा दिवसांपासून चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. भंगारमध्ये चांगल्या वस्तू चोरून विकण्याचा धंदा तेजीत आहे.