Leading International Marathi News Daily
रविवार, ८ मार्च २००९

समस्या दूर करा
दशमात गुरू, राहू, लाभात रवी, मंगळ, बुध यांच्यातून मेष व्यक्तीच्या प्रयत्नाला वेग मिळेल. यशमार्ग निश्चित करता येतील, त्यात अनेकांचं सहकार्य मिळवू शकाल. तरीही रवी-शनी प्रतियोग, मंगळ-नेपच्यून युती अशा ग्रहांच्या परिणामांनी निर्माण होणाऱ्या समस्या हुशारीने दूर कराव्या लागतील. दुसऱ्यांवर विसंबून कृती ठरवू नका. होळी पौर्णिमा, करीचा दिवस शुभकार्यास योग्य नाही.
दिनांक : ९, १०, १४ शुभ काळ.
महिलांना : परिश्रम वाया जाणार नाहीत.

परिश्रमातून आनंद
भाग्यांत गुरू, राहू, दशमांत सूर्य, मंगळ आणि शुक्र, गुरूचा शुभयोग सत्कारणी परिश्रमाचा आनंद याच ग्रहांमधून मिळवता येतो. चतुर्थात शनी असेपर्यंत प्रपंचात संयमच अधिक उपयुक्त ठरतो. या वेळी कला, साहित्य, विज्ञानात वृषभ व्यक्तींचा प्रभाव वाढत राहील, अचानक प्रवास करावे लागतील, मंगलकार्याची प्रकरणे मार्गी लावता येतील. शनिवारी सूर्य राश्यांतर होताच कार्यमार्ग निर्वेध होऊ लागतील.
दिनांक : ८, ११, १२, १३ शुभ काळ.
महिलांना : प्रतिष्ठा उंचावत राहील.

अनुकूल बदल होतील
पराक्रमी शनी, भाग्यांत बुध, मंगळ, शनिवारी सूर्य दशमांत प्रवेश करणार आहे. कार्यप्रांतात हळूहळू पण अनुकूल बदल होत असल्याची चिन्ह दिसू लागतील. शुक्र, गुरू, शुभयोगातून अधिक स्पष्ट होतील. व्यापारपेठ, राजकारण, कला प्रांत यामध्ये बस्तान बसवण्यासाठी संधीचा उपयोग करता येईल. अष्टमातला गुरू, राहू सहयोग धर्मकार्यात शुभ असतो. साहस व्यवहारांत समस्यांचे ठरेल. होळी पौर्णिमा आणि करीचा दिवस संपेपर्यंत नवीन कार्याची कृती नको.
दिनांक : ४, ९, १०, १४ शुभ काळ.
महिलांना : प्रयत्न करा, प्रगती होत राहील.

चुका करू नका
साडेसाती बरोबरच बुध, मंगळ यांच्यामुळे स्फोटक घटना, तीव्र प्रकरणे आणि त्यातून गंभीर होत राहणाऱ्या समस्या अशा ग्रहकाळातून प्रवास करीत असलेल्या कर्क व्यक्तींना संयम सोडून आणि चुका करून चालणार नाही. गुरू, राहू प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी सहकार्य करतील. रवि-हर्षल युती असताना आरोग्य आणि अधिकार यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. श्री मारुतीची उपासना, आराधना मन:शांती देईल, मंगलकार्ये ठरवता येतील, नवीन परिचय होतील.
दिनांक : ९ ते १३ शुभ काळ.
महिलांना : प्रवास होतील, आकर्षक खरेदी होईल.

हुशारीने पुढे सरका
साडेसातीच्या शनी समोर रवी, मंगळ आहेत आणि रवी- हर्षल युती होत आहे. व्यावहारिक उलाढाली, ठरवलेले उपक्रम आणि बैठकी, चर्चा यांना अडचणीत आणणारी ग्रहस्थिती आहे. हुशारीने ‘अशुभस्य काल हरणम्’ हाच मंत्र उपयोगात आणला आणि श्री मारुतीची उपासना, आराधना सुरू ठेवा. होळी पौर्णिमा, करीचा दिवस नवीन उपक्रमास वज्र्य करावेत.
दिनांक : १० ते १६ शुभ काळ.
महिलांना : विचलित होऊ नका, यश मिळेल.

समीकरणे चुकतील, सांभाळा
व्ययस्थानी शनीसमोर रवी, मंगळ या ग्रह स्थितीत व्यवहाराची समीकरणे चुकतात आणि प्रगतीचा वेग कमी होतो, रविवारच्या रवी, शनी प्रतियोगापासूनच त्याचा प्रत्यय येत राहणं शक्य आहे. त्यामध्ये आरोग्य, सत्ता केंद्र, आर्थिक देवघेव, बढती, बदली, अधिकारी मंडळी अशा विभागाचा समावेश राहील. पंचमांत गुरू, राहू असल्याने इभ्रतीला धोका मात्र पोहोचणार नाही. शुक्र, गुरू शुभयोग प्रपंचात प्रसन्नता ठेवतो.
दिनांक : ११ ते १४ शुभ काळ.
महिलांना : झगडून यश मिळवावे लागेल.

अवास्तव साहस नको
पंचमात रवी, मंगळ, बुध, लाभात शनी यांच्यातील अनुकूलता परिश्रमातून सत्कारणी लावता येईल. व्यवहाराची गाडी त्यामुळे रुळावर ठेवता येईल, तरीही निर्णय, कृती, यश यांच्यामध्ये अवास्तव साहस अडचणीचे ठरू शकेल. रवी-शनी प्रतियोग, रवी-हर्षल युती यांच्यामुळे असे प्रसंग येण्याचा संभव अधिक आहे. होळीपौर्णिमा- करीच्या दिवशी भेटी, चर्चा, संपर्क इत्यादी गोष्टी वज्र्य करणे उत्तम ठरेल.
दिनांक : ८, ९, १०, १४ शुभ काळ.
महिलांना : प्रसंग-परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या. प्रयत्न करा.

प्रयत्नाने यश सोपे होईल
चतुर्थातील रवी-मंगळ आणि रवी-शनी प्रतियोग, रवी-हर्षल युती असा ग्रहकाळ नवी नवी आव्हाने उभी करतो. विचलित विचारांतून कार्यमार्ग बदलावे लागतात. त्याचा परिणाम प्रापंचिक शांती, राजकीय स्थिरता, महत्त्वाचे निर्णय, ठोस कृती यांच्यावर होऊ शकतात; परंतु गुरू-राहू पराक्रमी, पंचमात शुक्र, आणि गुरू-शुक्र शुभयोग यांना शिकस्तीच्या प्रयत्नांची साथ दिलीत तर आव्हानांवरील विजय सोपा होऊ शकतो.
दिनांक : ८ ते १२ शुभ काळ.
महिलांना : कष्ट आणि कल्पकता संधीतून सफलता मिळवून देतील.

सतर्क राहा, यश मिळेल
रविवारच्या रवी-शनी प्रतियोगापासूनच काही व्यवहारांत संशय निर्माण होऊ लागतील; परंतु त्यात अधिक फसू नये, यासाठी मंगळ-नेपच्यून युतीच्या दरम्यान तुम्हाला सतर्क राहावे लागेल. अनुकूल गुरू-राहू आणि शुक्र-गुरूचा शुभयोग प्रयत्न कृती यांना साथ देतील. तसेच शनिवारच्या सूर्य राश्यांतरापूर्वी बऱ्याच समस्यांमधून बाहेर पडू शकाल. महत्त्वाची प्रकरणे, खरेदी-विक्री, आर्थिक देवघेव, व्यवसायाचे करार यास विलंब लागणे अडचणीचे ठरू शकते. तुम्हाला सफलता हवी असेल तर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, एवढे लक्षात ठेवा.
दिनांक : १० ते १४ शुभ काळ.
महिलांना : सफल समीकरणासाठी परिश्रमच आवश्यक ठरतील. विनाकारण चिंता करीत बसू नका. कृती करा.

मार्ग निर्वेध होतील
राशिस्थानी गुरू-राहू, पराक्रमी शुक्र आणि शुक्र-गुरूचा शुभयोग यांच्यातून अवघड प्रश्न सुटण्यास मदत होईल. मिळालेल्या संधीतून नवीन क्षेत्रांतला आपला प्रवेश सोपा होईल. विशेष म्हणजे बऱ्याचशा आर्थिक विवंचना मिटतील. त्यामुळे अधिक चिंतेचे कारण नाही. आप्त परिवारातील गैरसमजही दूर करण्यात यश मिळवता येईल. त्यामध्ये रवी-शनी प्रतियोग, मंगळ-नेपच्यून युती यांच्यामधून निर्माण होणाऱ्या अडचणी हुशारीने, सामोपचाराने दूर करून तुमचा मार्ग निर्वेध करता येईल. देवधार्मातून तुम्हाला आनंद मिळेल. मंगलकार्य ठरावे.
दिनांक : ११ ते १४ शुभ काळ.
महिलांना : निर्धार आणि निष्कर्ष यातून यशस्वी होता येईल. विचारपूर्वक कृती करून आपले साध्य गाठा.

लोभ टाळा, यश मिळेल
राशिस्थानी सूर्य, मंगळ, बुध, मीन, शुक्र यांच्यामुळे कुंभ व्यक्तींना उलाढाली सुरू ठेवता येतील. प्रतिष्ठा सांभाळता येईल. संपर्कातून काही विभागांत सफलता मिळवता येईल. यात अवास्तव अपेक्षा, साहस यांचा लोभ टाळला तर रवी-शनी प्रतियोग आणि मंगळ-नेपच्यून युतीचा अनिष्ठ हस्तक्षेप आपण टाळू शकाल. त्यामध्ये स्फूर्ती देणारी परमेश्वरी प्रार्थना उपयुक्त ठरेल. जागा, नोकरी अधिकार, उधारी असले प्रश्न सोडवून घेता येतील. प्रवास कराल.
दिनांक : ९, १०, १४ शुभ काळ.
महिलांना : समाजात प्रभाव वाढेल, संसार-समस्या सुटतील.

सावध राहा, सफल व्हाल
राशिस्थानी शुक्र, लाभात गुरू, राहू आणि शुक्र-गुरूचा शुभयोग यांच्या अनुकूलतेमुळे शनिवारच्या रवी राश्यांतरापर्यंत मजल-दरमजल सुरू ठेवून अनेक उपक्रमांत पुढे निर्दोष यश मिळवता येईल. आश्वासने उत्साह देतील आणि संपर्क समाधानाचे ठरतील. आर्थिक समस्यांवर मार्ग शोधण्यातही यश मिळवू शकाल. या वेळी रवी-शनी प्रतियोगामुळे अधिकाराचा उपयोग, खर्चिक योजना दुसऱ्यावर विसंबून महत्त्वाचे करार यासंबंधात सावध राहणे आवश्यक आहे. भक्तिमार्ग आनंद देईल.
दिनांक : ८, ११, १२, १३ शुभ काळ.
महिलांना : चांगली मजल मारता येईल. मोठय़ा यशासाठी थांबा.