Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९

‘मराठा आरक्षण’ हे पुरुषोत्तम खेडेकर संपादित पुस्तक.. त्यात लेखन करणारे बहुतांश नेते मराठा ओबीसीकरण चळवळीचे अग्रणी नेते.. महाराष्ट्रातले राज्यकर्ते त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतात.. पण या लेखकांनी केलेली विधाने, युक्तिवाद पुरावाहीन-तथ्यहीन आहेत.. त्यांचे लेखन विचारी-अभ्यासू मराठा युवकांच्या सर्जनशीलतेला, सहिष्णुतेला आणि विवेकबुद्धीला बधिरता आणणारे ठरणार आहे. त्या लेखनाची ही चिकित्सा.. मराठा आरक्षणाचे पुढारी, मराठा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष आणि प्रक्षोभक भाषणे करण्यासाठी प्रसिद्ध असणारे वक्ते पुरुषोत्तम खेडेकर संपादित ‘मराठा आरक्षण’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. मराठा सेवा संघ प्रणित जिजाई प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे. या ग्रंथात खेडेकरांबरोबरच प्रवीण गायकवाड, शांताराम कुंजीर, विकास पासलकर, जयश्री शेळके, प्रभाकर पावडे, विजय काळे आदींचे ज्वालाग्राही लेख आहेत. हे सर्व लेखक मराठा ओबीसीकरण चळवळीचे अग्रणी नेते आणि ताज्या दमाचे मराठा विचारवंत म्हणून ओळखले जातात. ते शासनाच्या विविध कमिटय़ांवर आहेत. राज्यकर्ते नियमितपणे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतात. मराठा आरक्षण चळवळीचे लोकप्रिय नेते म्हणून ते सदैव प्रकाशझोतात असतात.

सॅक्सोफोनच्या सूरांनी रसिकांना बेहोष करणारे जादूगार म्हणजे मनहारी सिंग. त्यांच्या वयाला ८० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सुदेश भोसलेंचे हे मनोगत! १९८६-८७ चा काळ असेल. मी नुकताच आशाजी आणि पंचमदांबरोबर कार्यक्रम करायला सुरुवात केली होती. पंचमदाच्या सगळ्या वादकांबरोबर माझी ओळख होत होती. त्याच वेळी एका बाजूला हार्मोनियमवर एक वयस्क, गोरेसे गृहस्थ बसलेले असत. शांत, संयमी मुद्रा आणि प्रत्येक हालचालीत जबरदस्त आत्मविश्वास, हातातल्या वाद्यावर कमालीची हुकूमत. गाणं सुरू झालं की माझं लक्ष नेहमी त्यांच्याकडे जायचं. मग कळलं, की ते म्हणजे मनहारी सिंग.. आरडींच्या वादक चमूमधलं एक भारदस्त व्यक्तिमत्त्व. पल्युट, मेंडोलीन, कॅरोनेट आणि सॅक्सोफोन या सगळ्याच वाद्यांवरची त्यांची हुकूमत लाजवाब होती.आज या सगळ्याला मोठा काळ लोटला तरी या सगळ्या गोष्टी आजही मला लख्ख आठवताहेत, कारण त्यातलं काहीच बदललं नाही.तीच शांत, संयमी मुद्रा, देहबोलीतला आत्मविश्वास आणि वाद्यावरची हुकूमत तशीच..

ओरहान पामुक हळवा साहित्यिक
अलिकडच्या काळात मुंबईत आलेला हा दुसरा नोबेल साहित्यिक. नदीन गॉर्डीमीर नुकतीच येऊन गेली होती. ओरहान पामुक हा २००६ साली साहित्यासाठी नोबेल पारितोषिक मिळालेला तुर्की साहित्यिक. मुंबईचे बॉलिवुड त्याला आवडते नि मुंबईचे बझार त्याला त्याच्या गावची आठवण करुन देतात. जगभर हिंडत राहूनही त्याच्या नसानसात इस्तंबूल भरलेले आहे, कुठेही गेला तरी ते त्याच्या बरोबरच असते. पण त्याला तिथं चैन पडत नाही की जगातही कुठे मन लागत नाही. तो कोलंबिया विद्यपीठात काही सेमिस्टर घेतो. स्वत:च्या कांदबऱ्यांबद्दल शिकवतो. पण मूलत: आणि पूर्णत: तो तुर्की लेखक आहे. कारण तो तुर्की भाषेतच लिहितो. इस्तंबूलचे वर्तमान आणि भूतकाळाचे चित्रण त्याने आपल्या लेखणीने जगभर परिचित केले आहे. तो फॅबर अँड फॅबर, पेंग्विन आणि ब्रिटिश कौन्सीलच्या आमंत्रणावरुन मुंबईत आला होता. त्याच्या लेखनाचे किती जबरदस्त फॅन्स मुंबईत आहेत याची झलक त्याला मिळाली असेल. त्याला भेटून माझ्या संग्रहात आणखी एका नोबेल साहित्यिकाच्या हस्ताक्षराची भर पडली.

स्वातमधला तालिबानी सुळसुळाट आता बजौर, वझिरीस्तानमार्गे पेशावपर्यंत पोहोचला आहे. इस्लामाबादमध्ये लाल मशिदीत जे घडले ते तिथे वा रावळपिंडीत कधीही घडू शकते. लाहोरमध्ये काय घडले ते आपण पाहिलेच. उद्या लाहोर ते इस्लामाबाद वकीलांचा ‘लँाग मार्च’ निघणार आहे आणि त्यात नवाझ शरीफ, शाहबाज शरीफ हेही सामील होणार आहेत. हा ‘मार्च’ त्यांना कोठे घेऊन जाईल ते सांगणे अवघड आहे. आपले घर नीटनेटके करण्यात आणि त्याआधी ते सावरण्यात पाकिस्तानची भलाई आहे. श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर लाहोरमध्ये हल्ला झाला, यात ‘लष्कर ए तैयबा’ या दहशतवादी संघटनेचाच हात आहे हे उघड आहे. भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार होता, त्याऐवजी श्रीलंकेचा संघ गेला. श्रीलंकेच्या संघाने अशा परिस्थितीत तिथे जायला हवे होते की नाही, यावर आता काथ्याकुट करण्यात अर्थ नाही. हा हल्ला होताक्षणीच ज्या प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटल्या त्या धक्कादायक आहेत. ‘आयएसआय’चे माजी प्रमुख हमीद गुल आणि लाहोरचे पोलीस आयुक्त खुस्रो परवेझ यांनी भारताचा या हल्ल्यात हात असल्याचे सांगितले. गुल यांनी तर ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम’ आणि भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’ यांनी मिळून हा हल्ला केल्याचे सांगितले. पुढे ते दोघेही तोंडघशी पडले. हा हल्ला ‘लष्कर ए तैयबा’ या संघटनेनेच केला, असे कालपर्यंत तरी पाकिस्तान सरकारच्या वतीने अधिकृतरीत्या सांगितले जात होते. आता त्यातही आणखी काही बदल सरकारी पातळीवर केला जाऊ शकतो. संपूर्ण देश चालवतो आहोत, म्हणजे ती काही ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ नाही, हे पाकिस्तानचे सत्ताधारी कधीच लक्षात घेत नाहीत. लोकशाही अंगात मुरलेली नसली की हे असेच होणे अपेक्षित आहे.

गणित, खगोल आणि पदार्थविज्ञानासारख्या अवघड विषयातच नव्हे तर सृष्टिशास्त्र, पंचांग शुद्धीकरण आणि हवामानशास्त्रातही पारंगत असणाऱ्या केरुनाना छत्रे यांची १२५ वी जयंती येत्या १९ मार्चला येते आहे. त्यांच्याविषयी लिहिताना ‘टाइम्स’नं म्हटलं होतं, ‘‘प्रो. छत्रे यांना युरोपात पद्धतशीर शिक्षण मिळालं असतं तर ते एक युगप्रवर्तक शास्त्रज्ञ म्हणून गाजले असते.’’ केरुनांनांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा हा लेख त्या निमित्ताने..१९ व्या शतकात जन्म घेऊन आपल्या कर्तबगारीनं कीर्तिमान झालेल्या प्रभावळीत प्राचीन भारतीय तसेच आधुनिक गणित व खगोलशास्त्र यांचे निस्सीम उपासक विनायक लक्ष्मण ऊर्फ केरुनाना छत्रे यांचं नाव घेणं भाग आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लो. टिळक, सुधारकाग्रणी आगरकर यांचे गुरू असलेल्या केरुनानांचा जन्म अलिबाग तालुक्यातल्या नागाव येथे झाला. आई-वडिलांना बालपणीच अंतरल्यानं त्यांना शिक्षणासाठी मुंबईस चुलत्याकडं यावं लागलं. त्यांच्यामुळंच केरुनानांना वाचनाची गोडी व कोणत्याही प्रश्नाकडं वस्तुनिष्ठ दृष्टीनं पाहण्याची सवय लागली.