Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

रिलायन्स इंडस्ट्रीजसह १० बडय़ा कंपन्यांचे गेल्या आठवडय़ात ५५ हजार कोटींचे नुकसान
मुंबई, ८ मार्च/पीटीआय

दहा बडय़ा भारतीय कंपन्यांना गेल्या आठवडय़ात बाजारपेठेतील मुल्यांकनानुसार ५५ हजार कोटीं

 

रुपयांपेक्षा अधिक फटका बसला आहे. त्यात मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) या कंपनीला सुमारे १५ हजार कोटींचे नुकसान सोसावे लागले.
मुंबई शेअर बाजारामध्ये शुक्रवार अखेरीस संपलेल्या उलाढालीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बाजारपेठीय भागभांडवलामध्ये ७ टक्क्यांनी घसरण झाली. त्यामुळे या कंपनीला तब्बल १४८७२ हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बाजारपेठीय भागभांडवलाचे गेल्या आठवडय़ात १ लाख ८४ हजार २२१ कोटी रुपयांपर्यंत घसरण झाली. त्याआधीच्या आठवडय़ात या कंपनीचे बाजारपेठीय भांडवल १ लाख ९९ हजार ९३ कोटी इतके होते.
गेल्या आठवडय़ात मोठे नुकसान सोसावे लागलेल्या दहा भारतीय कंपन्यांमध्ये खाजगी क्षेत्रातील चार व सार्वजनिक क्षेत्रातील सहा कंपन्यांचा समावेश आहे. या १० बडय़ा भारतीय कंपन्यांना गेल्या आठवडय़ात सोसाव्या लागलेल्या एकत्रित नुकसानीचा आकडा ५५९३२ हजार कोटी रुपये इतका आहे.
गेल्या आठवडय़ात विदेशी वित्तीय संस्थांमधील समभागांची मोठय़ा प्रमाणावर विक्री झाल्याने मुंबई शेअर बाजार तसा थंडच होता. त्यामुळेच दहा बडय़ा भारतीय कंपन्यांच्या बाजारपेठीय भागभांडवलामध्ये मोठी घसरण झाली.