Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

ऑस्ट्रेलियाची कसोटीवरील पकड मजबूत
दक्षिण आफ्रिका १३८ धावांत गारद
दरबान, ८ मार्च / वृत्तसंस्था

फिलिप ह्युजेसच्या नाबाद ९८ धावा आणि रिकी पॉन्टिंगच्या ८१ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी चहापानानंतर आपली आघाडी ४३३ धावापर्यंत वाढविली. त्यामुळे या कसोटीतही ऑस्ट्रेलियाचे पारडे जड झाले आहे. सामन्याचे अद्याप दोन दिवस शिल्लक असल्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसरी कसोटीही जिंकण्याची नामी संधी आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या ३५२ धावांना प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेची मात्र सर्व बाद १३८ अशी दारुण अवस्था झाली.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ७ बाद १३७ अशी अवस्था असताना खेळ संपला मात्र तिसऱ्या दिवशी उरलेल्या फलंदाजांनी अवघी एक धाव केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २१४ धावांची मोठी आघाडी मिळविता आली. त्यानंतर दुसऱ्या डावात ह्युजेसने शतकाच्या दिशेने वाटचाल करीत पॉन्टिंगसह १६४ धावांची भागीदारी करून दुसऱ्या डावात आपल्या संघाला २ बाद २१९ धावापर्यंत मजल मारून दिली.
दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात डय़ुमिनीचा (नाबाद ७३) अपवाद वगळता इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही.
जॅक कॅलिसने केलेल्या २२ धावा वगळता इतर फलंदाजांच्या पदरी दुहेरी धावसंख्या आलीच नाही. किंबहुना, डय़ुमिनीनंतर २३ अवांतर धावा हीच मोठी धावसंख्या होती.
धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) - सर्व बाद ३५२
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) - नील मॅकेन्झी झे. हॅडिन गो. जॉन्सन ०, ग्रॅमी स्मिथ जखमी निवृत्त २, हाशिम अमला पायचीत जॉन्सन ०, जॅक कॅलिस झे. पॉन्टिंग गो. मॅकडोनाल्ड २२, ए. बी. डिव्हिलियर्स पायचीत हिल्फेनहाऊस ३, डय़ुमिनी नाबाद ७३, बाऊचर त्रि. जॉन्सन १, पॉल हॅरिस त्रि. मॅकडोनाल्ड ४, मॉर्न मॉर्केल त्रि. मॅकडोनाल्ड २, डेल स्टेन झे. हॅडिन गो. सिडल ८, मखाया एनटिनी पायचीत सिडल ०, अवांतर २३, एकूण ५७.३ षटकांत सर्व बाद १३८. बाद क्रम : १-०, २-०, ३-६, ४-६२, ५-१०४, ६-१०४, ७-१०६, ८-१३८, ९-१३८. गोलंदाजी : जॉन्सन १६-५-३७-३, हिल्फेनहाऊस ११-२-२८-१, मॅकडोनाल्ड १२-४-२५-३, सिडल १३.३-६-२०-२, नॉर्थ ४-३-६-०, क्लार्क १-१-०-०.
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) - फिलिप ह्युजेस खेळत आहे ९८, सायमन कॅटिच झे. हॅरिस गो. कॅलिस ३०, पॉन्टिंग झे. मॅकेन्झी गो. मॉर्केल ८१, अवांतर १०, एकूण ६४.३ षटकांत २ बाद २१९, बाद क्रम : १-५५, २-२१९,
गोलंदाजी : स्टेन ९-०-५३-०, एनटिनी ११-१-३८-०, मॉर्केल ९.३-१-४८-१, कॅलिस ८-०-२१-१, हॅरिस २२-६-३९-०, डय़ुमिनी ५-१-१२-०.