Leading International Marathi News Daily
रविवार, ८ मार्च २००९

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेखा पष्टे,अंबरनाथच्या नगराध्यक्षा संपदा गडकरी, नवी मुंबईच्या माजी महापौर मनीषा भोईर, ठाण्याच्या महापौर स्मिता इंदुलकर आणि आमदार मंदा म्हात्रे.

हक्काच्या वाटेवर.. मिळून साऱ्याजणी!
ठाणे प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ताकारणात भले आम्हापैकी बहुतेकींना ३३ टक्के आरक्षणामुळे प्रवेश मिळाला असला तरी केवळ महिला म्हणून कुणी आम्हाला मतदान करू नये. आम्ही करीत असलेल्या कामानुसार आमचे मूल्यमापन व्हावे, अशा भावना ठाणे जिल्ह्णाातील महिला लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्या.

अरे, काळाबाजार!
अनिरुद्ध भातखंडे

पाच रुपयांना मिळे, जरी कोर्ट फीचा स्टॅम्प
वीस रुपये देताना सुटे हाताला रे कंप!
ही रचना बहिणाबाईंची नाही.. पनवेलच्या कचेरीत म्हणजे तहसीलदार, उपकोषागार, सहाय्यक निबंधक आदी सरकारी कार्यालयातील आपल्या कामांची पूर्तता करण्यासाठी कोर्ट फी तिकीट आणण्यास जाणाऱ्या समस्त नागरिकांचे हे मनोगत आहे. या मंडळींना कोर्ट फी स्टॅम्प घेताना काय अनुभव आले, हे या कार्यालयातील लांबलचक रांगेत जाऊन विचारलं तर मान शरमेने खाली जाते.

दीनदुबळ्यांची डोळस माय
भगवान मंडलिक

स्वत:च्या वाहनात स्वत:च्या कष्टाच्या पैशातून इंधन टाकायचे, आपल्या रुग्णालयातील शस्त्रक्रियेसाठी लागणारी यंत्रसामुग्री घ्यायची, ती ५०० किलोमीटर दूरवरचा प्रवास करून तेथे नेऊन ती लावायची, आदिवासी, दुर्गम गावांमधून आलेल्या एकटय़ा-दुकटय़ा, गोरगरीब, दीनदुबळ्या लोकांच्या डोळ्यांची, त्वचा, पोटाची, डोक्याची थोडक्यात डोक्यापासून ते पायापर्यंत जी दुखणी असतील, ती काळजीपूर्वक तपासायची, त्यावर औषधोपचार करायचा, त्या रुग्णांना जर डोळ्यांच्या किंवा अन्य शस्त्रक्रियेची गरज असेल तर ती व्यवस्था करायची.

एका कार्यरत आत्याची गोष्ट
कविता दिवेकर

मनाची ताकद, उत्कृष्ट नियोजन, मेहनतीची तयारी व घरातल्यांची उत्तम साथ असल्यावर तसेच जिद्द व स्वत:बद्दलचा आत्मविश्वास या बळावर असाध्य ते साध्य करता येते हे आमच्या आत्याकडे पाहिल्यावर अगदी पुरेपूर पटते. त्या बदलापूरच्या मालती मधुकर गद्रे.

केतकर्स हेल्थ सेंटर
ठाणे/प्रतिनिधी

राजश्री भरत केळकर मूळच्या पुण्याच्या. घरामध्येच खेळाचं वातावरण होतं. त्यामुळे लहानपणीच लंगडी, खो-खो, स्वििमग खेळायला सुरुवात केली. भरपूर पारितोषिक मिळाली.त्यानंतर लग्न झाल्यावर पती एअरफोर्समध्ये असल्यामुळे भरपूर फिरले. नंतर डोंबिवली येथे स्थायिक झाले. लहानपणापासूनच व्यायाम व एरोबिक्स खूप आवडायचे, त्यामुळे पुढे त्यामध्येच करीअर करण्याचा निर्णय घेतला. २००० मध्ये डोंबिवलीमध्ये पहिले जिम व एरोबिक्स सेंटर चंद्रकांत पाटकर शाळेसमोर सुरू केले. आज एकदम हायटेक बॉडी स्लििमग सेंटर, व्हीएलसीसीसारखेच केसीसी नावाने डोंबिवली येथे एमआयडीसीमध्ये आहे. येथे आम्ही महिलांसाठी इन्स्टंट फॅटलॉस, वेटलॉस प्रोग्रॅम घेतो. ही एक अत्यंत सुरक्षित, व्यायामरहित पद्धती आहे. यास वयाची अट नाही. सध्या डोंबिवली येथे १०० टक्के खात्री देणारे आमचे एकमेव केंद्र आहे. महिलांसाठी एकच सांगणे आहे, बाकी कुटुंबातील इतरांकडे लक्ष देतानाच स्वत:कडे लक्ष द्या व आपल्या शरीरावर प्रेम करा.

स्वामी समर्थ पैठणी केंद्र
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
आई मला नेसव शालू नवा
या गाण्यातील गोड हट्ट काळानुरूप कमी होत जाईल किंवा पुढील पिढी साडी नेसतील की नाही, अशा काही वर्षांंपूर्वी वल्गना होत्या. मात्र साडी व बायकांच्या गराडय़ात आजही पैठणी साडी फेम राजश्री जोशी असतात. काळाची गरज ओळखून त्या सहावारी व नऊवारी साडय़ा शिवून देऊ लागल्या व आज त्याला प्रचंड मागणी आहे. बायकांची आवडनिवड लक्षात घेऊन त्याप्रमाणे आकर्षक रंगसंगती पॅटर्न व डिझाइन्सच्या साडय़ा त्यांच्याकडे असल्यामुळे दिवसेंदिवस त्यांचा व्याप वाढतच आहे. लग्नाचा बस्ता, ओरिजिनल पैठणी, नऊवारी- सहावारी साडय़ा, सोवळी ‘श्री स्वामी समर्थ पैठणी’ केंद्रावर मिळतात. रोज नेसायच्या साडय़ा वापरण्याचे प्रमाण कमी झालेले असले तरी हल्ली चांगल्या, भरजरी, कलाकुसरीच्या साडय़ा संग्रही ठेवण्याचे प्रमाण वाढतच आहे, असे राजश्री जोशी यांचे म्हणणे आहे. अतिशय चांगला व सक्षमपणे आज त्या हा व्यवसाय बरीच वर्षे करत आहेत. महिला दिनानिमित्त राजश्री जोशी यांच्या हार्दिक शुभेच्छा!

उरणचा वीजनिर्मिती प्रकल्प लांबणीवर
मधुकर ठाकूर

राज्यात वीजनिर्मिती व पुरवठा यामध्ये प्रचंड तफावत आहे. राज्याला सध्या सुमारे सात हजार मेगाव्ॉट इतक्या विजेचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे भारनियमनाचे संकट जनतेच्या पाचवीलाच पुजलेले आहे. यावर वीज बचत आणि वीजनिर्मिती असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी वीजनिर्मितीच्या पर्यायासाठी राज्यभर अनेक वीज प्रकल्प उभारण्याचे संकल्प सरकारने सोडले आहेत. त्यापैकी अनेक प्रकल्प कागदावरच राहिले आहेत. उरण येथील वायू विद्युत केंद्र विस्तार प्रकल्प हा एक होय. १२४० मेगाव्ॉट वीजनिर्मितीचा हा प्रकल्प २०१० मध्ये पूर्ण करण्याचा संकल्प सरकारने सोडला होता. मात्र या प्रकल्पासाठी लागणाऱ्या गॅसचाच प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. त्यातच निवडणुका जाहीर झाल्याने या विद्युत प्रकल्पाचे काम सुरू होण्यास वर्षभर वाट पहावी लागणार आहे. शासकीय स्तरावर राज्यात विविध ठिकाणी नवीन व प्रस्तावित प्रकल्प तसेच योजना आखण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात नवीन परळी औष्णिक प्रकल्प संच क्रमांक-२, पारस औष्णिक विद्युत केंद्र विस्तार प्रकल्प हे २५० मेगाव्ॉट क्षमतेचे दोन, खापरखेड औष्णिक विद्युत केंद्र विस्तार प्रकल्प व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र विस्तार प्रकल्प, संच एक व दोन असे प्रत्येकी ५०० मेगाव्ॉट वीजनिर्मिती प्रकल्पांचे काम सुरू आहे. येत्या वर्षांत दोन तर पुढील वर्षांच्या अखेरीस हे प्रकल्प पूर्णत्वास जातील, असा महानिर्मितीचा दावा आहे.