Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

सराव सामन्यात लक्ष्मणच्या ४४ धावा तर अमित मिश्राचे तीन बळी
ख्राईस्टचर्च, ७ मार्च / पीटीआय
भारताचा मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणच्या संयमी ४४ धावांच्या

 

खेळीच्या जोरावर चार दिवसांच्या लढतीत ओटॅगो व्होल्ट्स संघाने वेलिंग्टन फायरबर्ड्स संघाविरुद्ध दुसऱ्या दिवसअखेर वर्चस्व मिळवले. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव करण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्पर्धेत विविध संघातर्फे सहभागी झाले आहेत.
लक्ष्मणच्या ४४ धावांच्या खेळीत ६ चौकारांचा समावेश आहे. लक्ष्मणने जी. टोडसोबत (७३) तिसऱ्या गडय़ासाठी ७७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पहिला डावात १७४ धावांची मजल मारणाऱ्या व्होल्ट्स संघाने प्रतिस्पर्धी फायरबर्ड्स संघाचा डाव १३९ धावात गुंडाळत ३५ धावांची आघाडी मिळवली. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी व्होल्ट्स संघाने दुसऱ्या डावात ७ बाद २१० धावांची मजल मारली होती. मध्यमगती गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीने नॅथन मॅक् क्युलमचा एकमेव बळी मिळवला.
रानगिओरा येथे सुरू असलेल्या दुसऱ्या लढतीत काल शतक झळकावणारा भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने आज अधिक वेळ ड्रेसिंग रुममध्ये विश्रांती घेतली. कालच्या ५ बाद ३८८ धावसंख्येवरून पुढे खेळताना कँटरबरी विझार्ड्स संघाने आज पहिल्या डावात ५४३ धावांची मजल मारली. काल बळी घेण्यात अपयशी ठरलेल्या अमित मिश्राने आज अचूक मारा करीत १५५ धावांच्या मोबदल्यात ३ बळी मिळवले. आजचा खेळ थांबला त्यावेळी प्रत्युत्तरात खेळताना सेंट्रल स्टॅग्स संघाने पहिल्या डावात ३ बाद १३० धावांची मजल मारली होती.
संक्षिप्त धावफलक :
१)ओटॅगो व्होल्ट्स पहिला डाव १७४. दुसरा डाव ७८ षटकात ७ बाद २१० (जी. टोड ७३, व्हीव्हीएस लक्ष्मण ४४, नॅथन मॅक् क्युलम ३३, मायकल बुर्न्स २-५१, लक्ष्मीपती बालाजी १-३९); वेलिंग्टन फायरबर्ड्स पहिला डाव ५६.३ षटकात सर्वबाद १३९ (जोश ब्रोडी ३२, एल. वूडकॉक ३६, बालाजी १२).
२) कँटरबरी विझार्ड्स पहिला डाव १५८.२ षटकात सर्वबाद ५४३ (टोड अ‍ॅस्टल २९, मायकल पॅप्स १२७, राहुल द्रविड १०२, जोहानेस मायबर्ग १०७, कोरी व्हान विक ९२, ए. इलिस ४३, ब्रेन्डन दिमान्टी ५-७४, अमित मिश्रा ३-१५५); सेंटर स्टॅग्स पहिला डाव ४१ षटकात ३ बाद १३०.