Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

इटलीतील साईभक्ताची शिर्डीत आत्महत्या
राहाता, ७ मार्च/वार्ताहर

साईदर्शनासाठी आलेल्या एका विदेशी तरुणाने शिर्डीतील हॉटेल साईबाबा इंटरनॅशनलच्या खोलीत

 

अंमली पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. ही घटना आज सायंकाळी चारच्या सुमारास उघडकीस आली.
बुटीसिली मार्को असे या तरुणाचे नाव असून तो इटलीच्या कॉसिगॉना (एपी), कॉनट्राडा गॅली, १७ येथील नागरिक असल्याचे त्याच्याकडे सापडलेल्या कागदपत्रावरून निष्पन्न झाले. २४ फेब्रुवारी रोजी तो भारतात आला होता व २३ मार्च रोजी इटलीला परतणार होता, असे विमानाच्या तिकिटावरून स्पष्ट झाले.
मार्को हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील रुम नं. ११९मध्ये उतरला होता. काल सायंकाळपासून रुमचा दरवाजा न उघडल्याने कर्मचाऱ्यास संशय आल्याने हॉटेल प्रशासनाने सायंकाळी चार वाजता पोलिसांना कळविले. पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता, मार्को रूममधील बेडवर मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या तोंडातून फेस आलेला होता. जवळच इंजेक्शनची सिरींज, तर बॅगमध्ये परदेशी तंबाखू, अंमलीसदृश पदार्थ, पासपोर्ट, व्हिसा, इटालीयन डिक्शनरी, मोबाईल, युरो चलन, गळ्यातील चेन, कपडे आदी सहित्य आढळून आले.