Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

देशात महिला शक्तीच बलवान - तरुण सागर
वाशीम, ७ मार्च / वार्ताहर

ज्याची झोप आणि स्वास्थ्य हरवले तो जगात सर्वात दु:खी मनुष्य आहे. पत्नी सर्व जगात आहे

 

परंतु, धर्मपत्नी फक्त हिंदुस्थानात आहे. जी पतीला धर्माच्या मार्गावर चालण्याची दिशा दाखवते. आपला देश फक्त नावालाच पुरुषप्रधान आहे. वास्तविक पाहता सर्वत्र महिलांचा बोलबाला आहे, असे प्रतिपादन तरुण सागर महाराज यांनी येथे केले.
बुद्धी पाहिजे असल्यास सरस्वती, पैसा पाहिजे असल्यास लक्ष्मी, शक्ती पाहिजे असल्यास दुर्गादेवीकडे जावे लागते. जेव्हा बुद्धी, पैसा आणि शक्ती मिळाली तर मनुष्य ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे कशाला जाणार? असा मार्मिक प्रश्न मुनिश्री तरुणसागर यांनी उपस्थित करून महिलाशक्ती बलवान असल्याचे आपल्या प्रवचनातून सांगितले.
पुसद नाका परिसरात शुक्रवारी प्रवचनमालेत तरुण सागर बोलत होते. यावेळी त्यांनी घरचा कर्तापुरुष म्हणून घर सांभाळणे कठीण आहे. आमदार, खासदार, पंतप्रधान, मुख्यमंत्री बनून आपल्या विभागाचा, राज्याचा, देशाचा कारभार सांभाळणे शक्य आहे. परंतु, आपल्या घर कुटुंबाला सांभाळणे कठीण आहे, असे ते म्हणाले.