Leading International Marathi News Daily
रविवार, ८ मार्च २००९

घोडदौड..
पारशी समाजात जन्मलेली सनोबर ही आज वयाने सर्वात लहान असलेली बॉलिवूडमधली धाडसी स्टंट आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते. आजवर तिने ऐश्वर्या, बिपाशा, प्रीती झिंटा, ईशा देओल यासारख्या आघाडीच्या अभिनेत्रींसाठी स्टंट्स केले आहेत. धूम - २सारख्या अ‍ॅक्शनपटात तिने केलेले स्टंट्स चांगलेच गाजले. आगळ्यावेगळ्या करिअरमध्ये चमकणारी सनोबर गोरेगावच्या एका फार्मवर स्टंटचा सराव करताना.

प्रगतीच्या टापूत नेणारे
शुभदा चौकर

चार बाया एकत्र आल्या म्हणजे काय करतात?
-कुचाळक्या किंवा भांडणं!
..एक काळ असा होता की समाजात हा एक अतिसामान्य समज रूढ झाला होता. आज हा समज गैर असल्याचं सिद्ध करत महिलांनी मोठी मजल मारलीय. संघटनशक्तीच्या बळावर असंख्य महिला ठिकठिकाणी समाजाला पुढे नेणारी पावलं दमदारपणे टाकताहेत. त्यांच्या त्या पाऊलखुणा एव्हाना चांगल्याच ठळकपणे उमटलेल्या आहेत.

रिझव्‍‌र्ह बँक ऑफ एज्युकेशन!
प्राजक्ता कदम

प्रतीक्षा नगरमधील दीपाली कोळेला गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेत ८३ टक्के गुण मिळाले आणि आता ती रूईया महाविद्यालयात असून पुढील वर्षांसाठी बारावीच्या परीक्षेची तयारी करण्यात मग्न आहे. महात्मा फुले नगरातील यशोधराने व्हिडिओ शूटिंगचा कोर्स नुकताच पूर्ण केला असून पुढील अभ्यासासाठी तिला बंगळुरूच्या एका संस्थेची फेलोशिप मिळाली आहे. पेस्तमसागरची मीना अहिरे कला शाखेच्या अंतिम वर्षांला पहिली आली व सध्या ती बीएडचा अभ्यासक्रम करीत आहे.

सुवर्णज्योतीने दाखवला प्रकाश
नमिता देशपांडे

धुणी-भांडी करणाऱ्या महिलेचा एक मुलगा.. त्याला इच्छा आहे डॉक्टर होण्याची.. घरची परिस्थिती बेताची असून देखील तो शिकण्यासाठी हॉस्टेलवर राहतो आहे.. त्याला हे शक्य होतय कारण फक्त त्याचीच आई नव्हे तर अनेक ‘आया’ त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या आहेत.. बचत गटांच्या माध्यमातून या सगळ्याजणी त्याचा महिन्याचा खर्च स्वखुशीने उचलतात.. अशा प्रकारच्या परिस्थितीशी सातत्याने संघटीतपणे लढून पुढे जाण्याचा मार्ग भांडुप येथील मंगला लोंढे गेली अनेक वर्षे सातत्याने बचत गटांच्या माध्यमांतून दारिद्रय़ रेषेखालील महिलांना दाखवत आहेत.

‘सहेली’ची साथ
सुचिता देशपांडे

परिस्थितीने लादलेलं एकटेपण पेलणाऱ्या स्त्रीला दररोज समोर उभ्या ठाकणाऱ्या नव्या आव्हानांना सामोरं जायला एक वेगळीच ताकद लागते. अशा वेळी आर्थिक परावलंबित्व आणि समाजाचा पक्षपाती दृष्टिकोन त्यांचे अधिकच खच्चीकरण करीत असतो. मुंबईतील अशा निम्न स्तरातील निराधार, एकटय़ा महिलांना ‘सहेली’ या सपोर्ट ग्रुपतर्फे जगण्याची नवी उमेद मिळत आहे.

‘मी आतून बोलते आहे!’
‘‘आधी बीज एकले
बीज अंकुरले.. रोप वाढले
एका बीजापोटी,
तरु कोटी कोटी.. परिअंती

निवृत्तीनंतर घेतलेला आगळा वसा..
रेश्मा जठार

‘‘पुन्हा नवरा दारू पिऊन आला; तर चांगला दमात घे त्याला, लाटण्याने फोडून काढ,’’ पडवीतील झोपाळ्यावर बसलेल्या नलीला प्रमिलाताई सल्ला देत होत्या. १९९५ पासून शेजवलीत राहणाऱ्या प्रमिलाताईंकडे गावातल्या महिलांची कायम वर्दळ असते. त्यासुद्धा या महिलांना परिस्थितीनुरूप प्रेमळ, धीराचे किंवा ‘धाडसा’चेही सल्ले देतात. ही झाली अलीकडची बाब, पूर्वी याच बाया त्यांच्याकडे फिरकत नव्हत्या. गावातील बाप्यांनी प्रमिलाताईंवर बहिष्कार घातला होता. आज मात्र चित्र उलटे आहे; गावातील महिलांनी संघटित होऊन गावाची पाण्याची समस्या सोडविली आहे. ही किमया प्रमिलाताईंनीच घडविली आहे!

ह्य़ा ‘भुतांना’ भेटा!
भयपट आणि भूतपट हे दोन खरेतर स्वतंत्र प्रकार आहेत. भूतपट पाहून भीती वाटायलाच हवी असं काही नाही आणि भयपटात भूत असलेच पाहिजे असेही नाही. परंतु दुर्दैवाने अशी गल्लत नेहमी केली जाते. या वहिवाटीला बगल देऊन एक बऱ्यापैकी उत्कंठावर्धक अनुभव देण्यात ‘१३ बी’ हा चित्रपट यशस्वी झालेला आहे. प्रेक्षकांना ‘भीती’ दाखविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नेहमीच्या क्लृप्त्यांना रजा देऊन दिग्दर्शकाने वेगळी वाट चोखाळली आहे. ‘१३ बी’ हा भूतपट आणि अत्यंत वेधक पद्धतीने कथानकाची मांडणी त्यात करण्यात आली आहे.

डोकं नावाचा जिन्नसच अ‍ॅब्सेंट असावा..
चित्रपटासाठी सशक्त कथा हवी, चांगला अभिनय हवा, इतर तांत्रिक बाजूही सक्षम हव्यात या सर्व काल्पनिक गोष्टी आहेत. वास्तवात असे कधीच होत नाही आणि प्रेक्षकांनाही सर्व बाजू लुळ्या असलेले चित्रपट खूप आवडतात.. असा विश्वास असलेलेही काही निर्माते-दिग्दर्शक आहेत. त्यांनी मिळून ‘ढूंढते रह जाओगे’ हा चित्रपट तयार केला आहे. विनोदी चित्रपटालाही काही लॉजिक लागते ही बाब त्यांना पूर्णपणे अमान्यच आहे.

‘यू टर्न’ : एकाकी वृद्धत्वातील नव्या सोबतीची गोची
वृद्धापकाळातलं एकाकीपण ही आधुनिक काळाची देन आहे. व्यक्तिवादाचा अतिरेक, तुटलेले वा विस्कटलेले नातेसंबंध, जागतिकीकरणाच्या परिणामी करीअरचा निश्चित नसलेला ठावठिकाणा, जीवघेण्या स्पर्धेच्या या युगामुळे तरुण पिढीला ज्येष्ठांसाठी देण्याकरता वेळच नसणं, तसंच प्रत्येकाला स्वकेंद्रित जगण्याची लागलेली सवय.. अशा नानाविध कारणांमुळे आज उतारवयात अनेक ज्येष्ठांना एकटं, एकाकी आयुष्य कंठावं लागत आहे. त्यातून अनेक नवनवे प्रश्न निर्माण झाले आहेत.. होत आहेत.

‘शुभारंभ पंचांग दिनदर्शिके’चे प्रकाशन
शब्द-नि:शब्द या प्रकाशन संस्थेतर्फे येत्या २६ मार्च रोजी, गुढीपाडव्याच्या दिवशी ‘शुभारंभ पंचांग दिनदर्शिके’चे प्रकाशन करण्यात येणार आहे. खगोलशास्त्रज्ञ व पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली ही पंचांग दिनदर्शिका तयार केली आहे. मराठी महिन्यापासून सुरू होणारी ही दिनदर्शिका प्रतिपदा ते अमावस्या अशा मासिक कालावधीची असून चैत्र ते फाल्गुन असे महिने यात आहेत. दिनदर्शिका हे सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचे एक चांगले साधन आहे. या दिनदर्शिकेद्वारे भारतीय संस्कृती व आधुनिक राहणीमान यांचा समन्वय साधण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. या दिनदर्शिकेच्या विक्रीतून येणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग कोतवालवाडी ट्रस्ट आणि पर्यावरण दक्षता मंच या सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. या दिनदर्शिकेची विक्री मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, तसेच, वडोदरा, इंदौर, हैदराबाद व दिल्ली या शहरात केली जाणार आहे. काही प्रती अमेरिका, इंग्लंड व ऑस्ट्रेलियातही जाणार आहेत. या दिनदर्शिकेच्या एका प्रतीची किंमत १० रुपये असून इच्छुकांनी २५४३ ७६०३ किंवा ९८६९१ १९९ ६४५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रतिनिधी

महिलांसाठी परिसंवादाचे आयोजन
सखी या संस्थेतर्फे महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च रोजी दुपारी ४ वाजता दादर (पू. ) येथील आयईएस हायस्कूलमधील बी. एन. वैद्य सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादामध्ये महिलांचे आरोग्य, सौंदर्य आणि फिटनेस या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. प्रेक्षकांनाही या संवादात सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क : २४१८३९२२.

विठ्ठलदास ठाकरसी महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव २२ मार्चला!
एसएनडीटी महिला विद्यापीठाशी संलग्न असलेले विठ्ठलदास ठाकरसी होम सायन्स महाविद्यालय २००८-०९ या शैक्षणिक वर्षांत त्यांच्या वाटचालीचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. १२ ऑगस्ट २००८ रोजी मुंबईच्या महापौर डॉ. शुभा राऊळ यांच्याहस्ते सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्याथ्र्यी आणि कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात मोठय़ा प्रमाणात सहभाग घेऊन कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सुवर्ण महोत्सवी वर्षांची सांगता २२ मार्चला दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहातील सोहळ्याने होणार आहे. सकाळी ९ वाजता होणाऱ्या या सोहळ्यास मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख उपस्थित राहणार असून नरसी मोनजी विद्यापीठाचे कुलगुरू माधव वेलिंग आणि एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू चंद्रा कृष्णमूर्ती उपस्थित राहणार आहेत. महाविद्यालयाकडून माजी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी : ९८१९०९५२९०, ९७०२१७४६०७.
प्रतिनिधी